संदेहमुक्ती

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
13 Aug 2012 - 2:02 pm

श्री. अ‍ॅलन जेकब्ज (श्री. रमण महर्षी फाउंडेशन (युके) चे अध्यक्ष) यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवादः

Once and for all, let's end all confusion, Brahman is Real the world's an illusion.
लोपता समूळ, जगाचा आभास, येते प्रचितीस, ब्रह्ममात्र
सार्‍या संदेहांना, घेउनी प्रचिती, द्यावी मूठमाती, कायमची

We're tricked by the senses and fickle mind, There's nothing truly lasting here to find.
जगी शोधू जाता, सारे अशाश्वत, मिळे ना शाश्वत, येथे काही
फसवाच सारा, दहा इंद्रियांचा, चंचल मनाचा, मायाभास

...All's a mirage of mobile flux and change, Beyond our limited perceptual range,
जडसृष्टी सारी, नसे वस्तु सत्य, आभासी अनित्य, मृगजळ
तरी पहा तिचा, नसे आदि अंत, दशेंद्रिये तेथ, पांगुळती

The planet's perishing and in decay,But Reality's unchanging in every way.
अरे धरित्रीही, असे नाशिवंत, काळाग्नीच्या मुखात, चालली ती
परि सर्वभावे, सत्य सनातन, असे चिरंतन, आत्मरूप

Sadhak met a Sage on a mountain preaching, Gladly he asked Him for some teaching.
गिरीकंदरात, भेटे सत्पुरूष, देई उपदेश, अनायास
हर्षित साधक, अरूणाचलीच्या देवा, म्हणे मज द्यावा, उपदेश

He answered "all you see isn't as it seems, The life you live is just a film of dreams,
बोले सत्पुरूष, दृष्यजात सारे, वाटतसे खरे, तैसे नाही
आजवर तुझ्या, जीवनाची वाट, होती चित्रपट, स्वप्नमय

So wake up child from this sleep of delusion Once and for all end all chronic confusion"
मोहनिद्रेतून, मायावी मदिर, जागा हो सत्वर, वत्सा माझ्या
जुन्या संदेहांना, साधोनी जागृती, दे रे मूठमाती, कायमची

(तळटीपः अरूणाचलीच्या देवा - भगवान रमण महर्षी)

मूळ काव्यः

END CHRONIC CONFUSION

Once and for all, let's end all confusion, Brahman is Real the world's an illusion.

We're tricked by the senses and fickle mind, There's nothing truly lasting here to find.

...All's a mirage of mobile flux and change, Beyond our limited perceptual range,

The planet's perishing and in decay, But Reality's unchanging in every way.

Sadhak met a Sage on a mountain preaching, Gladly he asked Him for some teaching.

He answered "all you see isn't as it seems, The life you live is just a film of dreams,

So wake up child from this sleep of delusion Once and for all end all chronic confusion"

- Alan Jacobs

शांतरसधर्म

प्रतिक्रिया

अक्षया's picture

13 Aug 2012 - 2:18 pm | अक्षया

अतिशय सुंदर भावानुवाद. :)

ज्ञानराम's picture

13 Aug 2012 - 3:26 pm | ज्ञानराम

उत्तम..... अप्रतीम..

"सुसंगती सदा घडो, स्रुजन वाक्य कानी पडो..."

ज्ञानराम's picture

13 Aug 2012 - 3:26 pm | ज्ञानराम

उत्तम..... अप्रतीम..

"सुसंगती सदा घडो, स्रुजन वाक्य कानी पडो..."

पैसा's picture

13 Aug 2012 - 3:31 pm | पैसा

मूळ रचनेत काव्य नावालाच आहे. पण मूकवाचकाचा भावानुवाद सरस उतरला आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Aug 2012 - 6:33 pm | अत्रुप्त आत्मा

अगदी असेच म्हणतो... +1 टू पैसा ताई

प्रचेतस's picture

13 Aug 2012 - 9:03 pm | प्रचेतस

भावानुवाद अतिशय सरस.

मोदक's picture

14 Aug 2012 - 3:02 am | मोदक

+३

चैतन्य दीक्षित's picture

13 Aug 2012 - 4:16 pm | चैतन्य दीक्षित

अनुवाद खूप छान झाला आहे.
पैसातैंशी सहमत

नाना चेंगट's picture

13 Aug 2012 - 6:41 pm | नाना चेंगट

मस्त !

