सा॑गु कसे तुला मी
माझ्या मनातले
ओठा॑त शब्द येन्या
आधीच था॑बले
ह्या मुक भावना
असत्या तुला कळाल्या
नसत्या का मग सरीता
सागरास मिळाल्या
ती नजरा नजर अन
चोरुन पाहणे
कावरे बावरे होउन
गर्दीत मज शोधणे
मग कळले मलाही
सम भावना तुलाही
मग कशास तिश्ठणॅ हे
मन का देत नाही ग्वाही