गोवा - सागरी किनारे- भाग १

jaypal's picture
jaypal in भटकंती
12 Dec 2012 - 11:11 am

दिवाळीच्या सुट्टीत ४ दिवस गोव्याला जाण्याचा योग आला. सिजन एकदम फुलऑन होता. रस्त्यांवर मुंबईच्या वर ट्राफीक आणि त्याच्या दुपटीने पदाचारी. वाहतुकीचे नियम नेहमी प्रमाणे फाट्यावर मारणारे चालकवर्ग आपल्याच मस्तीत अस एकंदरीत (अंधा) धुंद वातावरण. त्यात सोबतच्या मीत्रांच्या आवडी वेगळ्या त्या मुळे भटकंती मनाजोगती करता आली नाही ह्याच शल्य घेउनच परत एकदा निवांत गोवा करायच ठरवुन माघारी आलो. जाताना आम्ही पुणा-कोल्हापुर-निपाणी-संकेश्वर- गडहिंग्लज-अंबोलि मार्गे गोव्यात पोचलो. परतीचा प्रावास वेंगुर्ला-सावंतवाडी-गगनबावडा-कोल्हापुर-मुंबई असा केला.
गोव्याच्या आगदी उलट ईथल वातावरण एकदम शांत परीसर, निवांत लोक, सुंदर निसर्ग हे पाहुन एक रात्र वेंगुर्ल्यातच मुक्कम ठोकला. लॉज मालका कडुन जुजबी माहीती घेतली आणि पुढिल भटकंतीसाठी गोवा रद्द करुन मनोमन वेंगुर्ला परीसर निवडला. वेंगुर्ला केंद्रस्थानी ठेऊन तुम्हाला तेरेखोल, तारकर्ली, मोचेमाड ई. ठिकाण पाहता येतील.(भटक्यांनी या यादीत आधिक भर घालावी ही विनंती.)

गोव्यातील काही प्रकाश चित्रे
१.
g1

२.
g8

३.
g9

४.
g10

५.
g11

६.
g4

७.
g5

८.
g6

९.
g7

१०.
g12

११.
g13

१२.
g15

१३.
g15

१४.
g2

१५
g3

क्रमशः
कॅमेरा निकॉन डी९० + लेन्स निकॉन १८-५५ व निकॉन १०५

प्रतिक्रिया

बेस्ट जयपाल अ‍ॅट हिज बेस्ट !!

( चित्रपालांचे चित्रप्रतिसादांचा फॅन )

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2012 - 11:14 am | परिकथेतील राजकुमार

फटू एकदम आवडेश.

साला फटूच येवढे बोलके आहेत की शब्दांची उणीव जाणवली नाही.

बाकी लेखन प्रकाशीत झाल्याबद्दल अभिनंदन. ;)

मृगनयनी's picture

12 Dec 2012 - 10:30 pm | मृगनयनी

मस्त गोएं..... जयपाल'जी..मन भरलं!!!!

साला फटूच येवढे बोलके आहेत की शब्दांची उणीव जाणवली नाही.

आपण गुजरातला गेलात.. तरी ही शालजोडीतले मारण्याची पुणेरी खोड अजून तुमच्यात भिनलेलीच आहे.. हे पाहून अम्मळ बरें वाटले!!!!! ;)

बाबा पाटील's picture

12 Dec 2012 - 11:16 am | बाबा पाटील

सही.मला समुद्रकिनारे,आणी त्यापेक्षा तेथे मिळणारे मासे लय लय आवडतात...

jaypal's picture

12 Dec 2012 - 11:21 am | jaypal

हा लेख मी कला दालनात टाकण्यासाठी ७/८ दिवस झगडत होतो पण कायम एरर येत होता. परा व स्पा च्या सल्ल्याने भटकंती मधे प्रयत्न केला आणि एकदाच अपलोड झाला. कलादालनाच्या व्यवस्थेची योग्य दखल घ्यावी अशी प्रशासनास विनंती आहे.
सुहास, पराप्राजी आणि स्पा काकांचे धन्यवाद

खरय बाबा तुझं म्हणणं. सध्या कलादालनात धागे काढताना अडचण येतेय खरी.
शक्यतो प्रत्येक धाग्यात आपण लेखनविषय आणि लेखनप्रकार देतो.
पण या कलादालनाच्या धाग्यात (काही तांत्रीक अडचणींमुळे) लेखनप्रकार निवडले की धागा प्रकाशित होत नाही. एरर येते.
तेव्हा सध्या कलादालनाच्या धाग्यात लेखनप्रकार निवडणे टाळावे.

बाकी तुझ्या फटु बद्दल काय बोलवे. ते स्वत़:च इतके बोलके आहेत. :)

सोत्रि's picture

12 Dec 2012 - 11:23 am | सोत्रि

फोटोंसाठी एकच शब्द 'क्लास'!

-(गोवाप्रेमी) सोकाजी

जबरदस्त.. गोवा कोंकण म्हणजे वेगळं सुंदर, निसर्गरम्य वगैरे असं सांगायची गरजच नाही. कॅमेर्‍यातही उत्तम पकडले आहे..

