नमस्कार मिपाकारहो ,
बरेच दिवस मी मिपा वाचत आहे.प्रथम वाचनातच मिपा आणि मिपाकर आवडले.मित्रांचा कंपू म्हणजे कधी सुटू नये असे स्थान.एक दोन जिवलग मित्र असले कि कुठलाही तणाव हलका वाटू लागतो.मग मानसोपचार तज्ञाकडे जावे लागत नाही असे वाचले होते कुठे तरी.आयुष्यात कधी तरी हि मैफिल मोडून जावे लागते, शिक्षण कामधंदा अश्या गोष्टीं करता.मग मात्र तसा अड्डा जमणे बरेचदा शक्य होत नाही.पण मिपावर मात्र हे सगळे आढळले.काही मराठी संस्थळावर हि डोकावले होते.पण तिथे परत शाळेत गेलो कि काय असा भास झाला.मिपावर मात्र आपल्या कट्ट्यावर आल्यासारखे वाटले.सडेतोड उत्स्फूर्त आणि व्यंगात्मक असल्या तरी बुद्धी चातुर्याची उत्तम चुणुक दाखवणाऱ्या प्रतिक्रिया.एखाद्या धाग्यावर लेखकाची खेचणाऱ्या प्रतिक्रिया तर एखाद्या धाग्यावर मूळ लेखनात आणखी सखोल भर टाकणाऱ्या प्रतिक्रिया स्तिमित करून गेल्या.किती तरी प्रतिभावंत आहेत इथे.तात्यांसारखा अफाट माणूस इथेच मिळाला.पराशेठ्च्या प्रतिक्रिया तर मजाच आणतात.मग या दोघांना चेपुवर शोधून मित्र विनंती पाठवली. त्यांनी ती मान्य हि केली.त्या दोघांचे व्यक्तिमत्व सारखे वाटल.गारंबीच्या बापूची आठवण देणारे.रोख ठोक.अ.आ.च्या स्म्यायल्या ,फुलांच्या रांगोळ्या.जागु तै च्या पाक्रू . मिपाचे आपले असे शब्द आणि खूप हो. जास्त लांबड लावत नाही.पण एक अजून. ओळख पाळख नसतानाही यकु दुख्खी करून गेला.असो तर आता कधी प्रतिक्रियातून टपल्या मारा,चिमटे काढा,बरे वाटले तर कौतुक करा आता आम्ही मिपाकर आहोत.आमचा हरवलेला मित्र कट्टा मिळाला असे वाटत आहे.तेव्हा समस्त मिपाकार हो आमचा नमस्कार कबुल करावा.
प्रतिक्रिया
22 Dec 2012 - 2:48 pm | किसन शिंदे
मिपावर स्वागत! :)
मिपावर नविन येणार्यामध्ये दहातून एखादा तरी असा लेख टाकतोच.
22 Dec 2012 - 3:05 pm | गणपा
वेल्कम. :)
किसनदेवा आल्या आल्या जिलब्या टाकण्या पेक्षा हे बरं नै का? ;)
22 Dec 2012 - 5:31 pm | निवेदिता-ताई
ह्म्म.............झाली सुरुवात..............;D
22 Dec 2012 - 2:55 pm | समयांत
ओक्के, गदगदून आलो मी.
माझे सारे आठवले रे (तीनंच दिवसापूर्वीचे ;)) इतके इमोशनल नका करूत.
स्वागत, लिहा पटकन अजून.,
22 Dec 2012 - 3:02 pm | श्री गावसेना प्रमुख
तुम्ही डु आय डी घेउन आलात काय्,नाही एखाद्या सरावल्यासारखे लिहीतायना म्हणुन,आणी नावात २४ काय आहे एखाद्या मेल आय डी सारख
22 Dec 2012 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा
जिंदादिल...! सलीssssssssल(हे मुघलेआझम मधल्या सली....म,सारखं वाचावं =)) ) आत्मा तुमको सलाम करता है...! :-)
22 Dec 2012 - 3:38 pm | शैलेन्द्र
झालं... आत्ता सलीलच्या मनातल्या कवीतेच तो स्वता:च विडंबन पाडेल..
23 Dec 2012 - 1:32 pm | सलिल २४
अ.आ.धन्यवाद.आधीच काल सर्व प्रतिक्रिया देणारया लोकांना लिहिले होते.पण चुकीच्या जागी डकवल त्यामुळे उडवले गेले.अजून रुळलो नाही न.
22 Dec 2012 - 3:21 pm | गणपा
प्रेषक, सलिल २४
टंकन चुक है का ही?
;)
22 Dec 2012 - 3:41 pm | शैलेन्द्र
डोकावणे हे क्रियापड नपुंसक्लींगी वापरले गेलेय, ईतर संशय घेवु नये..
बाकी सलील साहेब.. स्वागत हो. .इथे आलात तर कोणालाही आनि कशालाही फार मनावर घेणे सोडा..:)
22 Dec 2012 - 3:50 pm | गणपा
:P त्ये ध्यानातच आलं नाही.
धस्न. स्वारी हो सलिल २४
22 Dec 2012 - 3:44 pm | पैसा
मिपावर स्वागत!
22 Dec 2012 - 3:56 pm | चेतन माने
इथे सुरवातीला असंच वाटतं तुम्हीसुद्धा मिपाकर झाले आहात
22 Dec 2012 - 5:10 pm | प्यारे१
शारजाहकर जामखेडकर का?
22 Dec 2012 - 5:11 pm | प्यारे१
नाही नाही.... वेगळा माणूस आहे.! असो.
22 Dec 2012 - 6:32 pm | रेवती
स्वागत.
22 Dec 2012 - 8:30 pm | रुस्तम
माझ्या देखील भावना काही अशाच आहेत. पण अजून एवढ उस्फुर्त लिहिणे जमत नाही.
22 Dec 2012 - 11:31 pm | चिंतामणी
मिपाकर शिकवतील सगळे.
मग ते उत्स्फुर्तपणे बाहेर येइल.
23 Dec 2012 - 9:54 am | सुहास..
याच निमित्ताने सर्वच नव मिपाकरांचे स्वागत करतो :)