आई.....

झंम्प्या's picture
झंम्प्या in जे न देखे रवी...
27 Sep 2012 - 3:17 pm

आई.....
थोडा वेळ बस अशी शेजारी...
थोडं बोलायचय तुझ्याशी...

कित्ती दिवस झाले न तुझ्या कुशीत नाही झोपलो...
ना तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं

कित्ती दिवस झाले तुझी बोटं नाही फिरली केसातून...
आणि कित्ती दिवस झाले तुझ्या पदराला जेवल्यानंतर हात पुसून...

बरेच वर्ष मला हे सार कधीच जाणवलं नाही
आणि जाणवल्यावर मात्र अस कधी सांगताच आलं नाही...

म्हणून आई आज थोडा वेळ बस अशी शेजारी... थोडं बोलायचय तुझ्याशी...

आई...
आज तुला रडताना पाहिलं
आणि... आणि जाणवलं....
सगळ्यांच्या अपेक्षांचे ओझं वागवणं एवढं सुद्धा सोप्पं नसतं... जेवढं ते दिसत...

तुझ्या दुखणाऱ्या कमरेकडे पाहून जाणीव झाली की
हे घर कस पेललं असशील तू तुझ्या पाठीवर

आयुष्याच्या रणरणत्या उन्हात...
आई तुझ्या जीर्ण पदराची सावली आजही खूप दाट वाटते गं...

आई...
आई... किती गं सहन केलंस तू सगळ्यांसाठी...
स्वतःच्या इच्छा मारून कष्टाचा डोंगर उपसलास आमच्या साठी
आमची पोटं भरावी म्हणून कित्तेकवेळा तू अर्धपोटी झोपलीस
आमच्या डोळ्यांची झोप चाळवू नये म्हणून कित्तीतरी रात्री तू जागलीस

आम्हाला गरम गरम पोळी खाऊ घालताना
तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही नेहमीच पाहिला गं आई...
पण... पण त्या बनवताना तुझ्या हाताला बसलेले चटके...
आज तुझ्या हातावरचे ते व्रण पाहताना जाणवले...

कित्ती आधार वाटतो सगळ्यांनाच तुझा....
अडचणीतून तू नक्की मार्ग काढशील हा विश्वास असतो आमचा

मनातील स्वप्नं डोळ्यात सुरु होऊन गालावरच सुकली असतील तुझ्या
आणि माझ्याकडे मायेनं पाहताना भोगल्या यातना आसवांमध्येच विरघळलेल्या असतील तुझ्या

कसे गं फेडू हे तुझे उपकार आई...
त्यासाठी मला सात जम्नही पुरणार नाही...

आई...
आज थोडावेळ कुशीत झोपूदे
पुन्हा एकदा मोकळा श्वास घेउदे...

करुणमुक्तक

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2012 - 3:23 pm | प्रभाकर पेठकर

फार हृदयस्पर्शी, भावनांनी ओथंबलेली, मातृप्रेमाचे कढ असणारी, व्यथित मुलाची/मुलीची कविता.

कधी त्या बापुड्या वडीलांकडेही लक्ष द्या. 'दमलेल्या बाबांच्या' आठवणीने व्याकुळ व्हा.

ज्ञानराम's picture

29 Sep 2012 - 10:37 am | ज्ञानराम