फिरणे ...!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जनातलं, मनातलं
27 Jul 2012 - 8:49 pm

1
सकाळ झाली आहे.जवळ जवळ आठ वाजून गेलेत.मस्त गारवा आहे.
ह्या परदेशात येऊन मला दोन दिवस होऊन गेलेत.
६२ Avenue .१९९ स्ट्रीट admonton
सूर्य अजून दिसत नाही.आभाळात ढग गोळा झाले आहेत.

मी उठलोय.सर्व सकाळचे विधी आटपून खाली बेसमेंटला गेलोय. .ट्रेडमिलवर मस्त धावून घेतलेय.
वर येऊन वाफाळलेला चहाचे घुटके घेत घेत बाहेर भटकून येण्याचा विचार मनात झुलू लागलाय .
बाहेर हवा थंड आहे.मी निळ्या रंगाचा जीनचा शर्ट घालून बाहेर पडतो आहे.
आईसफ्रुट सारखी थंड हवा गालाला झोंबते आहे .
एक सुखद शिरशिरी सर्वांगातून फुलते आहे.
पांढर्या शुभ पायवाटेवरून मी सरकतो आहे.
फक्त एकटा मी.
नि क्वचित एखादी तरुणी तरुण पळत आहेत.
बाकी रस्ता सुनसान आहे.
एखादे दुसरे पाखरू उगाचच बारीक आवाज करून विहरते आहे.
थोडेसे पुढे गेले की तळे लागेल..
एखाद्या ओढ्यासारखे पसरले आहे.
त्याच्या बाजूबाजूस सुरेख पायवाट शुभ्र.
भोवती काळ्या रंगाचे खांब
त्यावर काळ्या रंगाचे कंदील.
त्यात पिवळे पिवळे दिवे.
दिवे बघून मला हीचकॉकच्या सिनेमाची आठवण होतेय .
अतिशय रमणीय गूढ वातावरण सर्वत्र .
आजूबाजूला सुंदर सुरेख घरे .
डोळे मिटून ध्यान लावून बसलेली .
शंकराचा जसा तिसरा डोळा तसा डोळा प्रत्येक घराला .
घरात प्रवेश करता करता ग्यारेज दिसतेय.
ग्यारेज म्हणजे शंकराचा तिसरा डोळाच वाटतोय .
सर्वत्र असेच डोळे.
बंद मिटून बसलेले.
मी त्या सुरेख शुभ्र पायवाटेवरून वाहत जातोय.
आजूबाजूला शुभ्र गवती फुलांचे थवे पसरलेत.
त्या गवती फुलांमध्ये काही गुलाबी रंगाची गवती फुले .
गवताचा वास माझे मन बधीर करतोय.
मी त्या वासात हरवून जातोय.
खोलगट पसरलेत तळे .निळे निळे
तलावापर्यंत वहात जातायेत त्या पायवाटा
मी पण झुळझुळतोय त्या शुभ्र पायवाटेवरून.
मी निळासावळा झरा होऊन
मी अनुभवतोय बालकवीची कविता
नि भटकतोय मुक्त फकीर होऊन ....

prakash

प्रवासविरंगुळा

प्रतिक्रिया

याचे पण डीटेल वर्णन असते तर पूर्णत्वास पोचल असता.

पक पक पक's picture

27 Jul 2012 - 11:17 pm | पक पक पक

:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

थोडेसे पुढे गेले की तळे लागेल..
एखाद्या ओढ्यासारखे पसरले आहे.

हे तळे ओढ्या सारखे कसे काय पसरलय...

रामपुरी's picture

28 Jul 2012 - 1:14 am | रामपुरी

अहो, काहीही काय विचारता... ते एवढं परदेशात गेलेत. अगदी घरचा पत्ता वगैरे दिलाय. हे एवढुस्सं वर्णन म्हणजे काहीच नव्हे. मुक्तपीठ वाचत नाही काय?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jul 2012 - 6:12 am | अत्रुप्त आत्मा

छान वाटतय वाचायला. :-)

काळा पहाड's picture

28 Jul 2012 - 10:47 am | काळा पहाड

prakash, मी तुमचा प्रोजेक्ट म्यानेजर बोल्तोय. कामाच्या दिवशी ते करायच सोडून तुम्ही कुठेतरी उंडारताय असे कळले. परत येउन तो अर्धवट कोड पुर्ण केलात तर कंपनी वर उपकार होतील.