पाब्लो नेरूदा - I do not love you... अनुवाद

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
1 Jul 2008 - 3:39 pm

पाब्लो नेरूदा’ हे नोबेल पारीतोषक विजेते कवी. विसाव्या शतकातील (१९०४ - १९७३) एक अतिशय प्रभावशाली आणि श्रेष्ठ कवी. त्यांच्या कविता बर्‍याचदा अतिशय गुढ (surrealist?), इंटेन्स अशा आहेत. त्या मुळ स्पॅनिश भाषेत लिहिल्या असून त्यांचे इंग्लिश अनुवाद सहजपणे उपलब्ध आहेत. माझा हा मराठी अनुवादही अशाच एका इंग्लिश अनुवादावरुन घेतला आहे, त्या अर्थाने तो double-indirection असा आहे; तो कितपत जमला आहे, ते अवश्य सांगा...मला त्यातली वाक्यरचना फार गुंतागुंतीची झाली आहे असे वाटते, पण ती सहज, सोपी अशी नाही रुपांतरीत करता येत आहे! :(

मूळ कविता -
I do not love you...

I do not love you as if you were salt-rose, or topaz,
or the arrow of carnations the fire shoots off.
I love you as certain dark things are to be loved,
in secret, between the shadow and the soul.

I love you as the plant that never blooms
but carries in itself the light of hidden flowers;
thanks to your love a certain solid fragrance,
risen from the earth, lives darkly in my body.

I love you without knowing how, or when, or from where.
I love you straightforwardly, without complexities or pride;
so I love you because I know no other way

than this: where I does not exist, nor you,
so close that your hand on my chest is my hand,
so close that your eyes close as I fall asleep.

- Pablo Neruda (Translated By Stephen Tapscott)

अनुवाद -

मी तुझ्यावर प्रेम करतो ते तू दुर्मिळ गुलाब, पुष्कराज
किंवा अग्निचे स्फुल्लिंग निघते अशी कार्नेशन आहे, म्हणून नाही.
मी तुझ्यावर प्रेम करतो जशा काही काळोख्या गोष्टींवर प्रेम करायचे असते
एखाद्या गुपितासारखे, अंतःकरणात आणि सावलीत.

मी तुझ्यावर प्रेम करतो ते एका न फुललेल्या रोपासारखे,
पण ते रोप जपते उरात ज्योत लपलेल्या फुलांची
हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध
ह्या धरेतून उमलून, राहतो अंधारून माझ्या ह्या देहात!

मी तुझ्यावर प्रेम करतो; कसे, कधीपासून किंवा कुठपासून हे न समजताच
मी तुझ्यावर सरळ-साधं प्रेम करतो, कुठल्याही गुंतागुंतीशिवाय किंवा अभिमानाशिवाय
तर, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला ह्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग माहित नाही
जिथे मला स्वतंत्र अस्तित्व नाही आणि तुलाही वेगळे अस्तित्व नाही.
इतके जवळ, की माझ्या छातीवरचा तुझा हात हा माझाच हात होतो.
इतके जवळ, की तू डोळे मिटतेस आणि मला झोप लागते.

माझा हा अनुवादाचा पहिलाच प्रयत्न...खूपच उणीवा आहेत, दुसर्‍या कवीची (त्यातही पाब्लो नेरूदाची) कविता अनुवादीत करणे म्हणजे खरच अवघड काम. हा (कदचित व्यभिचारी) अनुवाद कसा वाटला ते जरूर सांगा!

- मनिष

कविताभाषांतर

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

1 Jul 2008 - 3:50 pm | भडकमकर मास्तर

माझे मन तुझे झाले.... !

इतके जवळ, की तू डोळे मिटतेस आणि मला झोप लागते.

ही कल्पनाच एकदम निराळी आहे... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष's picture

1 Jul 2008 - 3:58 pm | मनिष

मी झोपतो आणि तुझे दोळे मिटतात असे पहिजे होते - मुळ कवितेनुसार!
अफलातून कल्पना हे पाब्लो नेरूदाचे एक महत्वाचे (आणि माझे सगळ्यात आवडते) वैशिष्ट्य!

जाऊ द्या! मनिषभाई, तुझे कुछ झेपा नही यार!

- (ओशाळलेला) मनिष

मनिष's picture

1 Jul 2008 - 3:54 pm | मनिष

मीच माझा अनुवाद वाचून पाहिला आणि ते जमले नाही हे जाणवले! :(
पाब्लो नेरुदाची त्रिवार माफी!

पुढच्या वेळी माझ्याच एखाद्या कवितेचा अनुवाद करून पाहीन.

आनंदयात्री's picture

1 Jul 2008 - 4:27 pm | आनंदयात्री

जमलाय रे मनिष, का उगाच असे म्हणतो, उदा

--thanks to your love a certain solid fragrance,
--हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध

हे बघ बरं किती मस्त जमलयं.
बाकी कविता भारी आहे पण जराशी गुढ वाटली !

