कॉकटेल लाउंज : स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
3 May 2013 - 1:14 pm

‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

पार्श्वभूमी:

मागे एकदा गविशी कॉकटेल्सवरती गप्पा मारताना कोकम सरबताचा विषय निघाला आणि त्यापासून काही कॉकटेल बनविता येईल का? असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हापासून कोकम सरबतापासून एक कॉकटेल करून बघायला पाहिजे असा किडा डोक्यात वळवळत होता. आता कॉकटेल लाउंजच्या ग्रीष्म लाउंजोत्सवचे औचित्य साधून काही प्रयोग करतना कोकमाचे सिरप दिसले आणि एकदम गवि डोळ्यापुढे आला. बाकी साहित्य धुंडाळल्यावर एक झक्कास प्रयोग करायचे ठरले. प्रयोग 'उन्नीस बीस' यशस्वी झाला. (उन्नीस बीस का ते कृतीत कळेल) नावासकट माझे इंप्रोवायझेशन आहे. आता नाव काय द्यावे असा विचार करतना विकीपिडीयावर कोकमाचे इंग्रजी नाव दिसले आणि ते एवढे भारदस्त होते की तेच वापरायचे ठरवले.

आता त्या नावात इंडीका असल्याने 'टाटा ब्रॅन्ड'ची आठवण होऊन तोंड कडू होईल पण हे स्पायसी कॉकटेल त्यावर लगेच उतारा ठरेल :)

साहित्य:

प्रकार
व्हाइट रम आणि कोकम रसरबत बेस्ड कॉकटेल

व्हाइट रम
१ औस (३० मिली)

कोकमाचे सरबत
१ ग्लास

स्वीट आणि सार सिरप
१० मिली

चाट मसाला

कोथिंबीर

लिंबाचे काप

मडलर

बर्फ

ग्लास
हायबॉल ग्लास

कृती:

सर्वप्रथम हायबॉल ग्लासमध्ये कोथिंबीर आणि लिंबाचे 1-2 काप घेऊन मडलरने किंचीत मडल करून घ्या.

'किंचीत' हे प्रमाण महत्वाचे आहे. माझे कॉकटेल 'उन्नीस बीस' होण्याचे कारण म्हणजे हे मडलिंग, जरा जास्त जोरात मडल केले आणि लिंबाच्या सालीचा कडसरपणा उतरला कॉकटेलमध्ये कारण त्या लिंबाच्या सालीतले ऑईल 'किंचीत' प्रमाणापेक्षा जास्त बाहेर पडले.

आता मडल करून झाल्यावर त्यात रम आणि स्वीट आणि सार सिरप ओतून घ्या.

आता ग्लासात कोकम सरबत टाकून ग्लास त्याने टॉपअप करा. टॉपअप करून झाल्यावर त्यात चिमूटभर चाट मसाला टाकून बार स्पूनने हलकेच मिक्स करून घ्या.

चला तर मग, स्पायसी गार्सिनिया इंडीका तयार आहे. :)

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

3 May 2013 - 2:28 pm | वामन देशमुख

व्वा! क्या बात है, सोत्री भाई!

विसोबा खेचर's picture

3 May 2013 - 2:29 pm | विसोबा खेचर

अतीव सुंदर..!

जबरदस्त आवडले आहे. ताज्या कोकमांचे सरबत करुन हे बनवलेच पाहिजे. मसालेदारपणाची कल्पना भन्नाटच.

चर्चा झाल्यापासून लवकरच नव्या कॉकटेलचा शोध लावल्याबद्दल धन्यवाद.

आता करवंद..

-(हावरट) गवि

मुक्त विहारि's picture

3 May 2013 - 2:34 pm | मुक्त विहारि

एकदा ट्राय करायला पाहिजे..

सूड's picture

3 May 2013 - 3:06 pm | सूड

नेहमीप्रमाणेच छान!!

स्पा's picture

3 May 2013 - 3:22 pm | स्पा

__/\__

दंडवत

प्रचेतस's picture

3 May 2013 - 3:24 pm | प्रचेतस

अतिशय देखणी कलाकृती

लिंबु अन कोथींबीर वापरलेले हे एकमेव कॉकटेल असावे.
बाकिचा प्रतिसाद नेहमी प्रमाणे.

रेवती's picture

4 May 2013 - 7:03 pm | रेवती

भारी. एकदम आवडले.

सुहास झेले's picture

4 May 2013 - 8:46 pm | सुहास झेले

प्रचंड भारी.... तुस्सी ग्रेट हो सोत्रि :) :)

पैसा's picture

4 May 2013 - 10:23 pm | पैसा

कोकम सरबतात रमची भेसळ! =)) फोटो छान दिसतोय मात्र!