केव्हा तरी पहाटे...

एस's picture
एस in जे न देखे रवी...
10 Nov 2012 - 1:23 am

आकाश तारकांचा उतरून साज गेले
अर्धोन्मिलीत नयनी एक स्वप्न साजलेले

हा मंदगंध वारा विसरून तोच गेला
निष्पर्ण सावलीचे एक पर्ण तरंगलेले

बेधुंदल्या कळ्यांचे निःश्वास दाटलेले
उन्मीलनाचे स्वप्न स्वप्नात पाहिलेले

हलक्याच पावलांची ती वाट धुकटलेली
स्मृतिगंधल्या मनांचे हृदय स्पंदलेले

पौगंडल्या उषेचा प्रियकर नभी तो आला
थरारले अधरही, आरक्त गाल झाले

निस्तब्ध शांतताही विस्कटून सारी गेली
पंखांतली कुजबूज, आसमंत व्यापलेले

चेहर्‍यावरी बटांचे रेंगाळणे उगाच
निःश्वासही उगाच, उगाच कूस बदलणे

शराबल्या नजरेनं मनपक्षी कैद केला
पुन्हा त्याच मिठीत हरवून सारे गेले...

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मला कवितेतलं फारसं समजत नाही खरं.
पण 'आकाश तारकांचा उतरून साज गेले' ही प्रतिमा खूप आवडली.

माझ्या फार थोड्या मराठी कवितांपैकी ही एक. माझी आवडती. :)