घरपण

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
10 Feb 2013 - 10:59 am

घर चार कुडाच्या भिंती
घरपण अमृत रसना नाती
आकाश निळे झरणार्‍या चांदण राती
ओंजळी भरूनी स्वातीचे मोती

स्वप्ने जरतरी नयनी आतुर भरती
हृदयी गाभारा तृप्त तेवत्या ज्योती
आवेग कळांचे लाटेवर देहाच्या
रुधिरातिल माया ममता लय ओघवती

शरिरापलिकडले गोत सवे सांगाती
दुष्काळी निर्मळ सोबत नित अनुप्रीती
घर हे अनुभूती अनुबंधांची व्याप्ती
घरपण पण असते रेष रसिक रसरसती

....................अज्ञात

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मनीषा's picture

10 Feb 2013 - 1:07 pm | मनीषा

अतिशय सुंदर !

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2013 - 1:23 pm | अत्रुप्त आत्मा

झ्याक........!

स्पंदना's picture

10 Feb 2013 - 5:56 pm | स्पंदना

छानच!

वा! फार छान.

रुधिरातिल माया ममता लय ओघवती

ही ओळ फार आवडली.

अग्निकोल्हा's picture

10 Feb 2013 - 7:51 pm | अग्निकोल्हा

भिंती नाती राती मोती भरती ज्योती ओघवती सांगाती अनुप्रीती व्याप्ती रसरसती... हे शब्द शेवट प्रत्येक ओळिला शेवटी मस्त लागल्याने वाचनात एक वेगळिच मौज निर्माण झालिय.

इन्दुसुता's picture

11 Feb 2013 - 8:47 am | इन्दुसुता

सुरेख कविता.
" घर हे अनुभूती अनुबंधांची व्याप्ती " आणि " घरपण पण असते रेष रसिक रसरसती" असते म्हणूनच, "घर चार कुडाच्या भिंती" कदाचित नसले तरीही फरक पडत नसावा असे कविला म्हणावयाचे आहे काय असा प्रश्न पडला.