पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

Primary tabs

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
15 Feb 2013 - 10:08 am
पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालदिवा” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
पायापोटी औरंगजेब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ तोंडं, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता... ॥

                                            - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------

अभय-लेखनहास्यकवितानागपुरी तडकाकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

15 Feb 2013 - 10:25 am | पैसा

वर्‍हाडीतला तडका आपल्याला लै आवडला!

ऐला, काय भारी प्रकार आहे हा.. जाम आवडला..

बापू मामा's picture

15 Feb 2013 - 1:21 pm | बापू मामा

मुटे जी,
आगे बढो.

सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता... ॥

भारीच!!!

तर्री's picture

15 Feb 2013 - 4:25 pm | तर्री

मुटे साहेब - बेष्ट एकदम.

श्रिया's picture

15 Feb 2013 - 10:00 pm | श्रिया

एकदम फक्कड आहे हि कविता.

आजानुकर्ण's picture

16 Feb 2013 - 12:06 am | आजानुकर्ण

मस्त कविता

मुटे काका डेंजरचे तुमी तर .....

भारी तडका .....

चिगो's picture

16 Feb 2013 - 3:01 pm | चिगो

जबराट कविता, मुटेसाहेब..

प्यारे१'s picture

16 Feb 2013 - 3:06 pm | प्यारे१

खूप मस्त कविता...!

सामान्य माणसाच्या मर्यादा नि त्याचा रागच जणू स्पष्ट झाल्यात

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Feb 2013 - 3:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लई भारी.

तुमची "बिपाशाले लुगडं" पण आपल्याला जाम आवल्डी होती :-)

शुचि's picture

16 Feb 2013 - 6:48 pm | शुचि

वा! मजा आली.

पक पक पक's picture

16 Feb 2013 - 8:11 pm | पक पक पक

खल्लास.... :)

सुधीर's picture

17 Feb 2013 - 9:26 am | सुधीर

वर्‍हाडीतला तडका धमाल आहे.

कौस्तुभ आपटे's picture

17 Feb 2013 - 11:10 am | कौस्तुभ आपटे

मस्त!

गंगाधर मुटे's picture

23 Feb 2013 - 10:26 am | गंगाधर मुटे
 नागपुरी तडका - ई पुस्तक

               ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे या प्रकाशनसंस्थेने "नागपुरी तडका" हा माझा Online कवितासंग्रह आज प्रकाशीत केलाय, त्याबद्दल मी "ई साहित्य प्रतिष्ठान" चमूचा आभारी आहे.                                                                              *  *  *  *

PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता चित्रावर क्लिक करा.
प्रकाशकाचे दोन शब्द

                          मराठी अमृताहून गोड भाषा. पण तिच्या ग्रामीण बोलींना जो गोडवा, तजेला आणि मसालेदार झणझणीत तडका आहे तो पुस्तकी शहरी मराठीत नाही. कोकणची खुमासदार मालवणी घ्या किंवा कोपरखळ्या मारणारी अहमदनगरची नगरी , सणसणीत गोळीबंद आगरी किंवा मिठ्ठास खानदेशातली अहिराणी. गांवोगांवच्या या भाषांची मज्जाच न्यारी. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर तांबड्या रश्शासारखी. ज्यांनी अशा भाषांतून व्यवहार केला नाही ते कमनशीबीच. या भाषा म्हणजे अस्सल संस्कृतीची खाण आहे. त्यामुळे आज वऱ्हाडी भाषेतल्या या कवितांची मेजवानी तुमच्यासमोर आणताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. 

                          पण गंगाधर मुटे यांच्या नागपुरी तडक्यात केवळ भाषेचा फ़ुलबाग नाही. काळजाची आग आहे. उपाशी शेतकऱ्याच्या पोटात खवळणाऱ्या अॅसिडमधल्या या कविता आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांवर अश्रू गाळणारं भरपूर लिखाण आजवर झालंय. “बिचारा शेतकरी” असंच विदर्भातल्या शेतकऱ्याचं वर्णन इतर लेखक कवी करतात. मनापासून त्यांना त्याच्या दुःखाची संवेदना जाणवते यात वाद नाही. पण गंगाधर मुटेंच्या कवितेत हाच शेतकरी हात पसरून नाही तर मुठी वळून येतो. वाकून नाही तर ताठ मानेने येतो. गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागतो. त्यांची जनता बिचारी नाही तर विचारी आहे. आणि ती अविचारी होण्यापुर्वी पिळणाऱ्यानी आणि गिळणाऱ्यानी सावध व्हावे असा इशारा ती घेऊन येते. त्यांचा शेतकरी “खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालणाऱ्या” पुढाऱ्यांना खणखणीत दणके घालणारा आहे. 

                          गंगाधरजींच्या कविता मरगळलेल्या शेतकऱ्याला स्फ़ूर्ती देणाऱ्या आहेत. या कविता केवळ आरामखुर्चीतलं वाचन नाहीत. भविष्यकाळाला घडवण्याची ताकद असलेल्या जनसंमर्दाला झोपेतून जागं करणाऱ्या आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील.

PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता येथे क्लिक करा.
----------------------------------------------------------------------------------
सुधीर's picture

23 Feb 2013 - 12:22 pm | सुधीर

चांगला उपक्रम. आपल्या उपक्रमास शुभेच्छा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Feb 2013 - 11:13 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्तच तडका, आणि हो अभिनंदन तुमचे.

पैसा's picture

23 Feb 2013 - 4:24 pm | पैसा

शुभेच्छा आणि अभिनंदन!

अधिराज's picture

23 Feb 2013 - 4:55 pm | अधिराज

भारी आहे.