घनघन

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
14 Sep 2012 - 6:43 pm

घन मंदावले मन धुंदावले
जळ वाकून वाकून ओघळले
झाकलेल्या कळा आत ओढाळल्या
रंग हिरव्यात दाटल्या ऊन सावल्या

झाडपानात सण पळ श्रावण श्रावण
अंग अंगणात चाहुली पागोळल्या
लवे भरून डोळा कणकण हळवेला
एक एकटाच जीव होई खुळा बावळा

पापणीची स्थिती आळवावी किती
ओठ शब्दांसवे चहु ओर नाचती
नागमोडलेली वाट चिंब ओला घळघाट
नव्या नवरीचा थाट जणू हीच पावती

.........................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2012 - 6:53 pm | अत्रुप्त आत्मा

नेहमीप्रमाणे येक नंबर...!

नाना चेंगट's picture

14 Sep 2012 - 6:57 pm | नाना चेंगट

बकवास कविता लेखन.
यमकजुळव्या कवितांचा आता मला वीट आला आहे.
ले ला ले, ल्या ला ल्या, ती ला ती असे किती दिवस बाळबोध आणि पारंपरीक कविता लेखन करणार.
समज वाढवा.. आधुनिकोत्तर कविता लेखन करत तुमची आणि तुमच्या वाचकांची जाणीव पुढच्या स्तरावर न्या.

ज्ञानराम's picture

16 Sep 2012 - 2:36 pm | ज्ञानराम


:-| :stare:

काय प्रतिसाद आहे नाचें चा ?? रडाव कि हसाव तेच कळत नाही.
निंदकाचे घर असावे शेजारी एवढच म्हणते.

स्पंदना's picture

23 Sep 2012 - 3:29 pm | स्पंदना

सुरेख!