इवलस तूझ बाळ
वेदनांनी झाल लाचार
म्हणे काय केल त्याने पाप
सर्वांना सांग तु आज
मखमलीची असतात
स्वप्नांची पिसं
अत्याचारी या दुनियेत
हिरमुसली तुझी कुस
ओढवली आहे सर्वांनी
अंधाराची चादर
तुझ्या या संसाराला
लागली कुणाची नजर
डोळ्यांच्या या पापण्या
बघतांनाही लुकलुकतात
अश्रुंच्या या सागरात
थेंब रक्ताचे मिसळ्तात
अरे जगाच्या माय बापा
तुच आहेस ना
सर्वांचा भाग्य विधाता
मग दुर कर नशिबातला काटा
तेव्हा करेल वंदन तुला दाता
प्रतिक्रिया
6 Jan 2013 - 4:46 pm | सस्नेह
माफ करा, कवितेत काय सांगायचे आहे, ते कळले नाही.
तसेही मला कवितेतले विशेष काही समजत नाही. पण ही वाचून अगदीच चाचपडायला झाले हो...!
6 Jan 2013 - 5:12 pm | kanchanbari
हरकत नाही. आपण सर्व परिपूर्न नाही आहोत. मी लिहिण्याचा माझा प्रयत्न करते आहे. तुम्ही समजुन घेण्याचा करावा. इथे असहाय्य देवाचे लेकरु त्याची व्यथा देवा जवळ सांगत आहे.
8 Jan 2013 - 4:56 pm | समयांत
कोणत्या वेदना जाणवतायेत याचे ज्ञान आहे,
हा विषय किती दुमदुमला आहे नाहीतरी, >>>असहाय्य देवाचे लेकरु त्याची व्यथा देवा जवळ सांगत आहे. १००%
6 Jan 2013 - 7:55 pm | पैसा
असेच लिहीत आणि वाचत रहा. (इतरांनी लिहिलेले वाचणे आणि त्यावर चर्चा करणे हेही महत्त्वाचे आहे.)
7 Jan 2013 - 12:48 pm | अनिल तापकीर
छान आहे