आई...!
तुला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या होत्या
तुला खूप हसू आलं असतं ऐकून
तुझ्याशिवाय दुसर्या कुणाला यात रस नाही
आणि असला तरी कुणी तुझ्यासारखे समजून घेणार नाही आई
समजून घेतले तरी त्यात काही मजा नाही वाटणार त्यांना...
तुला सांगायचं होतं की आज सकाळी चहा करताना
साखरेऐवजी मीठ घातलं मी
पण कुणीच म्हटलं नाही, तू असा ढ च राहशील
तुला नाही जमणार चहा, बाजूला हो, मी करते...!
आई, तुला सांगायचं होतं की आज बाबांना
मी पाणीपुरी खाऊ घातली, जे ती कधीच खात नाहीत
आणि किती मजा... सगळे पाणी तर
बशीतच सांडले... पाणीपुरी तोंडात घालण्याआधीच
तुला सांगायचे होते की
तो गल्लीच्या कोपर्यावरचा दुकानदार नाहीये आता
छोट्या दाढीचा... जो साबणाचा एक रुपया जास्त घ्यायचा
बेईमान... पण त्याला कधी कुणी समजावलं नाही
की करशील तसं भरशील... एका रुपयासाठी जीव घालवू नको...
आई, तू नेहमी रागवायचीस ना
कि सगळ्या विषयांच्या वह्यांची मागची पानं मी कवितांनी का भरून टाकतो
आता पहा, किती लोक बोलावतात मला याच कविता ऐकवायला.. मला...
बघ ही शाल देखील दिली आणि...
तुला माहीत आहे ना आई मी भाषण किती छान देतो
मोठमोठी संमेलनं, सभा, चर्चासत्रांना जातो...
उदारमतवाद, बाजारीकरण, परदेशी पैसा, शिक्षणाची गरज... सारं बोलतो
मोठमोठे लोक ऐकतात... मोठमोठ्या गोष्टी बोलतो...
फक्त छोट्या गोष्टी ऐकण्यासाठी कुणी नाहीये आई
तू तर छोट्या छोट्या गोष्टींनी किती खुश व्हायचीस
मोठमोठ्या गोष्टी जगण्याचा देखावा करण्यासाठी बर्या असतात
पण जगणे तर या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असते ना...
तू ऐकलं असतस तर तुला किती मजा वाटली असती प्रत्येक गोष्टीची
तू ऐकलं असतस तर मला किती मजा वाटली असती जगताना...
तू कांदा चिरायला सांगायचीस... तेव्हा रडू यायचं चिरताना
अजूनही रडू येतं आई... कांदा चिरता... चिरता....
किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत आई.
जगणं तर छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असतं... तुला तर माहीत आहे ना आई...
तू ऐकलं असतंस तर... तू ऐकून तरी घेतलं असतंस ना एकदा...
प्रतिक्रिया
23 Sep 2012 - 2:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुवाद आवडला.
-दिलीप बिरुटे
24 Sep 2012 - 1:09 pm | मूकवाचक
+१
23 Sep 2012 - 3:04 pm | प्रचेतस
अनुवाद सुरेख.
23 Sep 2012 - 3:10 pm | किसन शिंदे
आवडलं.
23 Sep 2012 - 3:38 pm | बॅटमॅन
हे उत्तम जमलंय.
23 Sep 2012 - 3:46 pm | पैसा
माणूस कितीही मोठा झाला तरी आई आणि मुलाचं नातं तेच रहातं आणि आई आपल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ऐकून घेते ही भावना मस्त उतरली आहे. अनुवाद आहे असं वाटत नाहीये इतकं सुरेख!
23 Sep 2012 - 5:26 pm | सस्नेह
अतिशय सुरेख आशय. अनुवाद चांगला झालाय.
23 Sep 2012 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या अनुवादित कविता वाचत असतांना 'कवितान्तरण' या चंद्रकान्त पाटलांच्या पुस्तकांची आठवण झाली.
आपल्या सुरेख अशा अनेक अनुवादाचं एखादं पुस्तक आम्हा वाचकांना मिळेल यात काही वाद नाही.
फक्त एक विनंती बघा जमले तर, अनुवाद ज्या मुळ कवितेचा आहे ती कविता जर टाकता आली तर आम्हा वाचकांना दोन्ही कवितेचा आनंद घेता येईल. अर्थात हिंदी-इंग्रजी कविता असेल तर थोडीफार कळेल. बाकी, भाषेत असेल तर आमचा पास. :) पण इतर आपल्यासारखाच कोणी भाषेचा जाणकार असेल तर त्यांनाही त्याचा आनंद घेता येईल.
