आमची प्रेरणा :- छत्री.
विविध छत्र्यांचे फोटो आणि कोणा एकाने प्रतिसादात लिह्लेच आहे तर एक लेख आपण या निळ्या छत्री वर टकावाच म्हटलं.
द ब्लु अम्रेला.
हिमाचल प्रदेशातिल एक गाव असतं (आता लगेच कोणतं म्हणुन विचारु नका लगेच). तर त्या डोंगराळ भागात राह्णा-या लोकांचि हि गोश्ट आहे.
या डोंगराळ, हिम्छादीत चोट्याशा गावात एक छोटि मुलगी, मुनिया आपली विधवा आई आणि पहेलवान, कुस्तीपटु असलेल्या आपल्या भावा बरोबर रहात असते.
शाळेत जाणे, खेळणे व फावल्या वेळात बक-या चरायला नेणे हे हिचे उद्योग.
हुशार असल्यामुळे आणि पहेलवानाचि लहान बहिण असल्याने हि गावात लाडकी असते.
याच गावात एक चिक्कट दुकानदार रहात असतो... नन्दकिशोर खत्री. गावाच्या मोक्याच्या ठिकाणी याचे दुकान कम हॉटेल आसते. आलेल्या विदेशि पर्यटकांसाठि छोटे हॉटेल चालवणे, शालेच्या मुलांना गोळ्या बिस्कीटे विकणे आणि गाववाल्यांना किराणा सामान विकणे हा ह्याचा मुळ धंदा असतो. हॉटेल आणि दुकान चांगले चालत असलेल्या नन्दु ला अजुन एक नाद असतो (बाईचा नव्हे.. सगले लोकं तुमच्या सारखी नसतात... ;) ) तर या नन्दु ला नाद असतो तो नविन अनोख्या वस्तु घेण्याचा. अर्थात त्या विकत नव्हे! तर त्यासाठी हा चिकट, कधि उधार न देणारा व्यापारी नन्दु लोकांना उधार देत असतो. आणि मग कालांतराने त्या माणसा कडची आवडति वस्तु त्या बदल्यात घेत असतो.
असा हा पक्का व्यापारि, लग्न न केलेला आणि काहिसा लहानपण शाबुत असलेला नन्दु लहान मुलात रमत असतो. या जगात काहि आनंद हे पैस्याने मोजता न येणारे असतात, काहि गोश्टीत फायदा नुकसान नसते तर आनंद हा महत्वाचा असतो हे आपल्या दुकानातिल आगाउ लहान(पर्यटकांचे सामान चोरणा-या) नोकराला सांगत असतो.
एकदा हि मुनिया एकदा आपल्या शेळ्या चरायला घीउन गेलेलि असते. तेव्हा तिला काहि जपानि पर्यटक भेटतात. त्यातल्या एका पर्यटक महिलेचि जपानि छत्रि मुनियाला आवडते(खरच ति जपानि छत्रि खुप सुंदर दखवली आहे). ती छत्रि मुनियाला मिळ्ते पण त्या बदल्यात त्या महिलेला ति तिच्या कडिल अस्वलाच्या नखाचे जंतर(ताविज्,नेकलेस) देते. ते अस्वलाचे नख तिच्या पहेलवान भावाने मेहनतिने जंगलातुन मिळवलेले असते आणि ते शुभ शकुनाचे मानलेले असते.
छत्री मिळाल्याने आनंद झालेलि मुनिया बागडत, उड्या मारत मोठिशि छत्री घेउन मुनिया नन्दु च्या दुकानासमोरुन घरी येते. नन्दु ति छानशि जपानि छत्रि पाहतो आणि त्या छत्रि मुळे मुनियाला झलेला आनंद, तिला गावतल्या लोकांच, पर्यट्कांच मिळणारं अटेंशन आणि मान यामुळे सगळ्यांना ती छत्री हविहविशी वाटु लागते. त्या लोकांमध्ये गावातिल शिक्षकाचि मोटु बायको(तिचा हा बाल ह्ट्ट), नंदु चा लहान नोकर (पैश्यासाठी), आणि खुद्द नंदु. नंदु तिला विवीध आमिशं दाखवुन छत्रि हडप करायचा प्रयत्न करतो पण मुनिया काहि त्याला दाद लागु देत नाहि.
अशि हि छत्रि एक दिवस चोरीला जाते...
नक्कि कोण आहे हा छत्री चोर?
मुनियाला तिचि छत्रि वापस मिळते का? नक्कि कोण आहे छत्रि चोर? सगळ्यांन जेव्हा कळते चोर कोण तेव्हा होणारा निवाडा, चोराला भोगावि लागणारि शिक्षा, चोरिचा आळ येणा-याला होणारा त्रास, त्यातुन होणारि मुनियाचि घालमेल, छत्री परत मिळाल्यावर मुनियाला तितकाच आनंद होतो का?, आणि शेवटि छात्रि चे होते काय..???
