दाग अच्छे होते हैं

चिखल्या's picture
चिखल्या in जनातलं, मनातलं
26 Feb 2013 - 3:07 am

मला चिखल आवडतो. दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते. चिखलातले कमळ देवाला चालते पण चिखल चालत नाही. मला देव(आनंद), कमळ आणि भाजपा तिन्ही आवडत नाही. कुंभार चिखलापासून भांडे बनवतो. कुंभाराचे चाक आणि बैलगाडीचे चाक दोन्ही सारखेच वाटतात मला, भांडे फुटतात पण चिखल फुटत नाही. पण माठात पाणी साठवता येते, चिखलात पाणी साठवता येत नाही, डबक्यात पाणी आणि चिखल दोन्ही साठतो, पण लोक डबक्यातले पाणी पीत नाहीत . डबक्यातले पाणी प्राणी पितात असे आई म्हणते. बाबा मला डुक्कर म्हणतात. पण मी माठातले पाणी पितो. आई माठात वाळा टाकते. वाळा वाळलेला नसतो, ओलाच असतो. पण डबक्यात घाण असते आणि चिखलसुद्धा...

चिखलात प्राणी लोळतात, आंघोळ करतात, आणि अंगाला चिखल लावुन घेतात. मला आंघोळ आवडत नाही. प्राण्यांच्या अंगाला लागलेल्या चिखलामुळे उन्हापासुन संरक्षण होते असे मास्तर म्हणतात. संरक्षणवरुन आठवलं, प्रिडेटर पिक्चर मध्ये अर्नोल्ड शिवाजीनगर ने स्वत:ला चिखल लावून घेतला म्हणून तो प्रिडेटर त्याला पाहू नाही शकला. पण लोकांनी अर्नोल्ड शिवाजीनगरला लक्षात ठेवला आणि चिखलाला विसरले. मग चिखल उतरल्यावर अर्नोल्ड शिवाजीनगरची धुलाई झाली. असो चिखलामुळे असे रक्षण होते. पण तोच चिखल आपल्या अंगाला लागला की आईचा मार मिळतो. आईपासुन रक्षण बाबापण नाय करु शकत. आणि बाबांचे आईपासुन रक्षण देव पण नाइ करु शकत. म्हणुन मला देवपण नाय आवडत. पण मी मंदिरात जातो, तिथे प्रसाद मिळतो आणि घंटा पण वाजवायला मिळते. घंटेचा आवाज मस्त येतो. पण कानाखाली आवाज आला की कान लाल होतो. लाल रंग मला आवडतो. मला रंग खेळायलाही आवडतं. मला होळीही आवडते. होळीत चिखलात माखायला आवडतं. पण मग डाग पडतात कपड्यांवर. आईला टाइड आवडते, सर्फ एक्सेल आवडत नाही आणि म्हणुन मला गर्लफ्रेंड नाही. आईला कोणीतरी सांगा रे की दाग अच्छे होते हैं

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

26 Feb 2013 - 4:47 am | स्पंदना

वहावतं लिखाण. एकदा वहायला लागल की अगदी नाक गळल्यासारखे.
मस्त !

सस्नेह's picture

26 Feb 2013 - 2:08 pm | सस्नेह

अगदी नाक गळल्यासारखे.

काय उपमा आहे ! चिखलासारखी..

डोळे पाणावले ती उपमा पाहून.

बाकी दाक गळ्ळ्यावर बाईट अबस्था होते एकदब. जगदब्ब, जगदब्ब!

लौंगी मिरची's picture

26 Feb 2013 - 5:16 am | लौंगी मिरची

विनोद कुठशिक आहे , हे लिहिलं असतं तर निदान हसता तरि आलं असतं .मला कुठेच हसायला आलं नाहि . बोर झालं .

आनन्दिता's picture

26 Feb 2013 - 5:22 am | आनन्दिता

आपलं सदस्यनाव सार्थ केलंत अगदी!!!!

आईपासुन रक्षण बाबापण नाय करु शकत. आणि बाबांचे आईपासुन रक्षण देव पण नाइ करु शकत.

=))

कुणी काही म्हणो रे चिखल्या बालीश निबंध आवडला. :)

पैसा's picture

26 Feb 2013 - 4:07 pm | पैसा

कुठे सुरू झाले आणि कुठे संपले! चिखल्याला दाग आवडणारच!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2013 - 9:07 pm | अत्रुप्त आत्मा

@आईला टाइड आवडते, सर्फ एक्सेलआवडत नाही आणि म्हणुन मला गर्लफ्रेंड नाही.>>> =)) =)) =))
असंबध्दतेतून निर्माण होणाय्रा विनोदाचं उत्तम चित्रण आहे हे! :-)

खाली यत्ता ल्ह्यायची र्‍हायली काय?

हे प्रतिसाद पाहून मला अतीव दु:ख होत आहे. लेखकाने या ठिकाणी तीसपस्तीस ओळींमध्ये अनेक विचारगर्भ विषयांना तोंड फोडलं आहे.

उदा.

- माध्यम (दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते)
- स्मरणरंजन (बाबा मला डुक्कर म्हणतात)
- प्राणिशास्त्र (प्राण्यांच्या अंगाला लागलेल्या चिखलामुळे उन्हापासुन संरक्षण होते असे मास्तर म्हणतात.)
- चित्रपट (प्रिडेटर पिक्चर मध्ये अर्नोल्ड शिवाजीनगर ने...))
- कौटुंबिक जीवन(आईपासुन रक्षण बाबापण नाय करु शकत. आणि बाबांचे आईपासुन रक्षण देव पण नाइ करु शकत.)
- भारतीय संस्कृती (मला होळीही आवडते)
- शालेय मुलाचं भावविश्व (म्हणुन मला गर्लफ्रेंड नाही)

वैग्रे वैग्रे.

आणि सगळे तिरकस प्रतिसाद देतायत? तीव्र णिशेध.