<बद्ध लेखक>

लंबूटांग's picture
लंबूटांग in जे न देखे रवी...
25 Aug 2012 - 4:28 am

प्रेरणा

इवलं -इवलं ठावं रोज पाडी लेख
उत्तरं सोपी कुणा देईचिना

आपली ती तंगडी दरवेळी वरती
किती पडलो तेही आठवेना

टाकतो त्या जिलब्या, ज्ञानाचा देखावा
रेग्युलरली जिणे काही झेपेचिना

वेळेची ती त्यक्ती कामाचा कंटाळा
डेडलाईनी काही केल्या चुकेचिना

एकहार्ट पैसा काल रोब मरून
सांगतोय काय नक्की कळेचिना

अचाट अध्यात्म, पुचाट विचार
जगतो ते लिहितो कोणा पटेचिना

उपप्रतिसादी ओशट या जिलब्या
लेख झाला जुना तरी संपेचिना

वाचकाचा खात्मा, बद्ध हा लेखक
आपटली डोकी, तरी थांबेचिना

शृंगारभयानकबिभत्सकरुणअद्भुतरसविडंबन

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

25 Aug 2012 - 5:09 am | शिल्पा ब

हि हि हि : : :

मस्तच!! शीर्षकात अजून दोन अक्षरं असती तर अधिकच अर्थपूर्ण झालं असतं.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Aug 2012 - 9:08 am | llपुण्याचे पेशवेll

लंब्या बरेच दिवसानी लिहीता झाला. :)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Aug 2012 - 10:17 am | अत्रुप्त आत्मा

पक पक पक's picture

25 Aug 2012 - 8:01 pm | पक पक पक

Laughing My Ass Off

आ हा हा!!!

मितभाषी's picture

25 Aug 2012 - 10:56 pm | मितभाषी

:)

लंबूटांग's picture

28 Aug 2012 - 7:38 pm | लंबूटांग

प्रतिसाद आणि मूक वाचक दोघांनाही धन्यवाद.

**डिस्क्लेमरः

ह्या विडंबनाचा, प्रतिसादाचा आणि मूकवाचक ह्या आयडीचा काहीही संबंध नाही. प्रेरणा गायबलेली दिसत आहे. येथे बघता येईल. https://lh3.googleusercontent.com/-6xAc_UpdkOk/UDy4lyj3TiI/AAAAAAAAC_0/s...

अक्षया's picture

28 Aug 2012 - 12:59 pm | अक्षया

+१

कवितानागेश's picture

28 Aug 2012 - 2:24 pm | कवितानागेश

:)

चिगो's picture

28 Aug 2012 - 6:39 pm | चिगो

जब-या कविता.. आता ह्यावर एखादा जबरदस्त आध्यात्मिक उतारा येईल लवकरच मिपावर..;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2012 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, कोणावर लिहिलंय आणि काय लिहिलंय काही कळेना.
पण लिहिलंय काव्य एक लंबर. :)

-दिलीप बिरुटे
(भोळा माणूस)

अन्या दातार's picture

28 Aug 2012 - 8:01 pm | अन्या दातार

>>और भी आने दो
नको. त्यासाठी आधी अजीर्ण होण्याइतके काहीतरी यावे लागते.

(विवेकी माणूस) अन्या दातार

लंबूटांग's picture

28 Aug 2012 - 8:10 pm | लंबूटांग

बरोबर :D.

त्याशिवाय स्फुरण नाही चढत विडंबन पाडायला ;)

अन्या दातार's picture

28 Aug 2012 - 8:15 pm | अन्या दातार

नक्की का?
नाही, शेवटी 'पाडायला' हा शब्द वापरलात म्हणून विचारतोय हं. ;)

मोहनराव's picture

28 Aug 2012 - 8:02 pm | मोहनराव

एक नंबर!

नुसता टारगटपणा करायला सांगा. ;)