कवितानागेश's picture

13 Aug 2012 - 8:04 pm | कवितानागेश

नेहमीप्रमाणेच सुंदर.

मदनबाण's picture

14 Aug 2012 - 7:08 pm | मदनबाण

सुरेख ! :)

मूकवाचक's picture

16 Aug 2012 - 1:56 pm | मूकवाचक

प्रतिसाद देणार्‍या सर्व मिपाकरांना मन:पूर्वक धन्यवाद.

अस्मी's picture

16 Aug 2012 - 6:05 pm | अस्मी

सुंदर अनुवाद.

निरन्जन वहालेकर's picture

17 Aug 2012 - 9:58 pm | निरन्जन वहालेकर

सुन्दर ! ! ! मुळ कवितेपेक्षा भावानुवादच सरस ! ! !

निरन्जन वहालेकर's picture

17 Aug 2012 - 10:01 pm | निरन्जन वहालेकर

सुन्दर ! ! ! मुळ कवितेपेक्षा भावानुवादच सरस ! ! !

स्वप्निल घायाळ's picture

18 Aug 2012 - 3:42 pm | स्वप्निल घायाळ

अनुवाद खुपच छान आहे !!!

मूकवाचक's picture

22 Aug 2012 - 2:05 pm | मूकवाचक

शेवटी चिरंतन कालप्रवाहाचा किनारा मला सापडला आणि तिथेच मी स्थानापन्न झालो. चिंतनात मग्न, (त्या प्रवाहात) सूर मारण्यासाठी, (मनमुराद) पोहण्यासाठी, आणि अंततः अमर्त्यतेच्या त्या सागराशी एकरूप होण्यासाठी.

'पिंडे पिंडाचा ग्रासु' करून, मी तेजस्वी प्रकाशाचा सागरच होउन गेलो. कित्येक पूर्वजन्मांच्या स्वप्नवत लाटा आता त्या एकाच तेजशलाकेच्या सागरात विरघळून गेल्या आहेत.

(पिंडे पिंडाचा ग्रासु - आपल्या 'मी'पणाचा, अहंतेचा आपल्याच सच्चिदानंद आत्मस्वरूपात विलय करणे)

- "चिरंतनाचा किनारा" या परमहंस योगानंद यांच्या चेपुवर वाचलेल्या कवितेचा भावानुवाद

At last I found the banks of eternity and there I sat, musing, to plunge, swim, and melt in that ocean of immortality.

Melting myself within Myself ,I became the ocean of luminous light. All dream waves of many incarnations have melted into the sea of one flame."

-"Banks of Eternity" a poem by Paramhansa Yogananda

कवितानागेश's picture

22 Aug 2012 - 6:28 pm | कवितानागेश

फारच छान अनुवाद.
आपण तर भाषातज्ञ दिसता! :)

अवांतर प्रश्न:
रमण महर्षींना सत्य समजले होते का?
योगानंदांना सत्य समजले होते का?
अ‍ॅलन जेकबना सत्य समजलं आहे का?
तुम्हाला सत्य समजले आहे का?
कुणी तसे सांगत नाहीये, :( म्हणून खात्री करुन घ्यायला विचारतेय.

अक्षया's picture

22 Aug 2012 - 2:22 pm | अक्षया

सुरेख..!!

चौकटराजा's picture

26 Aug 2012 - 6:00 pm | चौकटराजा

जगी शोधू जाता, सारे अशाश्वत, मिळे ना शाश्वत, येथे काही
फसवाच सारा, दहा इंद्रियांचा, चंचल मनाचा, मायाभास

हे आवडले. दॉ, वसंत चिपळोणकर यानी लिहिलेले " विज्ञानातील क्रांत्या" या पुस्तकात एक प्रतिपादन असे आहे की मानवी मनाचे विश्वाचे जे आकलन आहे त्याला फक्त मनातच स्थान असते. मानवी मनाचे
सारे राज्य लेबलांचे असते. निसर्गाला हे अध्यात्म ते विज्ञान असे काही जाणवत नाही. निसर्गाचेच हे म्हणणे आहे की " हे सारे असार आहे !"
पण मानवी मनाच्या क्शितीजापर्यंत मात्र माणसाला खरा व खोटा कोणतातरी अर्थ स्वीकारल्याशिवाय
पर्याय नसतो.