ते आभाळच वेगळे होते
गोड, सुंदर.. देखणे
दिशा ज्ञात होत्या
मार्ग माहित होते
वाऱ्यावर पूर्ण नियंत्रण होते
कधी भरून यायचे
कधी मोकळे व्हायचे
हे सर्व, सर्व ठाऊकचं होते
भिजवायचे त्यांना चिंब केले
कोरडे करायचे त्यांना भग्नच ठेवले
आनंद - दु:ख कसे सगळे अगदी ठरवून
पाहिजे तेंव्हा आणि पाहिजे तिथे...
ते ढग मात्र अवकाळीचं
आकाशाला काळं करणार
चुकीची जागा, चुकीची वेळ
चुकीचा वेग अन चुकीचे बरसणे ...
सर्वत्र गोंधळ, सर्वत्र क्षोभ
सर्वांचाच राग, अन सर्वांचाच क्रोध...
बेसावध सर्वांना गाठतो
दाह शमवतो, पण
स्वत: लक्ख कोरडा, उपेक्षित...
त्यालाही वाटत असेल ना...
आपणच आपले आकाश निवडावे
मार्ग दाखवणारा वारा निवडावा
अन सृष्टीस प्रगल्भ कराव, प्रफुल्लीत कराव..
कोकिळेने शिळ घालावी
मोरांनी नाच करावा
लहानग्यांनी होड्या करून डूम्बाव
तारुण्याने मस्त व्हावे
प्रणयाने धुंद व्हावे
बळीराजाला स्फुरण चढावे
धरणीला गंध चढवा, हिरवा शालू नेसावा
वेणीत गजरा ओवावा, अन एक गुलाबी फुल
अशा आनंदात मग विलीन व्हाव, कायमचे ...
प्रतिक्रिया
31 Jan 2013 - 2:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान लिहीलयं.
31 Jan 2013 - 3:04 pm | समयांत
:)