या सगळ्या उत्तरासठी हा चित्रपट्च बघावा. आणि जमल्यास आपल्या सागळ्या चिल्या पिल्यां सोबत बघा आणि हो चिल्ले पिल्ले नसतील त्यांनि घाई(चिल्ले पिल्ले होण्याचि ) न करता बघितला तरि एक उत्कृष्ट कलाकृती बघितल्याचा आनंद मिळेल.
पंकज कपूर तर कमाल अप्रतिम अदाकारी, त्याचे खास लिस्प बोलणे, त्याचे लहानण शाबुत असणारे व्यक्तिमत्व आणि वेळ आल्यावर 'तो जिंद्गिके रंग देखा है मैणे' हे बोलणे, सुरवातिचा 'डुबते सुरज को देखने से कुछ फयदा होता है क्या, इन्द्रधनुश देखने से कुछ फयदा होता है क्या', ' झुट बोलना पाप है नदि किनारे साप है...' असले डयलॉग. छोट्यांचे नाच गाणे, त्याबरोबरच लग्नात मोट्याइचे नाचणे, त्याजोडिला ब्यागपाईप चे म्युझिक, मोठ्यांचे बालहट्ट, पड्णारा बर्फ त्यसोबत होणारे धुसर वातावरण.
लहान मुनिया झलेल्या ष्रेया हिचि सुंदर अदाकारी. सगळयांचे भावणारे पहाडी लहेज्यातिल बोलणे. हिमाचल, डलहौसि येथिल अप्रतिम चित्रण आणि विशाल भारद्वाज याचे डायरेक्शन.
अप्रतिमच.
प्रतिक्रिया
16 Jul 2012 - 11:41 pm | टुकुल
सुंदर परिक्षण..लवकरच हा चित्रपट पाहण्याचा मुहुर्त काढतो.
--टुकुल
16 Jul 2012 - 11:49 pm | सुनील
परीक्षण छान पण प्रकाशित करण्यापूर्वी जरा नजरेखालून घातले असतेत, र्ह्स्व-दीर्घाकडे पाहिले असतेत, तर ठेचकाळत वाचायला लागले नसते :)
पुलेशु
17 Jul 2012 - 12:43 am | बहुगुणी
धन्यवाद!
(मस्त कलंदर कडून 'स्टॅनली का डब्बा' नंतर या चित्रपटावर परीक्षण अपेक्षित होतं, 'निदान प्रतिक्रिया नक्की' असं म्हंटल्याचं आठवतं आहे..:-) .)
17 Jul 2012 - 10:57 am | अत्रुप्त आत्मा
@कोणा एकाने प्रतिसादात लिह्लेच आहे >>>
येस...येस....मीच बोल्लोवतो... http://www.misalpav.com/node/22196#comment-411474
माजा अवडता शिनूमा.... थॅंकू हो थँकू.... मस्त वळख करुन दिलित ....
वेगळ्या धाटणीचा शिनूमा,आणी ग्रेट अॅक्टर पंकज कपुर... दोन्हीला
17 Jul 2012 - 11:32 am | मस्त कलंदर
रस्किन बाँडच्या कथेवर आधारलेल्या पिक्चरकडून जरा जास्त अपेक्षा होत्या. आता गुगलून लिहित नाही, पण गाणी गुलजार आणि दिग्दर्शन विशाल भारद्वाजचं असावं... इथे ते जाणवत नाही. टिपिकल हिंदी पिक्चरमधली मुलं त्यांच्या वयाला न शोभेलसा आगाऊपणा करतात आणि मोठ्यांमाणसांरखं बोलतात, या पिक्चरमधली झादून सगळी मुलं अगदी तसंच करतात. ज्या गाण्यावर नाचत बागडत ते गावभर हुंदाडत असतात, त्या गाण्याची चालही ओढून ताणून लावलेली वाटली. पंकज कपूरने त्या दुकानदाराचं काम केलंय, त्याने त्या व्यक्तिरेखेचा कनिंगनेस (लोभी शब्द इथे अपुरा पडेलसं वाटतंय)छान दाखवलाय, ती मुलगीही गोड आहे आणि छत्री त्याहून जास्त गोड आहे. पण आधी केलेल्या दु:कर्मांवर शेवट हा चांगला उतारा आहे. हा चित्रपट पाह्यला तोवर सुबक ठेंगणी भारतात परतली होती :-(.
थोडक्यात, 'द ब्ल्यू अंब्रेला' खूप असोशीने पाहण्यासारखा नाही, पण एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे. 'तहान' त्या मानाने खूपच उच्च(वास्तवाचं भान असलेला आणि तरीदेखील लहान मुलांचा निरागसपणा जपलेला) होता. त्यावर मात्र लवकरच लिहिन.