मी तुझ्यावर प्रेम करतो ते एका न फुललेल्या रोपासारखे,
पण ते रोप जपते उरात ज्योत लपलेल्या फुलांची
हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध
ह्या धरेतून उमलून, राहतो अंधारून माझ्या ह्या देहात!

मला डोळे झोप पेक्षा हे कडवे खुपच आवडले, डिफ्रंट कल्पना आहे एकदम, न फुललेले रोप त्याच्या उरात त्याच्याच न फुललेल्या फुलाची सल, धरेतुन उमलुन येणारा मृदगंध पण तो ही रहाणार अंधारुन त्याच्या देहात अन ते पण न उमललेल्या फुलाच्या ज्योतीबरोबर ...... बापरे !!!!!

खुप म्हणजे खुपच वेगळे वाचायला मिळाले, शतशः धन्यवाद.

मनिष's picture

1 Jul 2008 - 5:26 pm | मनिष

मला खूपच ओढून-ताणून आणलेल्या वाटतात आहे ओळी.

मला डोळे झोप पेक्षा हे कडवे खुपच आवडले, डिफ्रंट कल्पना आहे एकदम, न फुललेले रोप त्याच्या उरात त्याच्याच न फुललेल्या फुलाची सल, धरेतुन उमलुन येणारा मृदगंध पण तो ही रहाणार अंधारुन त्याच्या देहात अन ते पण न उमललेल्या फुलाच्या ज्योतीबरोबर ...... बापरे !!!!!

खुप म्हणजे खुपच वेगळे वाचायला मिळाले, शतशः धन्यवाद.

वेगळेपणा आहे खरच पाब्लो नेरूदा ह्यांच्या कवितेत...त्या वेगळेपणाची आणि पाब्लो नेरूदा ची ओळख करून द्यावी हाच माझा उद्देश!

धनंजय's picture

1 Jul 2008 - 8:39 pm | धनंजय

पाब्लो नेरुदा यांची प्रेमगीते जितकी थेट सहज हृदयाला भिडतात, तितकीच हळुवार भावनांची गुंतागुंत असते. मस्त प्रयत्न!

(कोणाला ध्वनी-संगीत हवे असेल तर मूळ स्पॅनिश असे :
Soneto XVII (Pablo Neruda)

No te amo como si fueras rosa de sal, topacio
o flecha de claveles que propagan el fuego:
te amo como se aman ciertas cosas oscuras,
secretamente, entre la sombra y el alma.

Te amo como la planta que no florece y lleva
dentro de sí, escondida, la luz de aquellas flores,
y gracias a tu amor vive oscuro en mi cuerpo
el apretado aroma que ascendió de la tierra.

Te amo sin saber cómo, ni cuándo, ni de dónde,
te amo directamente sin problemas ni orgullo:
así te amo porque no sé amar de otra manera,

sino así de este modo en que no soy ni eres,
tan cerca que tu mano sobre mi pecho es mía,
tan cerca que se cierran tus ojos con mi sueño.
)

यशोधरा's picture

1 Jul 2008 - 9:36 pm | यशोधरा

आनंदयात्रीला अनुमोदन.

मी तुझ्यावर प्रेम करतो ते एका न फुललेल्या रोपासारखे,
पण ते रोप जपते उरात ज्योत लपलेल्या फुलांची

हे सुरेखच जमलेय!

शितल's picture

1 Jul 2008 - 11:14 pm | शितल

अनुवादाचा प्रयत्न चागला आहे मनिष
वाईट वाटुन घेऊ नका :)
पण जे कवी लिहितो त्याने त्याच्या कविते असे काही स्वत:चे ओतले असते की
बाकीच्यानी अनुवाद केला तरी तो मुळ कवितेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्यावर त्याने अनुवाद अवलबुन आहे.

चित्रा's picture

2 Jul 2008 - 12:21 am | चित्रा

वेगळीच कविता. आणि अनुवादही चांगला उतरला आहे, थोडे बदलता येईल असे वाटते, पण सुरेख प्रयत्न.

or the arrow of carnations the fire shoots off.

