आई

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
2 Feb 2013 - 6:59 pm

काल रात्री मैत्रिणीबरोबर "आई" या अथांग विषयावर खूप गुज बोलून झाले. सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे शिवाय कविता हा माझा प्रांत नाही. पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे. आशा करते कवितेमागील भावना पोचतील.

संस्कार, त्याग, गर्भाशय,
ऊब, दिलासा, अंगाईगीत,
उन्हात वणवणताना मिळालेली
शीतल सावली व झुळूक
सवयी, व्यक्तीमत्त्वाची जडणघडण
आणि हो प्रार्थनादेखील.
नाळ, रुजलेली पाळंमूळं व
दाटून आलेला हुंदका सुद्धा

या सार्‍या गोष्टींचा ,
लहान प्रेमळ देव
आणि त्याला जोडलेले हात.
माझं भलं तिला लागो,
तिचं वाईट मला मिळो.

शांतरसकविता

प्रतिक्रिया

धन्या's picture

2 Feb 2013 - 7:14 pm | धन्या

आईच्या प्रेमापुढे सारं काही फिकं असतं.

पण काही दुर्दैवी जीवांच्या नशिबी अशीही आई येते. जन्मदात्रीच आयुष्याचा नरक बनवते. उभं आयुष्य आपण अशा आईच्या पोटी जन्माला आलो ही एक दुर्दैवी घटना (ट्रॅजिक ईव्हेंट) होती अशी स्वतःचीच समजूत घालून आपलं "सायकॉलॉजीकल मेस" असलेलं आयुष्य सावरताना नकोसं होऊन जातं.

नगरीनिरंजन's picture

4 Feb 2013 - 8:28 am | नगरीनिरंजन

इतकं टोकालाही जायची गरज नाही. आईसाठी उमाळा आला की नवर्‍याची/बायकोची आई आठवावी म्हणजे झालं. ;-)

दादा कोंडके's picture

2 Feb 2013 - 7:25 pm | दादा कोंडके

वरती वाकडाजीरावांशी सहमत.

हल्ली अश्या कविता वाचून भावना डोक्यापर्यंत पोहोचत नाहीत. रोजचा पेपर उघडला की दिड-दोन हजारात तान्ह्या मुलांना विकणार्‍या आया दिसतात, जन्माआधीच विहिरीत फेकणार्‍या आया दिसतात, काही आया अंगावरचं दूधही न सोडलेल्या पोटच्या पोरांना नवर्‍याच्या हवाली करून आधिच्या प्रियकराबरोबर पळून जातात.

त्यामुळे वैयक्तीक अनुभवांपर्यंतच ठिक आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Feb 2013 - 8:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छान कविता. आवडली.

यशोधरा's picture

2 Feb 2013 - 8:06 pm | यशोधरा

या सार्‍या गोष्टींचा ,
लहान प्रेमळ देव
आणि त्याला जोडलेले हात.
माझं भलं तिला लागो,
तिचं वाईट मला मिळो.

हे फार सुरेख शुचि.

पैसा's picture

2 Feb 2013 - 8:09 pm | पैसा

आवडली.

अग्निकोल्हा's picture

2 Feb 2013 - 11:55 pm | अग्निकोल्हा

सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे...पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे.

होय! म्हणुनच जे काही खरडले ते गोड मानले आहे... अन्यथा...

जेनी...'s picture

4 Feb 2013 - 5:54 am | जेनी...

:(

पाषाणभेद's picture

4 Feb 2013 - 6:21 am | पाषाणभेद

ए आये!

चैतन्य दीक्षित's picture

4 Feb 2013 - 4:32 pm | चैतन्य दीक्षित

मनातलं जे आहे तसं मांडलंय. कवितेचा बांधा आहे का? वृत्त्/मीटर आहे का? वगैरे काही नाही.
जे आतून आलंय ते मांडलंय. खरं तर अशा रचना आवडत नाहीत मला. पण ही रचना अपवाद!
शेवट तर खूपच छान.
धन्यवाद ही कविता इथे दिल्याबद्दल.

प्रभाकर पेठकर's picture

4 Feb 2013 - 5:19 pm | प्रभाकर पेठकर

इतक्या सर्वांची काळजी घेणं एकट्या देवाला शक्य होत नाही म्हणून त्याने 'आई' निर्माण केली.

पण दुर्दैवाने तशी 'आई' हल्ली दुर्मिळ होत चालल्याचे जाणवते आहे.

तर्री's picture

4 Feb 2013 - 5:25 pm | तर्री

भावना पोहोचाल्या.

निवेदिता-ताई's picture

4 Feb 2013 - 6:54 pm | निवेदिता-ताई

सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे...पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे.

हे वाचताना मलाही हुंदका अनावर झाला ग...
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी..!!!!!!!!!!!!!

खुप छान अभिव्‍यक्ति! अतिशय आवडली!

अविनाशकुलकर्णी's picture

4 Feb 2013 - 9:45 pm | अविनाशकुलकर्णी

आवडेश

दीपा माने's picture

4 Feb 2013 - 10:29 pm | दीपा माने

शुची, अंतःकरणातून आलेल्या उमाळ्यातूनच खर काव्य प्रसवतं असं मला वाटतं. त्यामुळे तुमची कविता/काव्य सुंदरच आहे.

पेशवा's picture

5 Feb 2013 - 8:06 am | पेशवा

ओनेस्ट भावना