सखा माझा गं सावळा
रूप भुलवी मनाला
गाणी त्याची माझ्या गळां
जीव तयाठायीच गुंतला.
आभाळाचा रंग निळा
भासे त्याचीच गं तनू
भाळी केशरी तो टिळा
हा उगवता सूर्य जणू.
पाखरांची किलबिलाट
मंद धुंद गं हि हवा
येई जागवाया मला
संगे नादमधूर तो पावा.
मी माझेपण अर्पिले
हृदयसख्याच्या चरणी
लाभला जिवाला विसावा
त्याच्या पावन शरणी.
होऊ कशी मी उतराई
सार्थ केले या जीवना
हा प्रत्येक श्वास माझा
त्याच्याकडून उसना....
प्रतिक्रिया
11 Feb 2013 - 12:01 pm | संजय क्षीरसागर
यात संशय नाही!
11 Feb 2013 - 4:17 pm | अधिराज
आहाहा!! खुपच सुंदर आहे हि कविता. कृष्णावरच रचली आहे ना?
11 Feb 2013 - 6:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
क्या बात है!!
सुंदर रचना.
11 Feb 2013 - 6:53 pm | शुचि
असेच म्हणते.
11 Feb 2013 - 10:52 pm | कवितानागेश
चांगले लिहिताय. :)
11 Feb 2013 - 8:03 pm | आनन्दिता
खुप आवडली!!!
11 Feb 2013 - 9:03 pm | सस्नेह
साठ सत्तरच्या दशकातल्या कवितेची आठवण करून देणारी..
12 Feb 2013 - 5:45 am | स्पंदना
खरच छान लिहिली अहे कविता.
12 Feb 2013 - 7:19 pm | श्रिया
प्रतिसादांबद्दल सर्वांचे खूप खूप आभार!
12 Feb 2013 - 7:27 pm | पैसा
साधी सुरेख रचना.
14 Feb 2013 - 4:57 am | फिझा
आवदलि कविता!!
14 Feb 2013 - 4:57 am | फिझा
आवदलि कविता!!