-दिलीप बिरुटे
24 Sep 2012 - 2:32 pm | Kavita Mahajan
पाटील सरांचे काम खूप मोठे आहे. मी त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही. त्यांच्या पाठबळानेच अनुवादाचे काम लेखनासोबत करण्याचं धाडस मी करू धजले. अन्यथा कवितेचा अनुवाद ही फार अवघड गोष्ट आहे. निर्मला पुतुल यांच्या संथाळी भाषेतील ३ कवितासंग्रह आणि लिलाधर जगुडी यांचा 'अनुभवाच्या आकाशात चंद्र' हा हिंदी कवितासंग्रह मी मराठीत केला. हे काम पाटील सरांनीच तपासून दिले होते. कवितेविषयी त्यांनी लिहिलेली डायरीतील काही पाने एका दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ती तुम्ही पाहिलीत का? खूपच चांगला आणि आपल्याला विचारप्रवण करणारा असा तो मजकूर आहे.
24 Sep 2012 - 11:45 am | Kavita Mahajan
छोटी छोटी बातें
-------------------------------------
मां....!
बहुत छोटी छोटी दो चार बातें कहनी थीं तुमसे
तुम्हें बहुत हंसी आती सुनकर
तुम्हारे सिवा किसी दूसरे को इससे मतलब भी नहीं
होगा भी तो कोई तुम जैसा समझ नहीं पाएगा मां
समझेगा भी तो मजा नहीं आएगा उसे.......
तुम्हें बताना था कि आज सुबह चाय बनाते हुए
चीनी की जगह नमक डाल दिया मैंने
पर किसी ने नहीं कहा, तू बुद्धू ही रहेगा
तुझसे नहीं बनेगी चाय, हट मैं बनाती हूं....।
मां, तुम्हें बताना था कि आज पिता को
मैंने गोलगप्पे खिला दिए
जो वे कभी नहीं खाते...और कितना मजेदार कि सारा पानी तो
प्लेट में ही ही निकल गया
गोलगप्पा मुंह में रखने से पहले....
तुम्हें बताना था कि
वो जो गली के नुककड़ की दुकान वाला नहीं है,
छोटी छोटी दाढ़ी वाला....उसने साबुन में एक रुपया ज्यादा काट लिया,
बेईमान कहीं का....
पर किसी ने नहीं समझाया कि
करेगा सो भरेगा....तू एक रुपये के लिए जान मत दे....
मां, तुम हमेशा डांट लगाती थीं ना
कि हर सब्जेक्ट की कॉपी के पीछे वाले पन्ने कविताओं से क्यूं भर देता हूं
अब देख कितने सारे लोग बुलाते हैं यही कविताएं सुनने को....मुझे
देख ये शॉल भी ओढ़ाया, और......
तू जानती है ना कितना अच्छा भाषण दे लेता हूं
बड़ी बड़ी गोष्ठियों, जलसों...सभाओं में अब भी देता हूं
उदारवाद, बाजारवाद, विदेशी पैसा, शिक्षा की जरुरत.....सब कहता हूं
बड़े बड़े लोग सुनते हैं....बडी बड़ी बातें करता हूं.....
बस छोटी छोटी बातें सुनने को कोई नहीं है मां
तू तो छोटी छोटी बातों पर कितना खुश हो जाती थीं
बड़ी बड़ी बातें जीने का दिखावा करने को ठीक हैं
पर जीना तो इन्हीं छोटी छोटी बातों में ही होता है ना....
तू सुनती तो तुझे कितना मजा आता हर बात में
तू सुनती तो मुझे कितना मजा आता जीने में......
तू प्याज काटने को कहती थीं....तो काटते काटते रोता था
अब भी रोता हूं मां.....प्याज काटते....काटते......
कितनी छोटी छोटी बातें हैं मां,
जीना तो छोटी छोटी बातों में ही होता है....तुझे तो पता है मां.....
तू सुन लेती तो .....तू सुन तो लेती ना एक बार.....
24 Sep 2012 - 2:36 pm | श्रावण मोडक
कवितेतच तुमची सही समाविष्ट झाली... मी वाचत गेलो तसंच. 'तू सुन तो लेती ना एक बार...' यापुढं '...निःशंक हे तोंड वाजविले' हे आलं... मजा आली. :-)
24 Sep 2012 - 2:38 pm | Kavita Mahajan
हे हे हे...
24 Sep 2012 - 8:59 pm | धनंजय
प्रवाही कविता आहे. एका प्रकारची लय आहे. धन्यवाद.
मराठीतसुद्धा ही लय जमू शकेलसे वाटते.