......बर .....................!!
गर्दी जमलीये कसलीतरी
बघू बघू काय झालं ...
"अगं धरपडशील कुठेतरी
मुली …..हो मागं तू ....."
......बर .....................!!
बाई मी सांगू ,मी सांगू ...
जमलंय मला …..
“आलंय तुला उत्तर तर शांत बस ,
बाकीच्यांना विचार करू दे जरा ......”
......बर .....................!!
व्वा मस्त पाऊस पडतोय
सगळे चाललेत भिजायला .......
“हे बघ.... मुलीच्या जातीनं जास्त उंडारु नये ...
बस ….वाचत काहीतरी ......”
......बर .....................!!
हेही नाटक मीच लिहिलंय ...सर
यावेळी एखादा रोल पण करेन म्हणते ....
"good good ..... नाही पण backstage लाही
असेलंच की एखादं prize यंदा !!"
......बर .....................!!
इतक्यात घाई कशाला करायची
बघुना काही दिवसांनी ....
“ते करीअर बिरीअर कर गं लग्नानंतर ..
उगीच आत्ता आमच्या जीवाला घोर .....”
......बर .....................!!
आपल्या engagement ला
माझे सगळे friends येणार आहेत.....
"अरे व्वा ! ... ते मैत्रीणींचं ठीक आहे ......
पण बाकी जरा कमीच कर ......"
......बर .....................!!
“ए शुभ्र ढगा .....तुच एक आहेस बघ जवळचा , मला....”
" अगं .........
शेवटच्या घडीला बोलणार नाही खोटं ,
पण तुझ्याशी मैत्री करायला भाग्य हवंय मोठं !
माझा न रंग ठरलेला न रूप ,
न धड पाणी साठवतो न धूप ,
कधी सूर्याबरोबर तर कधी चंद्राबरोबर ,
माझी न कुणाला सोबत न कुणाला धास्ती ,
मला न थोबाडीत मारू शकशील न मिठी ,
माझ्यावर न कुणाच्या उपमा न कुणाच्या कविता ......
पण हसून हसून आज किती मारल्यास गं बाता ...
भरून आलोय बघ ...बरसून संपेन मी आता .........."
...........बर ...................!!!
प्रतिक्रिया
22 Feb 2013 - 11:56 am | पक पक पक
आता तस काही नाही राहीलय हो.... :)
27 Feb 2013 - 8:34 pm | यसवायजी
काय सांग्ता? आम्च्या गावाकड तर अजुन असच चाल्लया..
------------------
@फिझा:- कविता छान आहे..
------------------
22 Feb 2013 - 2:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बर!!
22 Feb 2013 - 2:44 pm | अभ्या..
नुसते बर नाही. खूपच आवडली आहे.
मिका, क्रांती, अज्ञातकुला नंतर काव्यदालनात एक आश्वासक नाव तर मिळाले वाचायला.
शुभेच्छा.
22 Feb 2013 - 2:47 pm | तर्री
कविता सुमार. मी शीर्षक " बार " वाचले आणि आत आलो.
26 Feb 2013 - 9:05 pm | पक पक पक
22 Feb 2013 - 2:48 pm | बॅटमॅन
आवडली कविता. अंमळ कालबाह्य इमेजरी वाटली, पण आवडली हे महत्वाचं.
26 Feb 2013 - 9:08 pm | शुचि
खूप आवडली. निव्वळ अप्रतिम!!!
26 Feb 2013 - 10:24 pm | वेल्लाभट
सुरे़क्ख !
26 Feb 2013 - 11:26 pm | प्यारे१
आवडली कविता!
कधी कधी असं दामटवणं बरंदेखील असतं... अन्यथा तथाकथित स्वातंत्र्यापायी हातात काय उरतं हे शोधण्यातच आयुष्य जातं!
27 Feb 2013 - 7:57 pm | शुचि
प्रतिसाद आवडला.
27 Feb 2013 - 8:21 pm | अधिराज
कविता चांगली आहे. कधी कधी पालकांनी घातलेली बंधने जाचक वाटतात, पण त्यांच्या भुमिकेतुन पाहिले तर ते बरोबर हि असू शकते.