थेकडीच्या परिसरातील मसाल्याच्या बागा - वेलदोड्याची बाग
हमरस्त्यालगतच्या बंगल्याकडे चढत जाणारा हिरवागार रस्ता
रस्त्यांना जणु 'एंजल्स ट्रंपेट्सचे भारदस्त कुंपण
एंजल्स ट्रंपेट्सची नाजुक, तलम अबोली पिवळसर फुले अक्षरश: हजारांनी फुलली होती
सर्वत्र हिरवाई, झाडावर देखिल हिरवे शेवाळ आणि रस्ता व हिरवाईच्या मध्ये पिवळी पाचोळ्याची महिरप
मुन्नारहुन चिन्नकणालला म्हणजे जिथे आमचे विश्रामधाम होते त्याच्या अलिकडे असलेले अणाईरंकाळ धरण
अणाईरंकाळ सरोवराचे हे दृश्य पाहुन मला तापोळा आठवला
अणईरंकाळचा विस्तिर्ण जलाशय, इथे हत्ती पाणी प्यायला येतात असे ऐकले.
अणाईरंकाळ धरणावरुन दिसणार्या धुक्यात करविलेल्या टेकड्या
पुन्हा एंजल्स ट्रंपेट्स मात्र पांढर्या रंगात, आणि त्यात बेमालुम मिसळलेली गारवेल
चिन्नकनाल म्हणजे आमचे मुन्नार जवळ आले आणि पाउस सुरू झाला, सारथी आणि चिरंजिव छतावरचे सामान झाकायला प्लास्टिक घेउन सरसावले
झोड पावसातुन प्रवास करत आम्ही विश्रामधामावर पोचलो
निसर्गाच्या बदलत्या छटा
खोलितुन दिसलेले विलोभनिय दृश्य आणि त्याच्या बदलत्या छटा
प्रतिक्रिया
9 Aug 2012 - 11:55 pm | सुनील
केरळचे हिरवेगार फोटो मस्तच!
10 Aug 2012 - 9:02 am | प्रचेतस
मस्त हिरवेगार फोटो.
10 Aug 2012 - 9:32 am | प्रभाकर पेठकर
मस्तं हिरवाकंच निसर्ग पाहून सोनू निगमचे हे गाणे आठवले....
हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे ...
हेवा वाटावा अशी तुमची ही सहल आहे.
मजा करा राव. आम्ही इथे ४८ डि. से. तापमानात भाजून निघतो आहोत.
10 Aug 2012 - 10:40 am | ५० फक्त
ओ रस्ते सोडुन बाकीचे फोटो टाका की, इथं च्यायला एक दिवस सुट्टी नाही मिळत आणि तुम्ही असले इनव्हायटिंग फोटो टाका...
10 Aug 2012 - 10:48 am | मदनबाण
मस्त ! :)
10 Aug 2012 - 11:45 am | उदय के'सागर
आम्ही नेमक्या ह्याच रस्त्याने गेलो होतो पण मुन्नार ते थेकडी असे गेलो :)
आणि विशेष म्हणजे ते वेलदोड्याची शेती/रोपं जिथून सुरू होतात तिथपासून वेलदोड्याचा मस्तं सुगंध दरवळत राहतो.. तर हा सफर नुसता 'सुंदर' च नाही तर 'सुंगधी' पण आहे :)
10 Aug 2012 - 2:02 pm | मेघवेडा
क्लास!
10 Aug 2012 - 2:08 pm | अत्रुप्त आत्मा
सध्या पावसाळी धाग्यांची रेलचेल सुरू आहे,,, त्यामुळे मस्त वाट्टय.....
क्लासिक फोटो आणी वर्णन :-)
10 Aug 2012 - 2:31 pm | झकासराव
मस्त फोटो :)
10 Aug 2012 - 4:22 pm | सूड
फोटो झकासच!!
अवांतरः भटजींना आज पूजेचं आंवतण दिसत नाही, स्मायल्याच स्मायल्या टाकतायेत.
10 Aug 2012 - 4:23 pm | सूड
दोआप्रकाटाआ
10 Aug 2012 - 5:14 pm | गवि
सुंदर निसर्ग.. क्या बात है..
मुन्नारची आठवण विशेषतः तिथल्या थंड पावसाळी ओल्या हिरवाईची आठवण झाली.
उत्तम फोटो. धन्यवाद...
10 Aug 2012 - 7:36 pm | रेवती
किती सुंदर छायाचित्रे!
तुमच्या फटूंमुळे 'आता मात्र केरळ ट्रीप हवीच' असं वाटतय.