सावलीत माझ्या

ज्ञानराम's picture
ज्ञानराम in जे न देखे रवी...
19 Oct 2012 - 9:53 am

सावलीत माझ्या , सुर्यही विसावला,

अमावस्येला आज , चंद्र कसा डोकावला ,

तु नसता समीप , पाऊसही सोकावला

विजेचे येता भान , मागे मग सरसावला

भिजवूनी चिंब धरतीला, , तोही मग सुखावला

ओटी भरुन हिरवी तिची , तो , क्षणभरी विसावला.

शृंगारकविता

प्रतिक्रिया

अक्षया's picture

19 Oct 2012 - 10:04 am | अक्षया

सुंदर कविता..

पिवळा डांबिस's picture

19 Oct 2012 - 10:28 am | पिवळा डांबिस

कै च्या कै कविता....
एकतर मीटरमध्ये आणि यमकात गंडली आहे, पण ते असो!
पण जर पाऊस धरतीला चिंब भिजवून सुखावला तर मग,
तू नसतांना तो कशाला सोकावला?
आणि विजेचे भान येताच का मागे सरसावला?
तो तर तो धरतीच्या मागे होता!!!!
:)

आणि शेवटचं,
ओटी भरुन हिरवी तिची , तो , क्षणभरी विसावला.
हे जराही पटत नाही.
आपल्यात स्त्रिया स्त्रियांची ओटी भरतात, पुरूष ओट्या भरत नाहीत!!!
:)
त्यापेक्षा,
उदरी भरून आवेग तिच्या, तो क्षणभरी विसावला
हे जास्त योग्य वाटलं असलं!!!!

असो. राग नसावा. पुढील कवितेस शुभेच्छा...

ज्ञानराम's picture

19 Oct 2012 - 10:48 am | ज्ञानराम

----/\---- आभार.