.आत्ताच फेसबुकवर एक कॉन्स्पिरसी थिअरी वाचली.
गणपती झाले...
दसरा दिवाळी येत आहे.
मिष्टान व मिठाईचे दिवस..
विदेशी चॉकलेट्स चा खप वाढावा म्हणून आता खव्या वर धाडीचे सत्र सुरु होणार..
बनावटी खवा,.भेसळ युक्त खवा जप्त अश्या बातम्या झळकणार..
उद्देश हाच की चोकलेट्स भेट म्हणून द्या ..
पारंपारिक मिठाई नको...............................
म्हटलं आपल्याला अशा कॉन्स्पिरसी थिअर्या बनवता येतात का पाहू.
मी पण बनवल्या आहेत काही थिअर्या.
१. स्त्रीमुक्तीचा प्रचार सुरू झाला.
नोकरी करणारी स्त्री कशी थकते आणि तिच्याकडून मोदक, पुरणपोळ्या, दिवाळीच्या फराळाचे पदार्थ करण्याची अपेक्षा करणे कसे चुकीचे आणि अन्यायकारक आहे हे मध्यमवर्गीयांच्या मनावर बिंबवले गेले.
उद्देश हाच फराळ, मोदक, पुरणपोळ्या (आणि इतर खाद्यपदार्थ) करून देणार्या व्यावसायिकांचा धंदा चालावा.
२. पूर्वी सर्व लेखन, परीक्षेच्या उत्तरपत्रिका, बँकेचे चेक वगैरे फाउंटन पेनाने करावे लागत असे.
नंतर बॉलपेनाने लिहायची परवानगी दिली गेली.
उद्देश हाच की काळे आणि म्हात्रे या मराठी व्यावसायिकांचा धंदा बसावा.
३. स्वातंत्र्याच्या काळात नेत्यांकडून स्वावलंबनाची शिकवण दिली गेली.
लोक घरच्या घरी स्वतःच दाढी करू लागले.
उद्देश हाच की न्हावी समाजाचा व्यवसाय गोत्यात यावा. (गुरू नानकांचासुद्धा हाच उद्देश होता की काय ते ठाऊक नाही. इतक्या मागचा इतिहास तितकासा ज्ञात नाही).
पाहू सदस्यांना आणखी किती कॉन्स्पिरसी थिअर्या बनवता येतात.... ;)
प्रतिक्रिया
30 Sep 2012 - 2:10 pm | पैसा
कल्पना मस्त आहे! बघूया किती चित्र विचित्र थिअर्या मिळतात ते!
30 Sep 2012 - 2:31 pm | श्रावण मोडक
थत्ते लिहू लागले. निवडणुका जवळ आल्या वाटतं... कॉंग्रेसचा प्रचार झाला सुरू. :-)
30 Sep 2012 - 3:19 pm | पुण्याचे वटवाघूळ
आपल्याला प्रसिध्दी मिळावी म्हणून नर्मदेवरील धरण बांधायची कल्पना मेधा पाटकर आणि नर्मदा बचाओवाल्यांनीच आणली. म्हणजे त्याविरूध्द आंदोलन करून थोडीफार प्रसिध्दी मिळेल. नाहीतर यांना कोण विचारणार होते? (ही थियरी म्हणून लिहिली असली तरी त्यात बरेच तथ्य आहे असे मला वाटते.)
पाकिस्तानी सैन्याला काश्मीर प्रश्न सोडवायचा नाहीच.कारण त्याचे भांडवल करोन पाकिस्तानातील राजकारणात स्वतःच्जे महत्व राखता येईल. काश्मीर प्रश्न सुटला तर पाकिस्तानी सैन्याला पाकिस्तानात कोण विचारणार आहे?
30 Sep 2012 - 3:31 pm | दादा कोंडके
त्यांची भुमिका हटवादी वगैरे वाटेल, पण ज्यांनी ते आंदोलन १% जरी बघितलं असेल तर प्रसिद्धीसाठी एव्हड्या खस्ता कोणी खाईल असं वाटत नाही.
