वसंततिलका

राजघराणं's picture
राजघराणं in जे न देखे रवी...
18 Oct 2012 - 9:52 pm

पूर्वसूत्र :

वसंततिलका

(वसंत ऋतू. (Spring) त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणी त भ ज ज ग ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. वसंततिलका वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने.(माझे म्रुत्युपत्र) ही सावरकरांची कविता होय. .)

कवितेचे नाव : वसंततिलका
वृत्त : वसंततिलका
कवितेचा विषय :वसंततिलका

(Spring) वसंत ऋतू. त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक. हा तिलक लावण्यासाठी; सृजनासाठी; जननासाठी पृथ्वी आतुर झाली आहे. वरुणदेवतेला साकडे घालते आहे........

.
.
.

हे देव हो; वरुणराजन; व्याकुळे रे
आसक्त होय अधरी; अवनी अधीरे
आरक्त नेत्र असती; अजली अश्रू रे
ती काय रूदन करी; न कळे तुला रे

.
.

1
.
.
.

ऐकू न ये तुज अत्रुप्त तहानलेली
पृथ्वीमुखे करुण आळवणी सुरू ही
फेके रसाल मग ती प्रणयी पलाश
हा कामदेव दिधला मधुगंधपाश
.
.
.
9
.
.
.
पाशात हा वारुणराज फसे पहा रे
प्रत्येक ही पुरुष आतुर होतसे रे
ते वारुणीय अबला बल तेज काही
अव्हेरणे वरुणराजन शक्य नाही
.
.
.

आव्हान नेत्र करतीच वसुंधरेचे
सौदर्य स्रौष्ठव भरीव गोल साचे
हे पृथ्वी गर्जुन असे नर धाव घेतो.
कामांध हा वरुण देवच दैत्य होतो.
.
.
.
7
.
.
.
हे अप्सरे गडगडाट नभांगणात
वीजा कडाडत तडाक प्रपात होत.
धारात नाहत धरा धर सुंदरा ती
धो धो पडे वरुण हा वरतो वरोनी
.
.
.
5
.
.
.
ते कोसळो धबधबे सरिता भराया
श्रृंगार शामल करेल वसुंधरेला
माजात हा वरुण पौरुष कार्य दावी
ती सुंदरा तृप्त धरा मम कारणेची
.
.
.
4
.
.
.
अद्यापि ना कळतसे प्रसवा धरेला
हा काय हो? सृजन शून्य वर्षाव झाला
आनंद हो प्रजननात कथे तयाला
कैसे? कधी? नवनिर्माण जमेल याला?
.
.
.
व्रुत्ती वसंततिलका न तुझी खुले का ?
.
.
2

डॉ. अभिराम दीक्षित

शृंगारअद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

18 Oct 2012 - 10:11 pm | डावखुरा

अरे वा वसंततिलका ही कविता पुर्ण कधी वाचायला मिळेल असे वाटलेच नव्हते. मराठीच्या पेपरसाठी फक्त 'व्रुत्ती वसंततिलका न तुझी खुले का ?' एवढे उदाहरण पाठ करुन जाय्चो.. :)

अर्धवटराव's picture

19 Oct 2012 - 1:51 am | अर्धवटराव

पण ते सर्वच चित्र लय भारी.

अर्धवटराव

शेवटच चित्र काय चित्र आहे राव? केव्हढा अर्थ भरलाय त्या चित्रात. अगदी हजार शब्द वर्णनार नाहीत एव्हढ एका चित्रात.

काव्य जरा तुटक वाटत पण तरीही तुमच्या बुद्धीमत्तेला सलाम.

जन्मात कधी वृत्त न जमणारी
अपर्णा

राही's picture

19 Oct 2012 - 8:08 am | राही

आपण वसंततिलका या वृत्ताचे उदाहरण म्हणून ज्या अर्थी ही कविता दिली आहे त्या अर्थी लघुगुरुक्रम आणि गणक्रम वृत्तानुसार योग्य साधलेले असणे प्राप्त ठरते.या कवितेत कमीत कम्री पाच वेळा ते चुकलेले आहेत.
चित्रे चांगली आहेत.

चौकटराजा's picture

19 Oct 2012 - 11:00 am | चौकटराजा

होई वसंततिलका तभजाजगागी
त भ ज ज ग ग

आयला ४५ वर्ष झाली वसंततिलकेला सोडून . चुकल्यास माफ करा राव !

मदनबाण's picture

19 Oct 2012 - 10:49 am | मदनबाण

कवितेला अनुरुप चित्र दिली आहेत ते फार आवडले. :)
शेवटच चित्र तर "अफलातुन" आहे. चित्रातला सॄजनशक्तीचा आविष्कार जबरदस्त आहे.

बाकी, वरुन दुसरे चित्र पाहुन नंतर या ओळी वाचल्या:- सौदर्य स्रौष्ठव भरीव गोल साचेलयं म्हणजी लयं त्रास झाला बघा ! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Oct 2012 - 10:58 am | अत्रुप्त आत्मा

:-)