प्रचेतस's picture

12 Dec 2012 - 12:06 pm | प्रचेतस

सुंदर.

किसन शिंदे's picture

12 Dec 2012 - 2:39 pm | किसन शिंदे

क्लास फोटोज!

१५ नंबरचा फोटो मी अगदी अस्साच घेतलाय वेंगुर्ल्यात. बोटीच्या धक्क्यावरुन घेतलाय ना?

जयपाल खुप दिसांनी दिसलात. माणसान नुसत असुन भागत नाही अधुन मधुन दिसावही लागत.

jaypal's picture

12 Dec 2012 - 5:57 pm | jaypal

अपर्णा, आग तो फोटो वेंगुर्ल्यातला नसुन दक्षिण गोव्याच्या एका "प" वरुन सुरवात होणा-या बीचचा आहे.
कामा धंद्याच्या व्यापात मिपावर पुर्वी सारखा वावर नाही राहीला याची मला पण बोच लागुन राहीली आहे.

jaypal's picture

12 Dec 2012 - 6:00 pm | jaypal

सोय परत सुरु करुन दिल्याबद्दल मिपा टीमचे आभार

कपिलमुनी's picture

12 Dec 2012 - 6:55 pm | कपिलमुनी

बीच आहे का ??

jaypal's picture

14 Dec 2012 - 5:32 pm | jaypal

तोच तो पालोलीम बिच अतिशय सुंदर बिच आणि स्वच्छ पाणी (येवढ स्वच्छ पाणी मी आजतागायत पाहील नाही)

पाळोळे असा खरा शब्द आणि उच्चार आहे अशी माझी समजूत आहे. दाभोळी, बांबोळी अशा शब्दांचे दाबोलिम बाम्बोलिम वगैरे झाले आहे अशीही लहानपणापासून समजूत आहे. पैकी कोंकणात असताना हे "ळ" युक्त उच्चारच ऐकले आहेत. शेवटचा म् हा सूक्ष्म उच्चारी अनुस्वारासारखा मात्र असतो.

कपिलमुनी's picture

18 Dec 2012 - 3:28 pm | कपिलमुनी

पाळोळे चे पालोलेम , पेडणे चे पेरनें असे उच्चार करतात !

दादा कोंडके's picture

18 Dec 2012 - 3:43 pm | दादा कोंडके

पण वर जयपाल यांनी लिहिलेलं 'बिच' बरोबर की कपिलमुनी यांनी लिहिलेलं 'बीच', हे पण सांगा की आता. ;)

अवांतरः हिरव्या लोकांनी अनेक चांगल्या शब्दाची वाट लावली आहे. साधी साधे शब्द वापरायला जीभ उचलत नाही. परवा मित्राच्या छोट्या मुलाला प्राण्यांची नाव शिकवताना, पुस्तकात कोंबड्याच्या चित्राखाली 'कॉक' लिहिलेलं असुनही त्याला तो 'रूस्टर' म्हणून सांगितलं मी. :)

मदनबाण's picture

12 Dec 2012 - 6:49 pm | मदनबाण

मस्त ! :)

प्रीत-मोहर's picture

12 Dec 2012 - 8:04 pm | प्रीत-मोहर

पांडवांतळप!!!!!!

ऑस्सम!!!! लव इट!!!

पैसा's picture

12 Dec 2012 - 8:15 pm | पैसा

फारच सुंदर फोटो! धन्यवाद रे जयपाला! मी तुला काही उत्तम ठिकाणे कळवते म्हटले पण ते काही कारणाने जमले नाही. लै वेळा सॉरी. आम्ही पण असेच एकदा मालवणला जाता जाता वेंगुर्ल्याला थांबलो आणि मग तिथेच राहिलो होतो. वेंगुर्ल्याचे फोटो काढले असशील तर नक्की टाक.

नंदन's picture

13 Dec 2012 - 12:12 pm | नंदन

>>> वेंगुर्ल्याचे फोटो काढले असशील तर नक्की टाक.
हेच लिहायला आलो होतो :)

जयपालशेठ, क्लास फोटो!

रेवती's picture

12 Dec 2012 - 8:43 pm | रेवती

अतिशय सुंदर चित्रे.

प्रभो's picture

12 Dec 2012 - 10:17 pm | प्रभो

भारी!!

५० फक्त's picture

13 Dec 2012 - 7:17 am | ५० फक्त

लई भारी फोटो,धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2012 - 7:54 am | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम... :-)

प्यारे१'s picture

14 Dec 2012 - 5:43 pm | प्यारे१

सरस...!

jaypal's picture

14 Dec 2012 - 5:47 pm | jaypal

आभार :-)

दादा कोंडके's picture

14 Dec 2012 - 6:09 pm | दादा कोंडके

फोटू सुंदर आले आहेत. पण धाग्याच्या नावात गोवा, समुद्रकिनारा वाचून अजुबाजूला कुणी नाही ना हे बघून धडपडत धागा उघडला आणि अपेक्षाभंग झाला. ;)

सौरभ उप्स's picture

19 Dec 2012 - 12:16 pm | सौरभ उप्स

मस्त आलेत फोटो, १२ नं चा विशेष आवडला......

एकुणएक फोटो जबरदस्त आहेत...