(नमस्कार मिपाकरांनो ! __/\__
अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकेतल्या 'ललितलेखनानंतर' सार्वजनिक लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. सांभाळून घ्याओ)
अनेक वेळा ठरून सुद्धा राजगड ते तोरणा ट्रेक काही मूर्त स्वरूप घेत नव्हता. राजगड आणि तोरण्याच्या अनेक वाऱ्या झाल्या होत्या पण R2T खुणावत होता. शेवटी हो-नाही करत ४ टाळकी जमली. मी, मयूर आणि २ भूषणस. पुण्यातून निघावयास शुक्रवारी रात्री १० वाजलेच. गडावर जात असल्यामुळे, शिवापुर् जवळ इतरांचा सामिष खावयायचा डाव हाणून पाडून चना मसाला चापून मार्गस्थ झालो. एव्हाना १२ वाजलेच होते. गुंजवणे गावात पोचायला अमंळ उशीरच झाला. पायथ्याला "बायकांना" झोपवून आम्ही रात्री १.३० वाजता राजगड चढायला सुरुवात केली.
पहिला चढावरच डोळ्यासमोर अंधेरी येऊन तारे दिसायला लागले (रात्र असल्यामुळे हो..!! चाणाक्षांनी शब्दशः अर्थ घ्यावा). तरी मजल-दरमजल करत वाटचाल चालू होती. मस्त चांदणं पडलं होतं. या असल्या प्रीतीसुलभ वातावरणात मला मात्र 'चांदण्यात फिरताना' ऐवजी 'अंधेरी रात थी, कुत्ते चमक रहे थे, तारे भौंक रहे थे, चोर आया भैंस तोडी और दरवाजा ले गया' हा कंट्री विनोद आठवत होता. (वैचारिक अधःपतन, दुसरं काय. तुम्हाला सांगतो, हल्लीच्या तरुण पिढीचं काही खरं नाही बघा.)
असो, रेंग बर्यापैकी असल्यामुळे एका भूषणचं कॉल सेंटर सुरु झालं ते थेट चोर दरवाज्यापर्यंत. वारा नसूनही तो काय बोलत होता ते ऐकू येत नव्हतं. पठ्ठया अगदीच तरबेज निघाला. आम्ही आपली मजल - दरमजल करत चोर-दरवाजा गाठला. चोर दरवाजा चढून पद्मावती माची गाठली. शुक्रवार असून पण देउळ फुल्ल. मग काय, बाहेरच कॅंरी-matउलगडल्या आणि आमचे झंप्या दामले निद्रिस्त झाले !
पहाटे ६ ला उठून तोरण्याकडे मार्गस्थ झालो. संजीवनी माची उतरल्यावर ट्रेक मधल्या पेटंट पराठ्यांवर ताव मारण्यात आला. संजीवनी माची खालील डोंगर उतरायला जरा घसरडा (घसरडं आणि निसरडं यामधील फरकावर सिंहगडाच्या पायाथ्याशी २ पुणेकरांमधील एक साग्रसंगीत जुगलबंदी अनुभवलेला ३रा पुणेकर- पण त्या बद्दल पुन्हा केव्हातरी) असल्यामुळे परत तारे दिसायला लागले !!! हळू हळू सूर्य वर जाऊ लागला आणि "ऊन जरा जास्त होतं" करत "सौमित्र" सामोरे आले !! त्यामुळे मग "तुरंत शक्तीदायक" ग्लुकॉन-डी पिऊन पुढील मार्ग आरंभिला. ११ च्या सुमारास R2Tच्या मध्य टेकडीवर पोचलो. तिकडून मागे वळून पाहताना राजगड ताठ मानेनं उभा भासला. एखाद्या गडाला बेलाग का म्हणतात याची प्रचीती आली. इतका वेळच्या तंगडतोडीचं सार्थक झाल्यासारखा वाटलं.
पण अजून तोरणा गाठायचा होता कि राव. मग आमचे हिंद के जवान आगे बढले. वाटेत एका कारवीच्या जंगलात जरा थांबून क्षणभर विश्रांती आणि मणभर भडंग यांचा सुंदर मिलाफ साधला. मग डोळ्यातली झोप पाण्यासोबत गिळून निघालो ते direct बुधला माची पायथा.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
21 Jan 2013 - 12:35 pm | वाह्यात कार्ट
फोटोंची कायतरी गोची झाली वाटतं
21 Jan 2013 - 2:12 pm | धमाल मुलगा
भारीच!
