...

प्रियाली's picture
प्रियाली in जनातलं, मनातलं
11 Jul 2008 - 11:45 pm

...

कथा

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jul 2008 - 11:57 pm | llपुण्याचे पेशवेll

:)
तुम्हाला पण क्रमशः ची बाधा झाली काय? (ह.घ्या.)
छान शाळेतले वातावरण छान रंगवले आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

पुण्याचे पेशवे

चित्रा's picture

12 Jul 2008 - 12:13 am | चित्रा

पुढे वाचायला उत्सुक.. (साधारण कथा कशी जाऊ शकेल याचा अंदाज येतो आहे, पण तरी खात्री नाही, आणि उत्सुकता वाटते आहे)
आमच्या शाळेत दुसरीत असताना मुले-मुली फार बोलतात म्हणून दोन मुलांच्या मध्ये एक मुलगी, आणि दोन मुलींमध्ये एक मुलगा अशी रचना केली होती ते आठवते. अर्थात काही उपयोग झाला नव्हता :-)

विसोबा खेचर's picture

12 Jul 2008 - 12:17 am | विसोबा खेचर

दंगेखोर, मस्तीखोर प्रियाली,

सह्ही लिहिलं आहेस. वाचता वाचता अचानक खूप वर्ष मागे गेलो अन् हळवा झालो.

लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा

या गाण्याची आठवण झाली!

येऊ द्या अजूनही... वाचायला मौज वाटते आहे! :)

आपला,
(शाळेत प्रचंड मस्ती केलेला, बाकावर उभा, किंवा वर्गाच्या बाहेर!) तात्या.

अवांतर - बाकी पाल हा आमचा अत्यंत लाडका प्राणी आहे. जिवंत पाल पकडून हातात धरून तिच्याशी क्षंणभर गप्पा मारायला मला फार आवडतं! अतिशय गरीब अन् घाबरट प्राणी, परंतु चिलटा-झुरळांपासून घर मात्र अगदी स्वच्छ ठेवतो! :)

आपला,
(पालप्रेमी) तात्या.

प्रियाली's picture

12 Jul 2008 - 12:19 am | प्रियाली

मौज बिज वाटेल अशा गोष्टी मी सहसा लिहित नाही हो ;) कोण जाणे, ही देखील तशी नसावी गोष्ट.

पण शाळेत अशी धमाल जाम करायचो आम्ही आणि चित्राने सांगितल्यासारखं बाईंच्या शिक्षाबिक्षांचा काही उपयोग होत नसे.

प्राजु's picture

12 Jul 2008 - 12:25 am | प्राजु

पण क्रमशः ला जास्ती नको वेळ लावू... लवकरात लवकर लिही सगळे भाग...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

12 Jul 2008 - 12:32 am | नंदन

लेख, आवडला. पुढल्या भागांची वाट पाहतो आहे.

>> मोरे सर चक्रवाढ व्याज उगीच वाढवून चढवून शिकवत होते
-- सही :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

पिवळा डांबिस's picture

12 Jul 2008 - 12:47 am | पिवळा डांबिस

पूर्वरंग चागली पकड घेतो आहे...

वर्गातल्या काही काकूबाई हे ऐकून काय हिरमुसल्या झाल्या होत्या... बावळट कुठल्या? मला मुलांशेजारी बसायला आवडतं आणि बहुतेक मुलांनाही मुली बाजूला बसलेल्या आवडतात. तसं ते दाखवत नसले म्हणून काय झालं, मला माहित आहे की त्यांना ते आवडतं. उगीच कुठल्यातरी काकूबाई शेजारी बसून "ए तू माझ्या वहीत डोकावू नकोस" नाहीतर "अय्या! तो राजू बघ कसा चोरून बघतो आहे" अशा बायकी गोष्टी करण्यापेक्षा वर्गातल्या एखाद्या उंचपुर्‍या, थोड्याशा घोगरट आवाजाच्या मुलाशेजारी बसण्यात वेगळीच मजा असते.
व्वा झकास! धिस इज रेअर!! एका शाळकरी मुलीच्या मनातील समवयस्क मुलांबद्दलचे विचार वाचायला गंमत वाटली...

पुढे वाचण्यास उत्सुक!

उंचापुरा, एकेकाळी घोगरट आवाज असलेला, (ह. घ्या)
डांबिसकाका

धनंजय's picture

12 Jul 2008 - 2:28 am | धनंजय

आवडली आपल्याला ही डांबीस मुलगी.

बेसनलाडू's picture

12 Jul 2008 - 2:52 am | बेसनलाडू

(डांबिस)बेसनलाडू

प्रियाली's picture

12 Jul 2008 - 3:26 am | प्रियाली

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद.

आवडली आपल्याला ही डांबीस मुलगी.

जो वर आपल्या अंगावर येत नाहीत तोवर अशा इब्लिस कार्ट्या अनेकांना आवडतात असा माझा अनुभव आहे. ;)

विद्याधर३१'s picture

12 Jul 2008 - 7:55 am | विद्याधर३१

जो वर आपल्या अंगावर येत नाहीत तोवर अशा इब्लिस कार्ट्या अनेकांना आवडतात असा माझा अनुभव आहे.

सहमत .......

विद्याधर