बाबा .........
काल आवरताना बाबांचे जुने रोलेक्स घड्याळ सापडले.
एकदम आठवल....म्हणायचे आमच्याशी बोलण्या साठी तुला कधी वेळ मिळणार देव जाणे ...
.............................
आई
शनिवार ची सकाळची शाळा..
डोळ्यावर झोपेची झापड
पटकन उरकलेली आंघोळ.
खाकी चड्डी व पांढरा शर्ट
पोळीचा लाडु..कडीचा डबा..
एकदम लहान पण आठवते..
व आता हयात नसलेली आई पण..
प्रतिक्रिया
17 Mar 2013 - 6:44 pm | श्री गावसेना प्रमुख
छान कुलकर्णी साहेब्,खुप रडाया आल आसल की नाही आठवुन
18 Mar 2013 - 2:20 pm | अनय सोलापूरकर
>>>पोळीचा लाडु..कडीचा डबा..
वीकेन्डनन्तर सोमवारी सकाळी सोलापुरहुन पुण्याला येताना,शाळेसारखच आजही आई मला कडिचा डबा देते. भाजी कोणतीही असो. तुप-साखरेची गुन्डाळी असतेच. तो डबा खाताना लई भारी वाटत...!