होत वसुमती अधीन
परीहारील कोण विघ्न
ज्ञेयज्ञे सारी निम्न
आंग्लापुढती नम्न ll १ ll
जातीस्मरे काय प्रयोजन
संसृती होय प्रहीण
हाची मुहूर्त प्राक्चिरम्
पुनरपि प्रयत्न प्रसभम् ll २ ll
संभूता अन्ये प्रबोधक
सङ्कीर्ण करोनि पुष्कल
ताडूनि तो स्पुत्कार
उदग्र हो जयकार ll ३ ll
करोनि युक्ति निश्चय
साधोनि कृत्य सम्भूय
न होय कर्म उपक्षय
दृढ होणे विनिर्जय ll ४ ll
- सार्थबोध
विनंती: - संस्कृत आणि रचनेबद्दल सूचना आल्यास स्वागत आहे …