पृथ्वीदिनानिमित्त धरणीमातेचे स्तवन
पाण्यापासुन निर्माण झाली । पंचभूते ही तिच्यात आली ।
शेषनागाने भार वाहिला । नमस्कार माझा धरणीमातेला ।
एक भाग भूमी तीन भाग पाणी । तिच्या अंतरी नवरत्न खाणी ।
सप्तसागराचा वेढा जियेला । नमस्कार माझा धरणीमातेला ।
सूर्याभोवती स्वतः फिरते । म्हणोन दिवस रात्र होते ।
स्नानसंद्यादी कर्म करण्याला । नमस्कार माझा धरणीमातेला ।
गिरी शिखरे पर्वत रांगा । गंगा यमुना भिमा चंद्र्भागा ।
भारत खंड पवित्र केला । नमस्कार माझा धरणीमातेला ।
उत्तम बीजे सुपिक माती । अन्न धान्य ही विपुल होती ।
जीवन देते सकळ विश्वाला । नमस्कार माझा धरणीमातेला ।
कितेक धातु लहान मोठे । तेलाचेही अनंत साठे ।
तिच्या अंतरी ही सर्व कला । नमस्कार माझा धरणीमातेला ।
अनेक जंगले विशाल कुरणे । कित्येक नद्या कित्येक धरणे ।
पाणी पुरविते सर्व विश्वाला । नमस्कार माझा धरणीमातेला ।
नव खंडाची वसुंधरा ही । सकळ प्राणी मात्रांची आई ।
आधार देते समस्त जीवांला । नमस्कार माझा धरणीमातेला ।
प्रतिक्रिया
22 Apr 2013 - 6:30 pm | शुचि
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले । विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।
26 Apr 2013 - 10:37 pm | दिपक वायळ
नव खंडाची वसुंधरा ही । सकळ प्राणी मात्रांची आई ।
आधार देते समस्त जीवांला । नमस्कार माझा धरणीमातेला ।