भीषण दुष्काळ...

निश's picture
निश in जे न देखे रवी...
18 Mar 2013 - 11:08 am

गेलो होतो असाच एकदा कामासाठी ऐका गावी
जिकडे तिकडे नुसतीच धुळ पाण्याविना करपली होती शेत,
हिरवाई जरासुध्दा नाही.

लागली होती तहान म्हणुन ठोठावले एक दार
म्हटले, ताई द्याल का पाणी भागवावयास तहान ?

ताई घरात वळली डोळ्यात तिच्या आसवांची दाटी.
थोडसच पाणी घेऊन ती बाहेर आली.

म्हणाली ऐव्हढच आहे पाणी,
ठेवल होत लेकरासाठी, ते देते आहे तुम्हाला.
तहानलेल्याला पाणी देण पुण्य मानतो आम्ही.

ऐव्हढच पाणी का ते मात्र विचारु नका
नदी कधीच आटली बघा जगण आता सोसवत नाही.

सरकारी मदतीसाठी धनी गेले आहेत तालु़क्याला
आमच्या वाटणीच पाणी दिल मंत्र्याच्या कारखान्याला.

हे सांगताच ती माय धाय मोकलुन रडली
पाण्यासाठी तिची वणवण मला रडवुन गेली.

मन तेव्हापासुन खरच उदास आहे.
पाण्याविना लागले लोक देशोधडीला, तरी सरकारी यंत्रणा झोपली आहे.

इतका भीषण दुष्काळ असा कधी पडला नव्हता
माणुस़कीचा झरा सुध्दा ह्या दुष्काळात आटला होता.

माणुस़कीचा झरा सुध्दा ह्या दुष्काळात आटला होता.....

समाज

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

18 Mar 2013 - 1:32 pm | पक पक पक

व्वा !! मस्त आहे... :)

पक पक पक साहेब, तुमचे मनापासुन आभार.
दुष्काळग्रस्त लोकांच्या समस्या लवकरात लवकर संपाव्यात अस देवाला साकड घालुयात व त्या संपाव्यात म्हणुन आपणही प्रयत्न करुयात.

माणुस़कीचा झरा सुध्दा ह्या दुष्काळात आटला होता. अप्रतिम् केवळ !

मदनबाण's picture

18 Mar 2013 - 9:55 pm | मदनबाण

:(