देहाला चोळुन घेता
राखेने उदी बनावे
धुवून सारी पापे
स्वर्गात स्थानही द्यावे
घाबर्या कोडग्या मनाते
दुजे न काही रुचते
भस्माच्या पट्टी मागे
ते तोंड लपवुनी बसते
(कुण्या भाग्यवंताचा)
हा तुटता लटका आधार
आत्मरुप दिसे भेसुर
गलीतगात्र मग होई
नरपुंगव तो लाचार,
मग तुटती तटतट पाश
मनी पडतो स्वच्छ प्रकाश
त्या अनंत धेय्या साठी
सुरु अंतहीन प्रवास
प्रतिक्रिया
28 Jan 2013 - 4:45 pm | पिलीयन रायडर
ओ मी ३ दा दुर्लक्श केलं ना.. म्हणलं आपल्याला भास होत आहेत.. ते "चाळुन" असं आहे..
मग म्हणलं... जरा जास्तच भास होतायत.. तर तुमची ही कविता...
28 Jan 2013 - 6:26 pm | तर्री
विडंबन आवडले !
29 Jan 2013 - 10:05 am | मूकवाचक
+१
28 Jan 2013 - 6:34 pm | दादा कोंडके
नागा साधूंवर कविता आहे काय?
28 Jan 2013 - 6:36 pm | धमाल मुलगा
एकतर तो अर्थ अन् त्यात ते वर्गिकरण... _/\_
पैजारच. च्यायला!
आमचा दंडवत स्विकार व्हावा गुरुदेव!
28 Jan 2013 - 8:53 pm | अग्निकोल्हा
अतिशय निकोप साहित्य!