1 Oct 2012 - 3:23 pm | पुण्याचे वटवाघूळ
हे तुम्हालाही कळले असेलच. नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्यांनी झोपडपट्ट्यांच्या डिमॉलिशनच्या वेळी धाऊन जाणे, स्वतः कोअर टिम अण्णामध्ये सामील नसूनही अण्णांच्या २०११ मधील उपोषणाच्या इव्हेन्टच्या वेळी स्टेजवर जाऊन पुढेपुढे करणे, आपल्याविरूध्द गुजरातमध्ये राग आहे हे पक्के माहित असूनही ऐन दंगलींच्या वेळी तापलेल्या वातावरणात मुद्दामून गुजरातमध्ये जाणे आणि मग चार-दोन दगड बसल्यावर हुतात्मा बनल्याचा आव आणणे असले प्रकार करून प्रसिध्दी लोलुपपणात आपण मंत्र्यांच्या पेक्षा थोडेच मागे आहोत हे दाखवून दिले आहेच. याच नेत्या झोपडपट्टीच्या प्रश्नावरून पहिल्यांदा उपोषणाला बसल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करणार असा राणा भीमदेवी थाट पहिल्यांदा आणला होता.पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यावर चार-पाच दिवसांनी यांचेच समर्थक मंत्रालयात मुख्यमंत्री नाही तरी कॅबिनेट मंत्री तरी पाठवा, कॅबिनेट मंत्री नाही तर राज्यमंत्री पाठवा, राज्यमंत्री नाही तर निदान मुख्य सचिव पाठवा आणि मुख्य सचिव नाही तर निदान कनिष्ठ सचिव पाठवा इतके खाली आले होते हे मंत्रालयात कामाला असलेल्या आमच्या नातेवाईकांकडून मला कळले आहे. या प्रकाराला प्रसिध्दीला हपापले असणे असे म्हटले तर काय चुकले?
यातूनच या नेत्यांचा खरा नर्मदा धरणाला खरा पाठिंबा आहे पण प्रसिध्द्दी मिळवायला त्यांनी नर्मदा बचाओ आंदोलन सुरू केले आहे अशी कॉन्स्पिरसी थियरी बनवाविशी वाटली.
2 Oct 2012 - 1:26 am | दादा कोंडके
उपरोध मला समजलेला होता.
वरच्या प्रतिसादात चार्-पाच वाक्य लिहिली होती पण प्रकाशीत केल्यावर गायब झाली. मायग्रेशन केल्यामुळे काही ढेकूण आहेत असं वाटतं. (सुचनेच्या धागा सुचना लिहिणार्यांशिवाय कुणीही वाचणार नसल्याची खात्री असल्यामुळे तिथं लिहिलं नाही. ;))
गमती-जमतीचा धागा असला तरी याबद्द्ल माझं मत मांडतो.
नर्मदा टीमचं आंदोलन मी जवळून बघितलं नाहिये. टिव्ही, वृत्तपत्र, चर्चा, इथंच मिपावर श्रामोंचे धागे वाचून वगैरे माहित झालंय. तुमचं लोकप्रसिद्धीबद्द्ल म्हणणं मान्य करूनही त्यांनी जे सोसलं/सोसत आहेत त्यावरून तो वखवलेपणा वाटत नाही तर भगतसिंग मधल्या पंडीतनी बोलून दाखवलेली, "एक हम है जो देश के लिये मरते है, मारते है और किसीको कुछ पता नही चलता है, और एक ये है की छिंकते भी है तो पुरे देश को सुनाई देता है." अशी सल वाटते.
30 Sep 2012 - 3:34 pm | सहज
चायनीज बनावटीचे प्लॆस्टिक आकाशकंदील व अन्य वस्तु खपाव्या म्हणून कागद वापरल्याने पर्यावरणाची हानी होते असा प्रचार चालू झाला.
राहुलचे मोडके तोडके का होईना पण बोलणे आवडावे म्हणुन मनमोहन यांना मौन ठेवायला लावले गेले.
ट्रायबल लोकांच्या अतिप्रगत भाषांमुळे भांडवलशाहीला धोका पोहचू नये म्हणुन ट्रायबल लोकांना देशोधडीला लावायच्या योजना बनवल्या गेल्या.
