अरे समस्त गुणी जनांनो, आता तरी जागे व्हा
देश विकायची वेळ देशद्रोह्यांनी आणली आहे.
लुळ्या पांगळ्या झालेल्या देशावर
भिक मागायची वेळ आणली आहे.
आता नाही तर कधीच नाही अस म्हणत
देश वाचायची वेळ आली आहे.
फुटीरपणाच्या निराशेचा विषप्याला रिचवत रिचवत
मरणासन्न झालेल्या देशाला,
एकसंध आशेचा जीवनप्याला पाजुन
नवसंजीवनी द्यायची वेळ आली आहे.
लाचलुचपत, सत्तांद्यपणा, जातियवाद, गरीबी,
ह्यामुळे पोखरलेल्या देशाला,
प्रामाणिकपणा, बंधुभाव, ईश्वरवाद, उदारपणा,
ह्यांचा चव्यन प्राश द्यायची वेळ आली आहे.
देशबुडव्या, दांभिक देशद्रोह्यांना हाकलुन लावत
देशप्रेमाची हाक द्यायची वेळ आली आहे.
अरे समस्त गुणी जनांनो, आता तरी जागे व्हा
देश विकायची वेळ देशद्रोह्यांनी आणली आहे.
अरे समस्त गुणी जनांनो......
प्रतिक्रिया
2 Oct 2012 - 6:42 am | चौकटराजा
मुक्त छंदातील कवितेने भावना पोचविल्यात पण शुद्ध लेखन केल्याक की काय ते?
भिक,अस ,पाजुन,सत्तांद्यपण,जातियवाद,चव्यन,हाकलुन या शब्दांबद्द्ल शंका वाटतेय ब्वॉ !
पु क शु
2 Oct 2012 - 12:15 pm | निश
चौकटराजा साहेब, पुढील वेळी नक्की काळजी घेण्यात येईल चुका न करण्याबद्दल.
कविता वाचल्याबद्दल व चुका दाखवल्याबद्दल मी आपला आभारी आहे व धन्यवाद.
8 Oct 2012 - 6:02 pm | निश
विचार स्वातंत्र्याचा विजय असो. माझी कविता ही उडवली जावी ही नम्र विनंती
9 Oct 2012 - 9:13 am | चौकटराजा
हीच कविता त्रस्त संमंधा शांत रहा किंवा" घर देता का घर" या स्टाईलने म्हणून पहा तुम्हाला निशुमाग्रज नावाच्या नव्या कवीचे दर्शन होईल. ते उडविण्याचा घाट कयापायी ?