यात "अग्निचे स्फुल्लिंग निघते अशी कार्नेशन आहे, म्हणून नाही." याऐवजी आगीची फुले असा काही अर्थ आहे का (म्हणजे फुलबाज्यांच्या टोकाशी जशी फुले दिसतात तसे)

इंग्रजी अनुवादही आवडला. स्पॅनिश कळत नाही :-(

या कवीची आणि कवितेचीही ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

धनंजय's picture

2 Jul 2008 - 12:59 am | धनंजय

"आग फैलवणार्‍या कार्नेशन फुलांचा बाण" अशी काही मूळ प्रतिमा आहे. (इथे बहुधा इंग्रजी अनुवाद फसला आहे.)
कार्नेशनची रंगसंगती कधीकधी पसरणार्‍या ज्वाळांसारखी असते.
Carnation
जंगली गुलाब :
wild rose

यातील पहिल्या ओळींमधल्या सर्व प्रतिमा - जंगली गुलाब, टोपाझ, कार्नेशन, सुंदर आणि काहीसे भडक आहेत, आणि खास दुर्मिळ किंवा बेशकिमती नाहीत. त्यापेक्षा ज्याची फुले दिसतच नाही पण त्यांचा उज्ज्वल रंग आतमध्ये भरलेला आहे, त्या न फुलणार्‍या झाडाचे असे प्रेम आहे, आणि कवीच्या अंगात ("तू"च्या मुळे) गुप्तपणे एकटावलेला मृद्गंध आहे, तसे कवीचे प्रेम आहे, इ.इ.

चित्रा's picture

2 Jul 2008 - 7:33 pm | चित्रा

दिसतात खरी आगीच्या जाळासारखी.
शोधले तर जालावर दोन अनुवाद मिळाले ज्यात फक्त ही एक ओळ वेगळी आहे ( मूळ अनुवादकाने चूक दुरूस्त केली असावी). मनिष यांनी एक अनुवाद मराठीत अनुवाद करण्यासाठी वापरला आणि दुसरा चुकून इथे जोडला असावा. पण काही बिघडले नाही, अनुवाद छानच जमला आहे..

मनिष's picture

2 Jul 2008 - 8:48 pm | मनिष

यातील पहिल्या ओळींमधल्या सर्व प्रतिमा - जंगली गुलाब, टोपाझ, कार्नेशन, सुंदर आणि काहीसे भडक आहेत, आणि खास दुर्मिळ किंवा बेशकिमती नाहीत. त्यापेक्षा ज्याची फुले दिसतच नाही पण त्यांचा उज्ज्वल रंग आतमध्ये भरलेला आहे, त्या न फुलणार्‍या झाडाचे असे प्रेम आहे, आणि कवीच्या अंगात ("तू"च्या मुळे) गुप्तपणे एकटावलेला मृद्गंध आहे, तसे कवीचे प्रेम आहे, इ.इ.

हे बरोबर आहे, असेच म्हणतो...पाब्लो नेरूदांच्या काव्याचे गद्य रसग्रहण करता येईल फार तर, पण अनुवाद फार अवघड गेला...तो काही जमला नाही मला.

मेघना भुस्कुटे's picture

2 Jul 2008 - 7:05 am | मेघना भुस्कुटे

मस्त प्रयत्न आहे. अजून काही कवितांचा अनुवाद वाचायला आवडेल.

विसोबा खेचर's picture

2 Jul 2008 - 5:16 pm | विसोबा खेचर

हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध
ह्या धरेतून उमलून, राहतो अंधारून माझ्या ह्या देहात!

ह्या ओळी सुंदर आहेत...

एकंदरीत कविता ठीक वाटली. परंतु यात नेरुदांचे मोठेपण किंवा वेगळेपण जाणवण्याइतकी ही कविता खास वाटली नाही. आपल्या मराठीत अश्या ५६ प्रेमकविता वाचायला मिळतात!

मनिषराव, नेरुदांचं वेगळेपण, मोठेपण जाणवेल असं काहीतरी भारीतलं येऊ द्या की!

तात्या.

मनिष's picture

2 Jul 2008 - 8:52 pm | मनिष

तात्या, तुमचे पटते आहे मला...ह्यात तो फार काही ग्रेट वाटत नाही. तो तसा जाणवेल अस मला लिहिता येईल का ही शंकाच आहे. जमल्यास एक-दोन कवितांवर "गद्य" लिहीन जमले/झेपले तर.

शेखस्पिअर's picture

2 Jul 2008 - 9:10 pm | शेखस्पिअर

मला वाटले पाब्लो पिकासो हाच फक्त गूढ आहे..
हा पण त्याच तोडीचा वाटतो...
दिलीपोत्तम यांची पण एक कविता अशीच काहीशी आहे..
काही प्राक्रुत शब्द वापरून..

गंमत म्हणजे, पाब्लो नेरूदा ला कवितेतला पिकासो म्हणतात..गूढ आहे खरच तो....आणि त्या गुढतेत लपलेले कित्येक अर्थ, पिकासोच्या पिवळ्या रंगासारखेच... त्याचेच आकर्षण वाटते.

शेखस्पिअर's picture

2 Jul 2008 - 9:28 pm | शेखस्पिअर

माणसाला गूढतेचे आकर्षण असतेच...
त्यात हे पाब्लो लोक अजुन भर घालतात..