भेटलाच कधी.....

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
24 Apr 2013 - 6:10 pm

भेटलाच कधी प्रल्हाद तर विचारा त्याला......।
"भक्ती" म्हणजे काय असते ?
देवाचे स्वरुप हे चरचरात असते
कितीही संकटे आली त्याला विसरयचे नसते ॥

भेटलाच कधी ज्ञानेश्वर तर विचारा त्याला......।
"ज्ञान" म्हणजे काय असते ?
सोळव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली
रेड्यामुखी वेद वदवून निर्जीव भिंत चालवली ॥

भेटलाच कधी धृवबाळ तर विचारा त्याला......।
"वैराग्य" म्हणजे काय असते ?
सोडुन रजवैभव त्याने नामस्मरण केले
भेट दिली नारायणाने अढ्ळ पद प्राप्त झाले ॥

भेटलाच कधी शिवाजी तर विचारा त्याला....।
"सामर्थ्य" म्हणजे काय असते ?
प्रजेच्या दुखःची जाणीव अंतरी झाली
यवनांशी युध्द करून स्वराज्याची स्थापना केली ॥

भेटलीच कधी अनुसया तर विचारा तिला....।
"पातिव्रत्य" म्हणजे काय असते ?
सत्व बघण्यासाठी तिन्ही देव आले
होऊन बाळ्के तिची तिच्याच घरी खेळू लागले ॥

भेटलीच कधी द्रौपदी तर विचारा तिला....।
"श्रध्दा" म्हणजे काय असते
भरसभेत जेंव्हा सर्वांनी मान फिरवली
पुकारताच श्रीकृष्णाला त्यानेच तिला वस्त्रे पुरवली ॥

भेटलीच कधी शबरी तर विचारा तिला....।
"सबुरी" म्हणजे काय ससते ?
श्रीरामाची वाट बघण्यात आयुष्य घालवले
भेट दिली श्रीरामाने जन्म मरण चुकविले ॥

कविता