द विनर टेक्स इट ऑल........
काही गाणी जगावेगळीच असतात. त्यातलं नक्की काय आवडतं ते नक्की सांगता येत नाही. पण ती आतमधे कुठेतरी थेट भिडतात . हे गाणं ही त्यातलच एक .
७० आणि ८० च्या दशकात स्वीडीश ग्रुप " ABBA " खूप गाजत होता त्यांची गाणी मेलडी आणि हार्मनी यांचे एक मजेदार मिश्रण असायची. Björn Ulvaeus आणि Benny Andersson यानी लिहीलेले Agnetha Fältskog ही गायलेले.
खरतंर ही एका विभक्त होत असलेल्या जोडप्याची कहाणी. गाणे जेंव्हा लिहीले गेले तेंव्हा Björn Ulvaeus आणि Agnetha Fältskog हे दोघेही याच अवस्थेतुन जात होते. हे गाणे Agnetha Fältskog ज्या साधेपणे आणि जी ओतून गायलय त्याला तोड नाही.
इंग्रजी उच्चार नीट समजायचे नाहीत त्या वयात गाण्याचे सूर मनाला भावले होते. ज्या वेळेस अर्थ समजला त्यावेळेस हे गाणे ऑल टाईम फेवरेट यादीत जावुन बसलं
द विनर टेक्स इट ऑल...........
आपण ज्यातून गेलो
त्याबद्दल मला आता फारसं बोलायचं नाहीय्ये
काळजात खूप तुटतय
पण आता ते सगळं भूतकाळात जमा झालय
होते नव्हते ते सगळे हुकमाचे पत्ते वापरून पाहिले
मी आणि तू सुद्धा
आणखी काय बोलु
हुकमाच्या एक्क्यासहीत
सगळी पानं संपली
सगळं काही जेत्याचंच असतं
हरलेला एका कोपर्यात हरवतो
जिंकणं बाजूला ठेव
नशीब कोणाला चुकलंय?
कधी मी तुझ्या बाहुपाशात होते
वाटायचं होतं की मी तिथेच योग्य आहे
ते खरं ही होतं
तुझे हात माझ्याभोवती असायचे
माझ्यासाठी सदैव भक्कम भिंत करून
जणू एक एक निवारा व्हायचे
किती सुरक्षीत वाटायचं मला
पण मी खुळी होते.
नियमाना धरून जुगार खेळत होते
कधी कधी देव फासे फेकतात
बर्फाइतक्या थंड मनाने
आणि इकडे खाली
कोणीतरी जीवलग हरवून बसतं
खरं आहे जेत्याचं सगळं काही असतं
हरलेला एका कोपर्यात हरवतो
इतकं साधं आणि सरळ आहे
यात मला तक्रारीला वावच कुठे आहे
फक्त एकच सांग मला
माझं चुंबन घेताना तुला जे वाटायचं
तस्संच वाटतं कारे तुला
तीचंही चुंबन घेताना
आणि
ती तुला जेंव्हा हाक मारते ;
खोल कुठेतरी आत
माझी आठवण होते का रे तुला
पण काय म्हणू शकते मी आता
शिकवेन स्वतःला नियमानुसार वागायला
पंच जसे ठरवतील तसं
खेळ संपल्यावर दूर जायलाचं हवं
प्रेक्षाकांसारखं मॅच पासून दूर
मात्र नेहमी प्रेमात जगत रहा
नव्याने खेळ खेळत रहा
मित्र म्हण की प्रेयकर म्हण
लहान मोठं सगळ काही
जेताच घेवून जातो
तुला वाईट वाटत असेल तर मी नाही बोलणार
मला समजतय रे...
रीवाज म्हणून तू मला शेकहॅन्ड करायला आलास
मी ते स्वीकारलं
मला असं हतबल ,
आत्मविश्वास हरलेलं पाहून
तुला वाईट वाटत होतं
जाउ देत रे....
एक सांगु का तुला
जेताच सगळं काही घेवून जातो
जेताच सगळं काही घेवून जातो.
गाणे : द विनर टेक्स इट ऑल या इथे
गाण्याचे शब्द http://www.azlyrics.com/lyrics/abba/thewinnertakesitall.html
प्रतिक्रिया
9 Aug 2012 - 3:09 pm | गवि
वा.. गाणं तर लहानपणापासून ऐकलेलं आहे. बाबांनी लाँग प्ले रेकॉर्ड आणल्या होत्या त्या लावून.
याच्या अर्थाकडे आता लक्ष गेलं. खूप खूप धन्यवाद...
9 Aug 2012 - 3:30 pm | स्पंदना
माझ अतिशय आवडत गाण, काय आवाज फिरलाय या गाण्यात. अजुन तुमच आर्टीकल नाही वाचल पण खरच मला या गाण्याच अतिशय वेड आहे. टेकडीच्या पायर्या चढता चढ्ता हातातला स्कार्फ वार्यावर उडतोय अन मेरलीन स्ट्रीपच्या चेहर्यावर सार्या सार्या वाया गेलेल्या आयुष्याचा हिशोब मांडणारा पराभुत भाव!
आता आर्टीकल वाचुन प्रतिक्रिया अॅड करेन.
***********
ओके गाण्याचा इतिहास सांगितला आहे तुम्ही. पण ही सारी गाणी Mamma Mia! मध्ये अशी काय जीवंत होउन येतात की बस. म्हणजे लहाणपणापासुन ही गाणी ऐकली पण भिडली ती Mamma Mia! मध्ये. पहाच!!!!
9 Aug 2012 - 6:29 pm | मन१
ऐकावं लागणार...