24 Nov 2015 - 4:26 pm | नया है वह
30 Sep 2012 - 5:02 pm | तिमा
१. 'मिस वल्ड' स्पर्धेत मागे, काही वर्ष, सतत भारतीय स्त्रिया जिंकल्या.
त्यामुळे भारतात महागडी कॉस्मेटिक्स विकण्याची संधी बहुद्देशीय कंपन्यांना मिळाली आणि त्यांचा भरमसाठ फायदा झाला.
२. नितीन थत्ते कायम काँग्रेसच्या बाजूने लिहितात.
कारण खरे ते काँग्रेसविरोधी आहेत. पण असे लिहिल्याने त्यांना भरपूर काँग्रेसविरोधी प्रतिक्रिया वाचायला मिळतात आणि ते खूष होतात.
३. मिपावर तोंडाला पाणी सुटेल असे, चमचमीत पदार्थ फोटोसकट छापले जातात.
हल्ली मिपाची मेंबरशिप मिळणे दुरापास्त झाली आहे. असे पदार्थ बघितल्याने जीभ चाळवली जाऊन जाड मेंबर भरमसाठ खातील. त्यामुळे ते लवकरच मिपावरुन(या जगातूनच) एक्झिट घेतील आणि नवीन मेंबरांना चान्स मिळेल.
30 Sep 2012 - 6:09 pm | पुण्याचे वटवाघूळ
नितीन थत्ते कायम काँग्रेसच्या बाजूने लिहितात.
कारण खरे ते काँग्रेसविरोधी आहेत. पण असे लिहिल्याने त्यांना भरपूर काँग्रेसविरोधी प्रतिक्रिया वाचायला मिळतात आणि ते खूष होतात.
हे खूप आवडले.
24 Nov 2015 - 6:08 pm | बॅटमॅन
हा हा हा, एकच नंबर. हे खूप अवडले.
30 Sep 2012 - 5:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय. प्रकरणं आहेत मजेशीर. :)
-दिलीप बिरुटे
30 Sep 2012 - 6:04 pm | दादा कोंडके
कॉप्युटर अँटीवायरस तयार करणार्या कंपन्याच वायरस तयार करतात हे तर उघडच आहे. पण हे काँप्युटरपर्यंतच सिमीत नाहिये.
मोठमोठ्या औषधं तयार करणार्या कंपन्या स्वाइन फ्लु, बर्ड फ्लुचे विषाणू तयार करत आहेत म्हणे (कॉर्पोरेट जैवीक युद्ध). याच विषयावर अनेक इंग्रजी चित्रपट पाहिल्याचेही स्मरते.
30 Sep 2012 - 9:26 pm | पिवळा डांबिस
चंद्राचे फोटो आणि माहिती अमेरिकेने आणि रशियाने पब्लिकसाठी उघड केली. तिथे दगडधोंड्यांशिवाय काहीही नाही म्हणॅ....
पण हा सगळा अमेरिका-रशियाचा कावा आहे, भारताने चंद्रावर माणूस पाठवू नये म्हणून!
चंद्राच्या न दिसणार्या भागात युरेनियमचे साठे आहेत, ते भारताला मिळू नयेत म्हणून!!!
:)
भारतीय स्त्रियांच्या सुगरणपणाबद्दल पाश्चात्य स्त्रियांना असूया आहे. आपलं पाककौशल्या वाढवण्यापेक्षा भारतीय स्त्रियांचं पाककौशल्य त्यांना कमी करायचं आहे....
म्हणून तर भारतीय आयटी व्यवसायात इतक्या स्त्रिया घेतल्या आहेत!!!!
:) :)
आणि शेवटी,
मिपावरची जुनी मेंबरं नव्यांना पुढे येऊ देत नाहीत. नवीन मेंबरांच्या सर्वच्या सर्व लिखाणाचं तोंड फाटेपर्यंत कौतुक करायचं (मग दर्जा काहीही असो!!!) मुद्दाम टाळतात....