झक्कास सुरुवात केलियेस भावा. आता थांबू नकोस. येऊदे पुढचे भाग दणादणा. :-)
21 Jan 2013 - 2:30 pm | वाह्यात कार्ट
मंडळ आभारी आहे . :)
21 Jan 2013 - 2:15 pm | वाह्यात कार्ट
21 Jan 2013 - 2:17 pm | वाह्यात कार्ट
21 Jan 2013 - 2:21 pm | वाह्यात कार्ट
21 Jan 2013 - 2:27 pm | वाह्यात कार्ट
21 Jan 2013 - 2:35 pm | मनराव
काय सांगायलाय राव !!! जरा इसकटुन लिवा कि........ हे काय बातमीपत्रच सत्र नाय.......
21 Jan 2013 - 9:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हे मस्त आहे.
:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D
25 Jan 2013 - 3:18 pm | वाह्यात कार्ट
अनुभव दिसतोय!! ;)
21 Jan 2013 - 10:44 pm | निवेदिता-ताई
फोटो सुंदर सगळेच :)
21 Jan 2013 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा
लेखातल्या लिंकांमधले फोटू रुंदाऊन बघतांना प्रत्यक्ष तिथे असल्याचा भास होत आहे... क्यामेरा जबरी दिसतोय...कोणता म्हणायचा... मस्त हाय :-)
25 Jan 2013 - 3:21 pm | वाह्यात कार्ट
सोनी w५७०. साधा पॉईंट & शूट. घरचे न दारचे फोटो काढायला उत्तम.
21 Jan 2013 - 11:36 pm | गणपा
तुमच्या 'बिंदू'ने फार त्रास दिला बघा.
या वयात थरथरत्या हातांनी बिंदू हाताळणे जमत नाही.
फोटू मात्र सुरेख आहेत.
22 Jan 2013 - 9:47 am | किसन शिंदे
वृत्तांत खुपच त्रोटक वाटला पण फोटो मात्र क्लास्स आहेत.
पुढचा भाग येऊ दे गड्या पटकन.
23 Jan 2013 - 2:08 am | शुचि
वृत्तांत खुसखुशीत आहे. मजा आली.
च्यायला "निसरडं आणि घसरडं" यातील फरकावर वादावादी झाली =)) =)) ..... सॉलीडे!
23 Jan 2013 - 2:52 am | मी_आहे_ना
झकास वर्णन आणि फोटोसुद्धा!पु.भा.प्र. (अर्थातच, आमच्याही फसलेल्या तोरणा-राजगडची आठवण झाली. एक-दोनदा फसल्याशिवाय जमतच नाही की कसं काय माहित...)
23 Jan 2013 - 8:49 am | पांथस्थ
अरे वाह्यात कार्ट्या :)
वर्णन आणि फोटू एकदम झकास!!
शाळेत असतांना केलेला राजगड ट्रेक आठवला, शिवजयंती निमित्त गडावर धामधुम होती आणि त्याच वातावरणात गोनिदांची भेट झाली!!
पुढचा भाग लवकर येउद्या!!!
आणि हो ....
हा किडा आता लवकर मिटवा :)
25 Jan 2013 - 5:06 pm | वाह्यात कार्ट
क्या बात !! क्या बात!! क्या बात !!
23 Jan 2013 - 6:34 pm | पैसा
फोटो आणि वृत्तांत मस्त झालाय! क्रमश; बघून अर्थातच बरं वाटलं. मात्र क्रमशः लवकर आलं तर बर!
आणि हो. त्या "बायकांकडे" माझं लक्ष गेलंय बर्का! :D
25 Jan 2013 - 3:25 pm | वाह्यात कार्ट
धन्स.
25 Jan 2013 - 3:55 pm | तिमा
जुनी आठवण आली. आमच्यातले काही साहसी वीर गेले होते असे. आमच्यासारख्या नवशिक्यांना मात्र मधल्या 'घसरड्या/निसरड्या वाटेमुळे राजगडावरुनच परत पाठवण्यात आले होते.