12 मार्च 1993 ला मुंबईतील साखळी बाँबस्फोटां नंतरच्या होळीच्या दिनी ..........................
रक्तरंग
सांजराती पेटली होळी
भिडल्या ज्वाला गगनाला,
याद जाहली विस्फ़ोटाचि
भड़कत होत्या अशाच ज्वाला !
एक एक त्यांत तनू कोसळल्या
आयुश्याशी तोडून नाती,
पति-पत्नी अन आई बाबा
जाहली पोरकी सगळी नाती !
आज रंगाच्या पिचकाऱ्या
भासती रुधिराच्या चिळकांड्या परी,
भळभळणारे रक्त आठवून
आतंकाची तिडिक अंतरी !
रक्तरंग पाहून स्फ़ोटातिल
अगणित जाहल्या ह्रदय यातना,
आज नको उधळण रंगांची
द्विगुणित होण्या पुन्हा यातना ! ! !
प्रतिक्रिया
26 Mar 2013 - 8:10 am | स्पंदना
खुप दिसांनी आलात नि व.
छान कविता.
26 Mar 2013 - 8:41 am | फिझा
छान कविता.
26 Mar 2013 - 10:12 pm | निरन्जन वहालेकर
हो खुप दिवसानी आलो.अपर्णाजी धन्यवाद.
फिजाजी धन्यवाद.