नवनवीन लिखाण यायला लागलं तर यांचं कोण वाचणार?
:) :) :)
1 Oct 2012 - 10:10 am | राजेश घासकडवी
>>चंद्राच्या न दिसणार्या भागात युरेनियमचे साठे आहेत, ते भारताला मिळू नयेत म्हणून!!!
त्या भागात तुमची लई मोठ्ठी प्रॉपर्टी आहे, तेव्हा तिची किंमत वाढावी म्हणून तुम्हीच असल्या भलत्यासलत्या अफवा पसरवत आहात अशी माझी थियरी आहेे.
1 Oct 2012 - 7:34 am | कपिलमुनी
भारतीय ज्योतिष्यांचा धंदा बसावा म्हणूनच अमेरिका मंगळावर यान पाठवत आहे !!
1 Oct 2012 - 10:19 am | sagarpdy
पुण्यातले (अथवा अन्य शहरातील) अनेक रस्ते एकपदरी करण्याचे मूळ कारण पेट्रोल पंपांचा व ट्राफिक पोलिसांचा धंदा वाढवणे हे आहे.
1 Oct 2012 - 11:28 am | गवि
नाही. खरी आतली गोष्ट ऐका. जंम आणि फर्ग्यु या रस्त्यांवर प्रामुख्याने दाक्षिणात्य माणसांची महागडी हॉटेले आहेत (असं मराठी व्यापारी लॉबीच्या एका गुप्त सर्व्हेमधे सिद्ध झालेलं आहे). मुख्यतः हे रस्ते एकमार्गी करण्यामागे त्यांचा धंदा अर्ध्यावर यावा आणि पुलाच्या अलीकडील मराठी प्राबल्य असलेल्या दुकानांचा धंदा वाढावा अशी मराठी लॉबीची ही खेळी आहे...
1 Oct 2012 - 11:24 am | गवि
-रेल्वेचे अपघात खरोखरच्या "अपघाता"ने कधीच होत नाहीत. ब्रिटिशांनी पूर्ण अॅक्सिडेंट प्रूफ रेल्वे डिझाईन केली आहे हे रहस्य फक्त रेल्वेमंत्र्यांना आणि भारताच्या पंतप्रधानांना ठाऊक असते.
मुद्दाम रेल्वेचे अपघात घडवून तिला भंगार आणि सरकारच्या हाती असुरक्षित ठरवून खाजगी कंपनीच्या घशात भारताच्या रेल्वेचं जाळं घालण्याचा हा फार मोठा डाव आहे.
*मलायनर नावाची अनेक देशांनी नाकारलेली सदोष विमानं भारताच्या भ्रष्ट सिस्टीममुळे आपल्या गळ्यात मारली जात आहेत. अन्य प्रगत देशांत मात्र याची निर्दोष हाय क्वालिटी व्हर्शन दिली जाते आहे. भारतातील विमानव्यवस्था अतिरिक्त अपघातांनी खिळखिळी करुन ताब्यात घ्यायची (भंगार दरात गुंतवणुकीच्या मार्गाने) असा अमेरिकेचा डाव आहे.
-(सर्व प्रतिसाद मूळ धाग्याच्या काँटेक्स्टमधे घेतले जातील अशी आशा असलेला) गवि
1 Oct 2012 - 11:29 am | रमताराम
एक वैज्ञानिक(?) कॉन्स्पिरसी थियरी रामसेतू वगैरेबाबत बोलणार्यांकडून ऐकलेली. 'जिथे समुद्रतळ खणून समुद्रीप्रवासयोग्य करायचा प्रस्ताव होता तेथील खडकात असलेले 'आपले' थोरियम अमेरिकेला पळवून न्यायचे आहे... म्हणे. लैच करमणूक झालेली आपली.
1 Oct 2012 - 1:33 pm | राजघराणं
१) ९\११ अमेरिकन सरकार्नेच घडवले; कारण त्यांवर शस्त्रविक्रेत्या ज्यू कंपन्यांचा दबाव होता !
