मी व्यर्थसा दवबिंदू
पानावर गोठलेला,
धरणीला जो नकोसा
आकाशाने त्यागलेला..!
तुज रुपवान भासे,
मज भासे, मी अभागी
उदास घुसमटतो,
थिजतो, बसल्या जागी...!
क्षणभंगूर सारे काही
जाणतो आपण सारे,
देखणे दिसणे फक्त
हे जगणे आहे का रे..?
पानावर ओल्या ओल्या
मी खिन्नसा बसलेला
टिपेल का मज कोणी,
आशेवर बेतलेला..
मज नाते ना रुचते
ना जमते बिलगाया,
थिजणे संपून जावे
वाटे जन्म नवा घ्यावा!
जिथे स्वैर मी असावे
अलगद मी रुजावे,
अन् माझ्या रुजण्याने
जन्म नवे उमलावे..
ही इच्छा अधू आहे
ही आसही कोरी कोरी,
मज ठाव आहे सारे
जन्म, ना कोणी उद्धारी!
घे जगून संपतो आहे
मी मिथ्या जगलो आहे,
इच्छा लपेटून सार्या
जागीच विरतो आहे!
माझ्या रूपाने जिंकले
तुज पुरते मोहवले,
पण जाण जगा, तू ही
मी जगलो थिजलेले!!
मी जगलो थिजलेले...
-वेणू
प्रतिक्रिया
18 Jul 2012 - 11:26 am | अत्रुप्त आत्मा
वाह....!
18 Jul 2012 - 11:40 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर रचना! खुप आवडली.
व्वाह!!
18 Jul 2012 - 3:47 pm | गणेशा
अप्रतिम ...
19 Jul 2012 - 2:08 am | शुचि
छान.
19 Jul 2012 - 10:10 am | चैतन्य दीक्षित
थोडी निराशावादी वाटली, पण कविता चांगली आहे.
19 Jul 2012 - 7:42 pm | पैसा
निराश, उदास वाटलं.
19 Jul 2012 - 10:10 am | चैतन्य दीक्षित
थोडी निराशावादी वाटली, पण कविता चांगली आहे.
19 Jul 2012 - 5:16 pm | झंम्प्या
नितांत सुंदर कवीता...
"जिथे स्वैर मी असावे
अलगद मी रुजावे,
अन् माझ्या रुजण्याने
जन्म नवे उमलावे..
ही इच्छा अधू आहे
ही आसही कोरी कोरी,
मज ठाव आहे सारे
जन्म, ना कोणी उद्धारी!"
स्वप्नांणा वास्तवाची झळ,
मग खरं सत्य काय आहे.
जे डोळ्यांना दिसत की जे आसंवात भिजंत.
जे स्वप्नात फुलतं की जे वास्तवात जळतं.
जे मनांत उमलुन डोळ्यात विरंत की जे मन मारुन जगताना झूरंत...
कवीता खरंच अप्रतीम...
19 Jul 2012 - 7:48 pm | मदनबाण
छान... :)
19 Jul 2012 - 10:06 pm | निवेदिता-ताई
छान
19 Jul 2012 - 10:58 pm | जेनी...
दवबिंदु कडे दुसर्या अँगल ने बघुन तुला कविता जमेल का?
तशी जमली तर नक्कि कर ..कारण दवबिंदुकडे पहाण्याचा बहुतेकांचा द्रुष्टिकोण नितळ असतो ....
ट्राय कर ...विनंती समज हव तर ....