आयुष्यात सगळं मिळवूनही प्रत्येक जण संपूर्ण समाधानी नसतोच ....शेवटी शेवटी मोक्ष मिळावा असे
वाटते ........तो मिळाला तरी .....समाधान कुठे असते .............
अर्धा पूल…..
धुसर होत जाणारा एक मोठा पूल …
अत: पासून इति पर्यंत ....
या जगापासून त्या जगाला
जोडणारा असेल कदाचित .....
इकडून अर्धाच दिसतो ....पुढे फक्त धुके ....
...... .....
गाडी, घोडे काहीच नाही ...
पायीच जावे लागते सगळ्यांना .....
रस्ता तसा मोठा रुंद …गर्दीत एकट्याचा …
प्रत्येकाची वाट मात्र अरुंदच ...तीही ठरलेली ...
इकडून अर्धीच दिसते ....पुढे फक्त धुके ....
काहीतरी निसटल्याची भीती जाणाऱ्यांची ...
येणाऱ्यांच्या फक्त हसऱ्या सावल्या ...
गजबजलेला तो पक्का पूल ....पण आधारहीन सर्वच ...
अर्धा चालून झाला तरी ....पुढे फक्त धुके .....
मागे वळून पाहिले तर सगळंच हरवलेलं .....
एरवी फक्त प्रकाशात दिसणारं जग ......
आता अंधारातही उजळलेलं ……
पुलावर मात्र पांढरा अंधार....काहीच दिसत नाही ...
संपत आला तरी ...पुढे फक्त धुके .....
एक लख्ख सोनेरी कमान ..... आता हर्षून टाकणारी
ढगांवरची पावले ...न कसल्या वाटा न कसली कुंपणे ...
न दिशाहीन आकाश न संपलेली जमीन ...
न मरणाची भिती न जगण्याची चिंता ...
आपण न कोणाचे.. न कुणी आपले ....
न सुखाचे रडू न दुःखातले हसू ....
फक्त मी ....एक असमाधानी ....असा प्रत्येकजण .....
आणि ... आता इकडूनही अर्धाच दिसणारा ...
हा एक पूल .....पुढे फक्त धुके .....
-----फिझा !!
प्रतिक्रिया
26 Mar 2013 - 8:29 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आपण महान आहात!!
पांढर अंधार!! व्वाह क्या बात!!
26 Mar 2013 - 4:22 pm | भावना कल्लोळ
जीवनाचे एक कटु सत्य ......
31 Mar 2013 - 3:46 pm | गंगाधर मुटे
सुरेख कविता.