२) मॅकोलेने भारतीयांना गुलाम बनवणारा अभ्यासक्रम बनवला
३) नेहरू गांधी घराणे मुसलमान आहे
४) सोनियाला देश ख्रिश्चन करायचाय
1 Oct 2012 - 2:23 pm | मालोजीराव
अनपेक्षितपणे २१ डिसेंबर २०१२ ला जगबुडी होणार नाही,त्यामुळे सप्टेंबर २०१३ या महिन्यात सर्वात जास्त मुले जन्माला येतील ! ;)
1 Oct 2012 - 2:47 pm | सहज
काँग्रेसच्या चाचा नेहरु यांचा जन्मदिन, बालदिन म्हणुन प्रसिद्ध असल्याचा जळफळाट झाल्याने शिवसेना व्हॅलेंटाईन्स डेच्या विरुद्ध आहे
1 Oct 2012 - 3:41 pm | sagarpdy
फुटलो !
1 Oct 2012 - 11:32 pm | संजय क्षीरसागर
दोन जबरदस्त कॉंस्पिरसीज आहेत
डायबेटीकला आपल्या पॅंक्रिअस कधीही पूर्ववत होऊ शकणार नाहीत, ही डिसऑर्डर आपल्याबरोबरच संपणार असा भ्रम करुन दिला गेलाय. इंशुलीन घेत नेहमी चेक-अप करत रहावे लागेल अशी धास्ती घातलीये.
हृदयरोगाचं तर असं काही गौडबंगाल आहे की एखाद्याला दम लागायला लागल्यावर तो कार्डिओकडे गेला तर ऐंशी-नव्वद हे स्टँडर्ड ब्लॉकेज असतं.
वास्तविकात, प्राणायाम, पोटावर प्रेशर येणारी योगासनं आणि निव्वळ भूकेनं खाणं या त्रिसूत्रीनं, सगळं पूर्ववत होतं.
प्राणायमानं हृदय एकदम सिस्टीमॅटीक बीट द्यायला लागतं, प्राणवायुच्या योग्य पुरवठ्यानं उत्साह येतो. त्या उत्साहनं इंडोक्राईन सिस्टम व्यवस्थित सक्रिय होते; पॅंक्रिअस पुन्हा सक्षम होतात.
ते झाल्यानं फिजिकल अॅक्टीविटी करावीशी वाटते, मग तुम्ही फिरायला वगैरे जाऊ लागता. पूर्वी जे शारीरिक कष्ट नकोसे वाटायचे (प्राणवायु कमी पडल्यानं) ते आता संधी वाटतात. त्यामुळे आरोग्य उत्तम राहतं आणि सगळा धसका संपतो.
2 Oct 2012 - 9:18 am | इरसाल
सासुवरील राग सेटल(स्कोर सेटल) करण्यासाठी आई आपल्या मुलाचे लग्न करुन देते. म्हणते की तुझ्या आवडीची मुलगी करुन आण.(नंतर त्याच्या डोक्यावर खापर फोडायला बरे)
बायकोवरील राग सेटल(स्कोर सेटल) करण्यासाठी बाप आपल्या मुलाचे लग्न करुन देतो. म्हणतो की तुझ्या आणी तुझ्या आईच्या* आवडीची मुलगी करुन आण.(सुन -सासुच्या भांडणात * ला दोष द्यायला मोकळे)
3 Oct 2012 - 1:36 am | मराठे
आज सी एन एन वरच्या एका बातमीच्या खालील प्रतिक्रियेत वाचलेली थियरी:
पोलियो, टीबी, पिवळा ताप यांसारख्या रोगांवर लसी निघाल्या आहेत कारण या रोगांच्या औषधांमधे काही फायदा नाही. मात्र कँसर, एडस् सारख्या मातब्बर रोगांमागे भरपूर कमाई करता येत असल्या मुळे त्या रोगांसाठी लसी बनवण्यात कुठल्याही कंपनीला स्वारस्य नाही. (
3 Oct 2012 - 6:09 pm | गणपा
गमतीशीर धागा.
टँकरलॉबीचे उखळ पांढरे करण्यासाठीच म्हणे गावा गावत नळ पोहोचले पण पाणी नाही.
