मुसळधार पाऊस आणि मि एक एकटा शांत बससेला...
मुसळधार पाऊस आणि सोबतीला त्या दळकाळी फोडणाऱ्या विजांचा कडकडाट
पावसाच्या सरी कधी या कुशीवर कधी त्या आणि मि एकटा शांत बससेला.........
वाटले मलाही कि जावे त्या पावसात स्वचंद भिजावे, नाचावे, मनमुक्त खेळावे, गाणे गावे.......
पण मी एकटाच त्या भयानक पावसात...............
सखे येशीलका तू माझ्य्ब्रोबर त्या पावसात ..
नाही म्हणू नकोस ...
पाऊस थांबेल , विजा नाहीशा होतील , माझ्या आश्या-आकांश्या नष्ट होतील
नाही म्हणू नकोस ............
*कृपया संभारून घ्या मराठी प्रथमच लिहितो आहे*
प्रतिक्रिया
19 Dec 2012 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार
पाऊस तुम्हाला भयानक वाटतो आहे.
ती आली नाही तर असे घडणार असेल तर चांगलेच आहे की मग. ;) भयानक पाऊस तरी थांबेल.
19 Dec 2012 - 1:19 pm | ह भ प
कल्पना आवडली..
लिहित रहा..
19 Dec 2012 - 2:50 pm | कवितानागेश
संभारले आहे! :)
19 Dec 2012 - 2:50 pm | तर्री
मंदी आली हो !
19 Dec 2012 - 3:59 pm | अभ्या..
वॉव
दळकाळी
ग्रेट्च. बुवा, आवडली बुवा.
19 Dec 2012 - 4:04 pm | किसन शिंदे
सवयीने हळू हळू जमेल मराठी लिहायला.
19 Dec 2012 - 5:09 pm | ५० फक्त
ह्याला म्हणतात संपादकीय प्रतिसाद, धन्यवाद मा. संपादक.
19 Dec 2012 - 5:21 pm | मूकवाचक
पुढची कविता सुधारीत मराठी टंकलेखनासह इजाजत मधल्या कुठल्याश्या गाण्यात आहे तशी 'एक अकेली छत्री मे जब आधे आधे भीग रहे थे' या धर्तीवर असावी (भयानक पावसाबद्दल नसावी) यासाठी श्रीमत यांना शुभेच्छा.
19 Dec 2012 - 4:22 pm | स्पा
भरून आले.
अप्रतिम उपमा
लिहित रहा, तुम्ही आमच्या अपेक्शा वाढवल्या आहेत
19 Dec 2012 - 6:37 pm | गवि
स्पावड्या, स्पावड्या.. पाकॄ नाहीये रे ही...
19 Dec 2012 - 7:06 pm | स्पा
काय हे गवि,
कवितेचा रसास्वाद घ्यायचं सोडुन पाक्रु कसल्या सांगताय.
कवितेच्या पावसात न्हाुन निघालेला - स्पोॅन्सुन
19 Dec 2012 - 11:41 pm | मोदक
नको रे नको स्पाऊ...
कविता आणि रसास्वाद हे शब्द ऐकले की कवितेच्या गाझापट्टीत उभा राहून चिकाटीने लढत देणारा बॅटमॅन आठवतो.
19 Dec 2012 - 4:35 pm | स्पंदना
हे बससेला काय आहे? म्हणजे बस साठी बसलेला, की बसुन बसुन बसलेला.
काहीही असो! पाऊस कविता मह्णजे भारीच असली पाहिजे.
खुदसे बाता; काय म्हणुन माणस छत्र्या घेतात देव जाणे की छत्री ही वयमध्य आल्याची खुण असावी?
19 Dec 2012 - 7:23 pm | लीलाधर
भुछत्री आठवली राव :-P
20 Dec 2012 - 12:11 am | आनन्दिता
" पाऊस " हा कवितेचा विषयच देखणा असल्यामुळे कविता आवडली..
वरून
यांसारख्या शुद्धलेखनातील चुकांनी अंमळ करमणुक केली ते वेगळच..
20 Dec 2012 - 11:39 am | अनिल तापकीर
छान आहे
16 Jan 2013 - 5:52 pm | अद्द्या
कोपऱ्या वरचा .. हॉटेल वाला आठवला ..
साहेब्री... डोसे बरोबर संभारु दु कि नुस्त चातनी :D