अ ब क ड
अ ब क ड
वेगळे विचार वेगळी कृती वेगळी मते
अ ला ब पटत नाही तर ब ला क अ
क ला अ ड आणि ड ला अ ब
नाही नाही
अ ला ब क पटत नाही
ब ला क पटतो पण क ला ड पटतो हे पटत नाही
क ला अ पटत नाही पण अ ला ब पटत नाही हे ड ला अ पटत यापेक्षा जास्त दु:खदायक वाटते
नाही नाही
थांबा परत सांगतो
पहिल्यापासून
अ ला...जाऊ द्या ना
अ ब क ड ला काहीतरी पटतं
काहीतरी पटत नाही
एवढं तरी पटल ना तुम्हाला
मग पुढे सांगतो
अ ब क ड
अ एक मुद्दा मांडतो
ब सरसावून पुढे येणार तोच य पटकन येवून काहितरी बोलतो
य बोलला म्हणून र बोलतो
र बोलला म्हणून य गुरगुरतो
र च्या बाजूने ल येतो
य च्या बाजूने व येतो
प आणि फ मधेच येतात पण आपण कोणत्या बाजूचे हे न समजल्याने +१ करुन निघून जातात
य र ल व चर्चा करतात अ ब क ड प्रमाणेच
अ पुन्हा पुन्हा समजावून सांगतो
ब त्याची री ओढतो किंवा त्याची खिल्ली उडवतो
काहीतरी होत रहाते
य आणि र ला हाकलले जाते
क आणि ड चर्चेत पिंक टाकतात परत धुराळा उडतो
परत काही दिवस जातात
अ किंवा ब काही मुद्दा मांडतात
य१ र१ ल१ व१ पुन्हा तोच इतिहास तीच पद्धती तीच हकालपट्टी
याहीवेळेस क आणि ड नंतर येऊन पिंक धुराळा
तेच ते परत परत
तीच वाक्ये
तेच मुद्दे
तसेच बोलणे
तसेच वागणे
य पासून य१ ते यअनंत
र पासून लपासून वपासून रअनंत लअनंत वअनंत.... अनंत
क आणि ड मात्र नामानिराळे
नंतर येऊन पिंक धुराळा तेच आणि तसेच
क आणि ड चा यरलव शी संबंध आहे का हे अधि़कारी वर्ग पाहत नाही की त्यांना समजत नाही की त्यांना समजूनच घ्यायचे नाही?
तोवर चालूच राहिल हा प्रयोग नेहमीच्याच यशस्वी कलाकारांच्या सहकार्याने !
प्रतिक्रिया
26 Jan 2013 - 1:38 pm | शैलेन्द्र
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म..
अशा वेळेस असं हंबरणे हे यशस्वी होण्याचे हमखास तंत्र आहे.
26 Jan 2013 - 2:00 pm | बाबा पाटील
नाना हे काय र बाबा ?पाठ केलेली बाराखडी पन पार विसरलोकी र बाबा......
26 Jan 2013 - 2:37 pm | पैसा
अ ते ज्ञ अक्षरांची बाराखडी. तेच ते नि तेच ते. हे चालूच रहाणार. कारण अक्षरं तीच ती!
26 Jan 2013 - 2:57 pm | कवितानागेश
या धाग्याचं नाव साक्षर हवं होतं.. ;)
26 Jan 2013 - 3:04 pm | परिकथेतील राजकुमार
आज काय देशी काय रे नान्या ?
लेका, संपादक असतास कुठल्यातरी संस्थळावरती, तर ह्या लेखनाला 'सदाबहार' , 'डोळ्यात अंजन घालणारे' वैग्रे वैग्रे म्हणालो देखील असतो.
असो..
26 Jan 2013 - 6:41 pm | अग्निकोल्हा
य१ व र आणि क बाबतची मते पटली नाहीत! बाकि प ड ल१ व बाबत अनुमोदन!
26 Jan 2013 - 10:57 pm | जेनी...
किती चेंगट पणा केलाय नाना शब्दांचा ....
अजिबात नाहि पटलं .
27 Jan 2013 - 12:38 am | इन्दुसुता
@नाना, भापो. मिपा पूर्वीसारखे राहिले नाही.. आजकाल कुणी अंमळ हळवे होत नाही, कुणाचे ड्वाले पाण्वत नाहीत.. येव्हढेच काय कुणीच कुणाशी बाडीस ही नसते.. ( असो, बदलेन.. :)
@ पैसा : ते 'णाणा' असं नसतं लिहायचं हो.. 'णाना' असं लिहायचं असतं... आता शंभर वेळा लिहा पाहू..( संपादिकेचा अभ्यास जssरासा कमी पडला म्हणते मी !! ::)
@ परा : विलायती असती ना तरी फार्फार तर अ, ब, क, ड जाऊन ए, बी, सी, डी आले असते .. नाव बदलल्यामुळे पात्रे बदलतात असे थोडेच आहे... :)
अवांतर : @ परा: यंदा शुचि मामींना डायरी द्यावयाची राहिली काय? ::)
अतिअवांतर : आता लवकरच 'पिंका का टाकतात' किंवा ' पिंका कशा टाकाव्यात' असा धागा मीच काढावा म्हणते.. :)
27 Jan 2013 - 12:42 am | इन्दुसुता
वरील प्रतिसादात 'पिंका' लक्षपूर्वक वाचावे, गैरसमज झाल्यास मंडळ जबाबदार नाही. :)
27 Jan 2013 - 1:08 am | पैसा
=)) चोप्य पस्ते करते बर्का! णाना णाना णाना णाना णाना
आता बास.
27 Jan 2013 - 12:49 am | प्रभाकर पेठकर
मिपाचे शब्दचित्र आवडले आणि पटलेही.
28 Jan 2013 - 3:15 pm | हासिनी
+१
28 Jan 2013 - 5:52 pm | गणपा
ह्म्म्म असेच काहीसे विचार हल्ली मनात येत असतात. (च्यायला या नान्याचा व्हायरल इथ पर्यंत पोहोचला वाटते.)
पण मग एक म्हण आठवते सो चुहे वाली....... आणि मग मी निव्वळ उसासे टाकून गप्प बसतो.
28 Jan 2013 - 6:39 pm | धमाल मुलगा
जल्लां कायव झ्येपला नाय. नानबा, आजपासुन तुका आपन झ्येनगुरु मननार. :-)
28 Jan 2013 - 8:24 pm | विकास
काव्यातील भावनेशी "भयानक" सहमत!
जसे (फक्त मिपाच नाही पण कुठल्याही)संस्थळावर यशस्वी कलाकार असतात, तसेच यशस्वी विषय देखील असतात. त्यावर पण असेच भयानक काव्य करता येईल.
29 Jan 2013 - 4:19 am | शुचि
भयानक सहमत पटलं नाही. मी तर कलाकारांबाबत भयाण तसेच विषयांबाबत भीषण सहमत झाले आहे
29 Jan 2013 - 8:30 am | विकास
भयानक सहमत पटलं नाही.
तर मग तुम्ही ब आणि मी अ. :-)