सफर क्राकोची - २

nishant's picture
nishant in भटकंती
7 Jan 2013 - 4:04 am

सफर क्राकोची - 1

"Auschwitz-Birkenau"-

Steven Spielberg यांचा ऑस्कर विजेता चित्रपट "Schindler's List" पाहिला असल्यास हे नाव तुम्हाला चटकन लक्षात येइलच. मी देखिल हा चित्रपट काहि वर्षांपुर्वी बघितला आणि तेव्हाच कधीतरी ह्या ठिकाणी जाउन यावे अशी मनात नोंद करुन ठेवली होती. हे आज प्रत्यक्षात खरे होत होते.
क्राको ह्या मुख्य शहरापसुन साधारण १ तासाच्या अंतरावर Aushwitz ह्या छोट्याश्या गावात हा "Auschwitz-Birkenau" concentration camp आहे. दुसर्‍या महायुद्धातील नाझींनी बांधलेला आणि जगापासुन लपवुन ठेवलेला, हा जगातला सर्वात मोठा Nazi concentration camp होता. १९४०-१९४५ ह्या ५ वर्षांच्या अवधीत इथे १.३ million लोकांचा अत्यंत क्रुर आणि निर्दयीपणे हिटलरच्या नाझी सैनिकांनी खातमा केला. अशा ह्या ठिकाणी आम्ही दुपारी १च्या सुमारास बसने पोचलो. बस मधुन उतरताच समोर दिसले ते कुप्रसिद्ध "Arbeit gate" ज्याला "Hells Gate" म्हणुनहि ओळखले जाते.

a1

* Arbeit gate

ह्याच गेट मधुन लाखो माणसे, लहान मुले, बायका - ज्यु, जिप्सी, पॉलिश, डच, युद्ध कैदि अशा अनेकांना आत नेण्यात आले. जे पुन्हा कधीच आपल्या घरी परतु शकले नाहित.
गेट जवळ पोहोचताच आपल्याला एक अनामिक भिती आणि सुन्न करणारे वातावरण जाणवु लागते. गेट जवळच मिळालेले recorders कानाला लावले व आम्ही आत शिरलो. आत मधे प्रवेश करताच पहिले नजरेस पडते ते लाल विटांच्या आणि छोट्या खिडक्या असलेल्या २ मजली इमारती व सर्वत्र पसरलेले लोखंडी तारांचे कुंपण. त्यात सगळीकडे साचलेला बर्फ आणि शांतता एक वेगळेच वातावरण तयार करत होते. Recorders व गाईड च्या निर्देशानुसार आम्ही प्रत्येक इमारतीत शिरत होतो. १९४७ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर पॉलिश सरकारने ह्या ठिकाणी सापडलेल्या वस्तुंचे संग्रहालय स्थापन केले आहे. आम्ही ह्या वस्तु पाहुन आवाक होत होतो, काहि ठिकानी तर किळस देखिल वाटत होती. इथे मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांच्या चपला, कापलेल्या केसांचा ढिगारा, सामानाच्या पेट्या, अपंग लोकांचे खोटे हात्/पाय, तर कुठे चश्मे, तसेच लहान मुला-मुलिंचे व मोठ्यांचे रक्ताने माखलेले कपडे, गॅस चेंबर मधे वापरण्यात येणार्‍या विषारी गोळ्या ह्या देखिल ठेवल्या आहेत. दुसर्‍या महायुद्धात हिटलरेने काबीज केलेल्या जागांचे नकाशे व इथे आणलेल्या लोकांचे फोटो, त्यांची माहिती अशा एक ना अनेक वस्तु इथे आहेत, ज्या तुम्हाला वास्तवाच्या जवळ घेउन जातात.

lklj

* लाल विटांच्या इमारती

mnm

* तारांचे कुंपण

jklj

dd

ffg

fkjrfkl

* विषारी गोळ्या

kdfnkfjd

djcfhjdfc

* कैद्यांचे फोटो व माहिती

असे ह्या Aushwitz-I चा निरोप घेउन आम्ही निघालो ते Birkenau ह्या extermination camp अर्थात death camp कडे. ह्यालाच Aushwitz-II असेही म्हटले जाते. ह्याच्या मुख्ख्य द्वारावर प्रवेश करताच "Shindlers list" ह्या सिनेमात दाखवलेल्या त्या मोठ्या दगडी दरवाजाची आठवण झाली. त्यातुन अनेक बंदी बनवलेल्या सामान्य लोकांना ट्रेनच्या बंदिस्त बोगितुन आणण्यात येई व त्यांचे अमानवी हाल करुन त्यांना मारले जाई. येथे आणलेल्या लोकांना नाझी सैनिक अक्षरशः कोंबड्यांचा खुराड्यासारख्या दिसणार्‍या खोल्यांत डांबुन ठेवित. रोज सकाळी ऊन असो वा थंडी, ह्या कैद्यांची नग्नावस्थेत गेट समोरील, अगदी ४ फुटबॉल मैदाने मावतील इतक्या मोठ्या पटांगणात हजेरी लागे वा परेड घेत. ह्यात एखादा कैदी मागे राहिला तर त्याला जागेच गोळीने ठार मारले जाई. काहिंवर विषप्रयोग केले जात असत तर कुठे अमानवी वैद्यकिय प्रयोग केले जात असत. काम करण्यास असक्षम असणार्‍या कैद्यांना गॅस चेंबर मधे टाकुन मारण्यात येत असे. या सर्व खुणा आम्हाला तिथे असलेल्या खोल्यांतुन फिरताना दिसत होत्या आणि जाणवतहि होत्या. ह्या खोल्या म्ह्णजे एकही खिडकी नसलेली बैठी घरे. ह्या खोल्यांमधे, ज्या प्रमाणे bunker bed असतात तसे लाकडाच्या फळ्या टाकुन विभाजन केले होते.