आणि इव्हर्टरवाल्यांचा धंदा बसु नये म्हणुन महाराष्ट्रत विद्युत भारनियमन नियमीतपणे चालु आहे.
3 Oct 2012 - 6:53 pm | रमताराम
गणपा हा आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांचा हस्तक आहे. म्हणूनच तो नेहमी नवनवीन पदार्थ म.आ.जालावर टाकून लोकांना सतत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला उद्युक्त करतो, ज्यातून त्यांचे पोट बिघडते. आयुर्वेदाच्या नियमानुसार प्रत्येक आजाराचे मूळ पोटात असते. त्यामुळे लोकांना विविध आजार होतात नि त्यांना औषधोपचारांची गरज पडते आणि या कंपन्यांची औषधे खपतात. (परवाच गणपा गुप्तपणे खासगी विमानाने स्वित्झर्लंडला जाऊन आला असे आमच्या गुप्तहेर खात्याने कळवले आहे.)
3 Oct 2012 - 7:11 pm | गणपा
अंदाज थोडक्यात चुकला. ;)
3 Oct 2012 - 7:14 pm | sagarpdy
>> प्रत्येक आजाराचे मूळ पोटात असते
काही आजारांचे मूळ आणखीनच कुठेसे** असल्याचे ऐकले.
(**हे कुठे याचा शोध आपला आपण घ्यावा.)
3 Oct 2012 - 7:36 pm | विकास
हा धागा आत्ता पाहीला. श्रामो आणि तिरशिंगरावांशी (नितिनरावांसंदर्भात) एकदम सहमत! :-)
>>> स्वातंत्र्याच्या काळात नेत्यांकडून स्वावलंबनाची शिकवण दिली गेली. लोक घरच्या घरी स्वतःच दाढी करू लागले. <<
यावरून थोडे अवांतर. विकांताला एका ज्येष्ठ पत्राकारास भेटण्याचा योग आला होता. त्यांनी आधीच्या काळात वैचारीक विरोध असला तरी राजकारणी एकमेकांचा द्वेष कसे करत नसत हे सांगताना एक गोष्ट सांगितली. पुण्यात स्वातंत्र्यचळवळीत येरवडामधे यशवंतरावांसापासून एस एम जोशींपर्यंत सर्वजण एकाच वेळेस होते. सर्वांना सक्त मजुरीची कामे होती. मात्र एसएम हे तब्येतीने कृश असल्याने त्यांना सोपे काम दिले होते. इतरांची दाढी कशी करायची हे शिकवून त्यांना या सर्व राजबंद्यांची रोज दाढी करायला लावत ! कालांतराने संयुक्त महाराष्ट्रात चव्हाण मुख्यमंत्री तर एस एम विरोधीपक्ष नेते झाले. एस एम नी चव्हाणांना कुठल्यातरी मुद्यावरून एकदा चांगले धारेवर धरले होते. तेंव्हा यशवंतराव त्यांना मिष्कीलपणे म्हणाले, "अहो तेंव्हा केली तेव्हढी (चंपी) पुरेशी झाली नाही का?"
5 Oct 2012 - 1:07 pm | आनन्दा
ही थिअरी पहा.. या सार्यांची महाराणी
http://asfak-ur-rahman.blogspot.in/2011/11/sunita-williams-did-not-accep...
6 Oct 2012 - 1:47 am | अर्धवटराव
अफवा किती उफ्फ-वाह असु शकते याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण...
अर्धवटराव
6 Oct 2012 - 11:06 am | इरसाल
रॉबर्ट वाड्रावर हे आळ घेणार आहेत म्हणुन व आपला हप्ता बंद होवु नये म्हणुन अण्णांनी केजरीवालांची साथ सोडली.
