अपर्णाताई, :-(
आपण लिहावं आणि अर्थ वाचकांवर सोडून द्यावा - स्पष्टीकरण (आणि समर्थन) देत बसू नये - असं पथ्य (नियमाला पथ्य हा जरा विचित्र समानार्थी शब्द आहे!) मी सामान्यतः पाळत आले आहे. त्यामुळे ...
इथं खोळ हा अर्थ शरीरासाठी वापरला आहे. ('वासांसि जीर्णानि....' वगैरेचा परिणाम!!)
ती खोळ गहाण टाकली आहे - म्हणजे तितकी मोलाची आहे, पण गहाण टाकायची वेळ पण आली आहे. ती गहाण ठेवून बदल्यात 'काहीतरी' मिळालेही आहे ...
एखादी वस्तू गहाण टाकली की आपली असून आपली उरत नाही - तिचं काय होतं त्यावर आपलं नियंत्रण काही काळ तरी नसतं..
आता 'शरीर गहाण टाकणं' याचा अर्थ कवितेकडे पाहण्याची 'एक' दृष्टी देतो. 'एक' अशासाठी की दुस-याच ओळी केंद्रस्थानी घेतल्या तर कदाचित वेगळा अर्थ लागू शकेलही :-)
थांबते. मी माझ्याही नकळत कवितेबद्दल लिहायला लागले की!!
प्रतिक्रिया
13 Aug 2013 - 4:11 pm | पैसा
अर्थ हाती लागतोय लागतोय असं वाटेपर्यंत परत हातातून निसटतोय. जरा कोडं आहे. बघू सुटतंय का!
13 Aug 2013 - 4:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
पैसातैशी शमत...
13 Aug 2013 - 4:19 pm | यशोधरा
पोचली अगदीच. सुरेख लिहिलंय कसं म्हणू? फार टोचणारं लिहिलं आहे आतिवास...
14 Aug 2013 - 5:11 am | स्पंदना
मान्य. टोचतय खर आहे. पण नक्की काय ते समजत नाही आहे.
आतिवास ताई जरा उलगडाल का? काल पासुन वाचते आहे, पण शप्पथ काही उलगडेना.
14 Aug 2013 - 8:35 am | आतिवास
अपर्णाताई, :-(
आपण लिहावं आणि अर्थ वाचकांवर सोडून द्यावा - स्पष्टीकरण (आणि समर्थन) देत बसू नये - असं पथ्य (नियमाला पथ्य हा जरा विचित्र समानार्थी शब्द आहे!) मी सामान्यतः पाळत आले आहे. त्यामुळे ...
14 Aug 2013 - 8:52 am | स्पंदना
र्हायल बाई! पण तरीही
खोळ काही काळ
मी टाकते गहाण
चा अर्थ सांगशील?
14 Aug 2013 - 9:09 am | आतिवास
अर्र! रागावलात वाटतं तुम्ही :-)
इथं खोळ हा अर्थ शरीरासाठी वापरला आहे. ('वासांसि जीर्णानि....' वगैरेचा परिणाम!!)
ती खोळ गहाण टाकली आहे - म्हणजे तितकी मोलाची आहे, पण गहाण टाकायची वेळ पण आली आहे. ती गहाण ठेवून बदल्यात 'काहीतरी' मिळालेही आहे ...
एखादी वस्तू गहाण टाकली की आपली असून आपली उरत नाही - तिचं काय होतं त्यावर आपलं नियंत्रण काही काळ तरी नसतं..
आता 'शरीर गहाण टाकणं' याचा अर्थ कवितेकडे पाहण्याची 'एक' दृष्टी देतो. 'एक' अशासाठी की दुस-याच ओळी केंद्रस्थानी घेतल्या तर कदाचित वेगळा अर्थ लागू शकेलही :-)
थांबते. मी माझ्याही नकळत कवितेबद्दल लिहायला लागले की!!
14 Aug 2013 - 9:41 am | पैसा
मी इथेच अडखळत होते. नक्की कोणता भाग केंद्रस्थानी आहे यावर!
14 Aug 2013 - 2:55 pm | मदनबाण
छान !
14 Aug 2013 - 3:22 pm | कवितानागेश
समजून घेतेय....