ddd

* Birkenau गेट

kj

* कैद्यांना आणण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रेनची बोगी

kjdfp

* बंकर बेड

oi

* बंदिवासात असताना कैद्यांनी काढलेले चित्र

jdhkjdf

ewr

दुसरी खोली म्हणजे स्वच्छतागृह. खोलिच्या मध्यभागी एक नाला खणला होता व ह्याच्या दोन्ही बाजुला बसुन मलमुत्र विसर्जीत केल्यावर त्यातच उतरुन तो नाला साफ करायला लागत असे. तिसरी खोली होती "Gas chamber". ज्यात फक्त वरुन चिमनी सारखे openinig असे. ह्या खोलित कैद्यांना डांबल्यावर चिमनी मधुन विषारी गॅसच्या गोळ्या सोडल्या जात असत. आत त्या लोकांचे काय हाल झाले असतील ह्या नुसत्या विचारानेच अंगावर काटा येतो.
१७ जानेवारी १९४५ रोजी जेव्हा रशियन सैनिक इथे हल्ला करणार आहेत असे नाझींना समजले, तेव्हा ह्या संपुर्ण कँपच्या खाणाखुणा मिटवण्यासाठी १ आठवड्यात ६०,००० कैद्यांना जिवंत जाळले. ती जागा आजही तितकीच भयानक दिसते. त्यावेळी जाळल्या गेलेल्या लोकांच्या अस्थी आजही तिथे काचेच्या एका भांड्यात जतन करुन ठेवल्या आहेत.

kdjw

* मित्र राष्ट्रांनी केलेल्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले बंकर

ghj

uy

* जाळण्यात आलेल्या लोकांच्या अस्थी

अर्थात इतकी भयानक जागा म्हटली कि भुतांच्या गोष्टी, किस्से हे आलेच. काहि स्थानिक लोकांना ह्या ठिकानी रात्री फिरताना विचित्र अनुभव आल्याचे समजते. माझा आणि मित्रांचा रात्री Aushwitz गावात मुक्काम करायचा इरादा त्यासरशी आमच्या बायकांनी धुडकावुन लावला. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास Auschwitz-Berkanau चा खिन्न मनाने निरोप घेउन पुन्हा क्राको शहरात परतलो.

क्रमशः

सफर क्राकोची - ३

प्रतिक्रिया

अमानुष प्रकार आहे. आधी राग येतो आणि नंतर असहाय्यता. गेलेल्या दुर्दैवी जीवांचा विचार करवत नाही. किती भयानक. मी अशी ठिकाणे पहावयास जाणार नाही.

nishant's picture

7 Jan 2013 - 4:46 am | nishant

अगदि खरे! परंतु हे concentration camp सामान्य लोकांसाठी खुले करण्याचे कारण असे की, इतिहासात झालेल्या चुका पुन्हा घडु नयेत.

इष्टुर फाकडा's picture

7 Jan 2013 - 4:48 am | इष्टुर फाकडा

१९४२-१९४५ ह्या ३ वर्षांच्या अवधीत इथे १.३ करोड लोकांचा अत्यंत क्रुर आणि निर्दयीपणे हिटलरच्या नाझी सैनिकांनी खातमा केला.

गल्लत होते आहे. हे ठिकाण तसेच म्युनिक मधील डखाऊ छावणी इथे भयानक अस्वस्थ व्हायला होते इतकेच लिहितो.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jan 2013 - 6:43 am | श्रीरंग_जोशी

छायाचित्र क्र.४ मधील आकड्यानुसार बळींचा आकडा १३ लक्ष आहे. नजरचुकीने एक शून्य अधिक वाढलेले दिसत आहे.

या भागात इतिहासातील वेदनादायी घटनांचे वर्णन अत्यंत संवेदनशीलतेने केले आहे. पु. भा. प्र.

चुक सुधारलेलि आहे.. ध्न्यवाद ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jan 2013 - 8:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छायाचित्रं आवडली. पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

7 Jan 2013 - 9:32 am | प्रचेतस

असेच म्हणतो

ऑशविट्झ कॉन्सण्ट्रेशन कँप असा बघायला मिळेल याची कल्पनाच केली नव्हती..शिंडलर्स लिस्ट आणि वरचे फोटो पाहताना अंगावर काटा आला होता. अनेक धन्यवाद.

माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचं ज्वलंत उदाहरण.
बाकी, नाझींच्या नावानं गळा काढणार्‍या ब्रिटिशांनी जालियनवाला बागेत दुसरे काय केले ?

इनिगोय's picture

7 Jan 2013 - 9:32 pm | इनिगोय

+१ :(

पैसा's picture

7 Jan 2013 - 12:41 pm | पैसा

:(

अत्तापर्यंतचे प्रवास वर्णन आवड्ल्याब्द्द्ल सग्ळ्यांचे आभार.. :)

रोहन अजय संसारे's picture

17 Jan 2013 - 9:51 am | रोहन अजय संसारे

छान लेख.दुसऱ्या महायुद्ध बद्दल खूप माहिती मिळाली.

लेख आवड्ल्या ब्द्द्ल धन्यवाद... :)