भिजल्या उरात जखमा सजले नवीन गाणे
वारा उतून वाहे गुंफीत गूढ कवने
ओटीत सांडले जे अस्पर्श स्पर्श लेणे
फुलल्या सयी पुन्हा त्या झाले सुरेल जगणे
अंकूर सुप्ततेचे बिलगूनसे अडाणे
वेडात धुंदलेले नि:शब्द मन शहाणे
आजन्म भुक्त जैसी आसक्त ओल माती
ओढाळल्या गतांचे शब्दाविना तराणे
पवनासवे वराती मेघात सकल पाणी
सहवास लाघवाचा स्वच्छंद मूक वाणी
सुखनैव वेदनांची गर्भारली विराणी
अवनीच की जणू ही दूजी नसे कहाणी
........................अज्ञात
प्रतिक्रिया
19 Jul 2013 - 6:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरुवातीच्या चार ओळी छान उतरल्या होत्या.
पुढील ओळीही तशाच सहज आल्या असत्या तर कविता अधिक खुलली असती असे वाटले.
लिहित राहा. पुलेशु.
-दिलीप बिरुटे