चाहूल

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
8 Jul 2008 - 4:02 pm

तुझे हसू आरशात आज आहे
चांदण्याची, बरसात आज आहे |

मिटले कसे कमलदल अलगद
बंदिवान त्यात, भ्रमर आज आहे |

घुमती आसमंती नाद पैंजणांचे
सूर-लयीत हरवले, जग आज आहे |

उमटती हळूवार तरंग जळावरी
विश्व हे रजनीच्या, अधीन आज आहे |

सळसळती पाने, रान सारे जागे
सर्वांगी भिनलेला, गंध आज आहे |

नयनी उमटे लाली, मन धुंदावलेले
स्वप्नांची मज, चाहूल आज आहे |

कविता

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

8 Jul 2008 - 4:08 pm | आनंदयात्री

व्वा ! मस्त कविता मनिषा ! (गझल आहे का ?)
कमलदल - भ्रमर, पैजण - सुर लय, सळसळती पाने- भिनलेला गंध -- सगळेच मस्त. आवडली कविता !!
तुझे हसू आरशात आज आहे वरुन सुन्या सुन्या आठवले होते.

अवांतरः
आमच्या धमाल मुलाचे आजच लग्न झाले, त्याला एकदम ऍप्लिकेबल आहे ही कविता !

मनीषा's picture

9 Jul 2008 - 3:57 pm | मनीषा

नाही गझल नाही कविताच...

प्राजु's picture

8 Jul 2008 - 4:54 pm | प्राजु

सगळ्याच कल्पना छान आहेत.

तुझे हसू आरशात आज आहे वरुन सुन्या सुन्या आठवले होते.

असेच म्हणते...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

8 Jul 2008 - 10:55 pm | विसोबा खेचर

सगळ्याच कल्पना छान आहेत.

हेच म्हणतो!

सुंदर कविता....

तात्या.

बेसनलाडू's picture

8 Jul 2008 - 11:12 pm | बेसनलाडू

कल्पना छान आहेत.लय सांभाळली गेली असती तर खुमारी अधिक वाढली असती.
(लयबद्ध)बेसनलाडू

मनीषा's picture

9 Jul 2008 - 4:00 pm | मनीषा

बेसनलाडू.. नाव मस्त आहे
या पुढे लय सांभाळायचा नक्की प्रयत्न करीन

शितल's picture

9 Jul 2008 - 7:11 am | शितल

छान कविता केली आहेस.
:)

मनीषा's picture

9 Jul 2008 - 4:02 pm | मनीषा

आनंदयात्री, प्राजु, विसोबा, बेसनलाडू, शितल
सर्वांचे मनापासून आभार !

कौस्तुभ's picture

9 Jul 2008 - 4:09 pm | कौस्तुभ

सुरेखच !

राधा's picture

15 Jul 2008 - 7:08 pm | राधा

खुप छान........