12 Oct 2012 - 5:20 pm | दादा कोंडके
आता दुवा हाताशी नाही, पण माझ्या एका पाकिस्तानी सहकार्याने लेख दाखवला होता. त्यात तेंडूलकरला 'महान' बनवण्यासाठी सर्व वरीष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी निगडीत लोकांनी कसा प्रयत्न केला आहे ते लिहिलं आहे. इतर गरीब देशातले (पकिस्तान, झिंबाब्वे वगैरे) खेळाडूंनी सुरवातीला सचिनपेक्षा उत्कृष्ठ कामगिरी केली असली तरीही त्यांना पद्धतशीरपणे क्रिकेट बाहेर ठेवलय किंवा उपेक्षीत ठेवलय हे आकडेवारी दाखवून सिद्ध केलं होतं. याचं कारण म्हणजे अर्थकारण. भारताच्या लोकसंख्येमुळे आणि (त्यातल्यात्यात पाकिसानपेक्षा वगैरे) त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे क्रिकेटच्या लोकप्रियतेसाठी महान खेळाडू भारतीय असणं मह्त्वाचं आहे.
मागच्या एक-दिडशतकात क्रिकेटचं पैश्यापायी जे काय करून ठेवलंय ते बघून ही थेअरी वाचून गंमत वाटते. :)
12 Oct 2012 - 5:52 pm | इरसाल
तुम्हाला एक-दीड दशक म्हणायचे असावे
12 Oct 2012 - 6:47 pm | दादा कोंडके
व्हय जी!
स्वसंपादनाची सोय कधी होणार आहे काय माहिती?
24 Nov 2015 - 5:37 pm | मम्बाजी सर्वज्ञ
ह्याला काही तोड आहे काय?
https://www.youtube.com/watch?v=-9Jp_XCvVto
24 Nov 2015 - 6:00 pm | सागरकदम
राकू मुळे सर्व संपादक मंडळाने त्याग पत्र दिले
24 Nov 2015 - 7:09 pm | मम्बाजी सर्वज्ञ
हा 'राकू' प्रकार काय आहे? २/३ ठिकाणी वाचले पण काही संदर्भ लागत नाही.
24 Nov 2015 - 6:26 pm | DEADPOOL
साहित्यिकांनी पुरस्कार परत केले!
त्यांनी त्यांचे साहित्य पुन्हा वाचले म्हणून!!!!!!!!
24 Nov 2015 - 7:06 pm | 'पिंक' पॅंथर्न
का , लोकांनी पुन्हा वाचावे म्हणुन..... अडगळीत गेलेले साहित्य ? खी खी खी.....
25 Nov 2015 - 6:10 am | जयन्त बा शिम्पि
नरेंद्र मोदी यांनी श्री मोहन भागवतांना , एकदाही परदेशी नेले नाही म्हणुन , बिहार निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा शोधून काढला.
25 Nov 2015 - 6:48 am | बाजीप्रभू
आई म्हणायची लग्न करून मोकळा हो बघू!! आम्ही तर पैदाशी येडचाप!! लग्न करून अजूनच अडकलो… थोडक्यात स्वतःला मोकळं होण्यासाठी दुसऱ्याला अडकवण्याची पेरेंट लोकांची हि एक कॉन्स्पिरसी हाय.
27 Aug 2017 - 1:34 am | वाल्मिकी
वर आणला
5 Jul 2018 - 11:53 am | माहितगार
अरे व्वा धागा लेखकांस काँस्पीरसी थेअरी या विषयावर विशेष कौशल्य अवगत आहे ह्याची कल्पना नव्हती, या निमीत्ताने झाली हे बरे झाले.
गेल्या महिल्यात वॉल्ट डिस्नेची मालकी असलेल्या टिव्ही सिरईयल कंपनी television studio ABC ने ‘The Blood of Romeo’ (Quantico ) या मध्ये भारतीय राष्त्रवादी जे आहेत ते पाकीस्तानचे नाव गोवण्यासाठी आमेरीकेत अणूबाँबघेऊन दहशतवादी कट की कारवाई करतात अशी काँन्स्पिरसी थेअरी दाखवली म्हणे. सोशल मिडीयावर टिका झाल्या नंतर television studio ABC आणि प्रियांका चोप्राने माफ्या मागितल्या. म्हणे. याची मिपावर काही चर्चा दिसली नाही . असा धागा आहे तर लक्ष वेधावे म्हटले.