तुझा कुणी केला घात…

आर्णव's picture
आर्णव in जे न देखे रवी...
31 Dec 2012 - 12:19 pm

नियतीची पालखी असुरी हातात
अंधाराचे सावट, दिन असो रात
प्रतिकुलतेचा येथे नाते झंझावात
तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात

प्रयत्नांची शर्थ जेव्हा व्यर्थ क्षणात
विषण्ण विचारांचे तांडव मनात
व्यर्थ तुझ्या कार्माविना तुझा अश्रुपात
तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात

काळोखाच्या काजळीच्या मन विळख्यात
छोटासा ही धक्का येथे भासतो आघात
दैवाची नाराजी ही की फळे कर्मजात
तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात

थैमान अविचारांचे सतत काळजात
आपुलेच ओठ आणि आपुलेच दात
तरी बळ झुंझायाचे तुझ्या मनगटात
तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात

कविता

प्रतिक्रिया

धन्या's picture

31 Dec 2012 - 8:22 pm | धन्या

अशा कविता या स्वानुभवातूनच जन्माला येतात हे स्वानूभवाने माहिती आहे. तेव्हा एव्हढंच म्हणेन की टीकाव धरुन राहा, हे ही दिवस जातील.

आर्णव's picture

3 Jan 2013 - 3:46 pm | आर्णव

धन्यवाद धन्या

पैसा's picture

3 Jan 2013 - 5:04 pm | पैसा

चांगलं लिहिताय.

अनिल तापकीर's picture

3 Jan 2013 - 5:24 pm | अनिल तापकीर

छान आहे