दर्पणाने सांगावे

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
6 Sep 2012 - 4:56 pm

दर्पणाने सांगावे, काय बदल झाले गं
रोजची मी आहे जरी, दुनिया का बदलते गं......... । धृ ।

रोजचाच रस्ता हा, बगीचा गं भासतो
ताटवे हे फुलांचे गं, सांग कसा आखतो
उंबराच्या शाखेवर, मोगरा हा डूलतो
मोकळ्या या केसांशी, वारा बघ खेळतो

एकटीने हरवावे, हाय असे वाटे गं
रोजची मी आहे जरी.....................................| १ |

उन्हामधे सावल्यांचा, खेळ जसा चालतो
मनामधे आठवांचा, मेळ कसा दाटतो
आरशांत पाहतांना, कोण हा खुणावतो
स्वत:लाच बघतांना, जीव का खुळावतो

सखयांना सांगावे, गूढ हे मनीचे गं
रोजची मी आहे जरी.....................................| २ |

गूलाबाच्या रंगात जाईजूई रंगते
केवड्याच्या गंधात, रातराणि गंधते
चांदणीच्या पावलांनी, रात्र का गं हासते
पहाटल्या स्वप्नांनी, जागेपणी लाजते

छेडतात सख्या मला, बदनाम झाले गं
रोजची मी आहे जरी, दुनिया का बदलते गं.............| ३ |

संध्या

शृंगारकविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Sep 2012 - 5:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

सतत होणारा बदल हाच शाश्वत असतो बाकी सगळे खोटे.
हम्म... हे ही दिवस जातील आणि मग हातात उरतील दळणाचे डबे आणि भाजीच्या पिशव्या.
आणि कडेवर केकाटणारी कार्टी....
बाकी सारे मिथ्या....

किसन शिंदे's picture

6 Sep 2012 - 7:26 pm | किसन शिंदे

. हे ही दिवस जातील आणि मग हातात उरतील दळणाचे डबे आणि भाजीच्या पिशव्या.
आणि कडेवर केकाटणारी कार्टी....
बाकी सारे मिथ्या....

सहमत हो पैजार बुवा. :D

अत्रुप्त आत्मा's picture

6 Sep 2012 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा...! एक अल्लड आणी मनोहर स्वप्नरंजन ...

उन्हामधे सावल्यांचा, खेळ जसा चालतो
मनामधे आठवांचा, मेळ कसा दाटतो
आरशांत पाहतांना, कोण हा खुणावतो
स्वत:लाच बघतांना, जीव का खुळावतो

मस्त जमलय. :)

या स्वप्नरंजनावरून एक जुनी चारोळी अठवली...

मेहेंदी भरले हात तुझे अन्
काय तुला मी सांगावे..?
ऐलतिराने पैलतिराला
मधले अंतर मागावे.

मेहेंदी भरले हात तुझे अन्
काय तुला मी सांगावे..?
ऐलतिराने पैलतिराला
मधले अंतर मागावे.

खल्लास मारीच डाला!!!

पक पक पक's picture

7 Sep 2012 - 9:54 pm | पक पक पक

यहीच बोलताय... :) यकदम झक्कास..

शुचि's picture

6 Sep 2012 - 6:51 pm | शुचि

कविता आवडली.

हारुन शेख's picture

6 Sep 2012 - 7:08 pm | हारुन शेख

कविता आवडली !

प्रचेतस's picture

7 Sep 2012 - 9:27 am | प्रचेतस

छान कविता.
आवडली.

इरसाल's picture

7 Sep 2012 - 9:36 am | इरसाल

आवडली कविता.

फटु तेव्ह्ढा गंडलाय बघा.

पैसा's picture

7 Sep 2012 - 10:35 pm | पैसा

गेय कविता!

अविनाशकुलकर्णी's picture

8 Sep 2012 - 6:04 pm | अविनाशकुलकर्णी

आवडली कविता.

मन१'s picture

8 Sep 2012 - 6:13 pm | मन१

कविता (की गीत? जे काही आहे ते) आवडले.
एक जाणवत असणारी गोष्ट म्हणजे ह्यात उत्तम गेयता आहे. संगीतात गती असणारा कुणी ह्याला खास भारतीय चालीवरचे संगीत नक्कीच देउ शकतो.

सांजसंध्या's picture

9 Sep 2012 - 3:16 pm | सांजसंध्या

सर्वांचे मनापासून आभार.

सांजसंध्या's picture

2 Jan 2013 - 8:31 pm | सांजसंध्या

इथली कविता कुठे गेली ?