गहिवरले नभ भिजले कातळ भोर नवीन उगवली
वियोगव्याकुळ तरिही मन; का नयने आतुरलेली ?
कुंद सभोवर स्तब्ध चराचर प्रतिमा हिरमुसलेली
खोल दर्पणी ध्यास एक मज; स्मितरेषा का पुसलेली ?
दूर कुहुक जणु आर्त शोडषी पर कातरलेली
गूढ व्यथित आभास स्पंदने पथी विखुरलेली
कळे न का असुनी नसलेपण; आभा व्यापलेली
भेटीस्तव हुरहुर बहुधा ही; कळा भावओली
..............................अज्ञात
प्रतिक्रिया
20 Mar 2013 - 10:27 am | स्पंदना
दुसर्या कडव्यातील तिसरी ओळ....न का ... आहे का?
खरच अज्ञातकुल , तुम्हे शब्द कोठुन आणता हे आता खरच शोधल पाहिजे.
मस्त!
20 Mar 2013 - 11:06 am | अज्ञातकुल
होय अपर्णा, पण आता ती दुरुस्त कशी करायची हे कळत नाही इथे. :(
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
20 Mar 2013 - 11:31 am | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__!!!
20 Mar 2013 - 11:35 am | प्रीत-मोहर
सुरेख :)
20 Mar 2013 - 11:48 am | अत्रुप्त आत्मा
20 Mar 2013 - 12:14 pm | साऊ
फार छान.
22 Mar 2013 - 5:52 am | इन्दुसुता
छानच..
<<दूर कुहुक जणु आर्त शोडषी पर कातरलेली
गूढ व्यथित आभास स्पंदने पथी विखुरलेली
कळे न का असुनी नसलेपण; आभा व्यापलेली
भेटीस्तव हुरहुर बहुधा ही; कळा भावओली>>
हे विशेष आवडले.
ही विरहीण तर प्रत्येकाच्या मनात दडलेली असते च्च. कुणी कितीही नाही म्हणोत ..आणि कातरवेळी ती बर्रोब्बर बाहेर येते न बोलवताच...
22 Mar 2013 - 10:09 am | अज्ञातकुल
इन्दुसुता,
आपला प्रतिसाद म्हणजे या कवितेतल्या भावनेला मिळालेली एक प्रांजळ पावती आहे. अजून कुणाचीतरी संवेदना अशीच आहे ही जाणीव अतिशय सुखावह आहे. तुमचा "च्च" अतीव महत्वाचा !!
मनःपूर्वक आभार :-)
22 Mar 2013 - 10:31 am | फिझा
खूप आवडली कविता !!
22 Mar 2013 - 12:59 pm | कवितानागेश
सुंदर.
22 Mar 2013 - 1:13 pm | आतिवास
छान; आवडली.
22 Mar 2013 - 1:27 pm | वेल्लाभट
अप्रतिम कविता ! अप्रतिम !
सुरेख शब्द सुरेख मांडणी आणि सुंदर भाव
22 Mar 2013 - 1:34 pm | तिमा
मोहक शब्द, उत्कट भावना. मुजरा शब्दप्रभु!
31 Mar 2013 - 3:57 pm | गंगाधर मुटे
अप्रतिम काव्य.
बरेच दिवसांनी योग आलाय तुमची कविता वाचण्याचा. :)