भान

आतिवास's picture
आतिवास in जे न देखे रवी...
1 Apr 2013 - 11:06 am

गोधूळ लेऊन
देह मनावर
अक्षरांची
तरली आण.

आकाशाने
उचलून घेता
तरारले मग
अवघे रान.

पंचम पंचम
मध्यावरती
सुरेल, हळवी
नाजूक तान.

जपले आहे
मुठीत इवल्या
अव्यक्ताचे
अफाट भान.

कविता

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

1 Apr 2013 - 1:43 pm | ऋषिकेश

वा!
(का कोण जाणे) भान पेक्षा 'अव्यक्त' असे नाव हवे होते असे वाटले (अर्थात नामयोजनेचा अधिकार फक्त कवियित्रीलाच हे मान्य आहेच.. हे फक्त मत)

'अव्यक्त' हेही शीर्षक चांगलं आहे.
अनेकदा कवितेचं शीर्षक भुईतून आपोआप उगवून येतं (म्हणजे कवितेबरोबरच)!
- पण काही वेळा ते होत नाही. कविता आधी येते आणि शीर्षक शोधावं लागतं.
ही कविता या दुस-या प्रकारातली आहे. :-)

यशोधरा's picture

1 Apr 2013 - 1:54 pm | यशोधरा

भारी!

कवितानागेश's picture

1 Apr 2013 - 4:16 pm | कवितानागेश

फार छान. :)

सस्नेह's picture

1 Apr 2013 - 10:40 pm | सस्नेह

हेच शीर्षक शोभते. कविता फारशी कळली नाही, पण अखेरचे कडवे भावले..

आतिवास's picture

2 Apr 2013 - 8:11 am | आतिवास

कविता मलाही क्वचितच कळतात - अगदी मी लिहिलेल्याही :-)
कविता आवडण्याशी/ न आवडण्याशी मतलब - अशी मी स्वतःची अनेकदा समजूत घातली आहे!!

इन्दुसुता's picture

2 Apr 2013 - 5:03 am | इन्दुसुता

"पंचम पंचम
मध्यावरती
सुरेल, हळवी
नाजूक तान."
हे आणि शेवटचे कडवे अतिशय आवडले.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Apr 2013 - 8:14 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर अ‍ॅबस्ट्रॅक्ट अभिव्यक्ती...

आतिवास's picture

2 Apr 2013 - 12:32 pm | आतिवास

ऋषिकेश, यशोधरा, लीमाउजेट, स्नेहांकिता, इन्दुसुता, मिसळलेला काव्यप्रेमी - सर्वांचे आभार.