वारीसोबत चार पावलं....

मन's picture
मन in जे न देखे रवी...
8 Jul 2012 - 10:12 am

सकाळी नेमकं लवकर उठून शुचिर्भूत होताच समोर दिंडी चाललेली दिसली.
त्यावर ज्ञानेश्वर ,तुकाराम ह्यांचेही फोटो दिसले, वारिचे रिंगण बहुदा बनवले जात होते.
मनातल्या मनात त्यांच्यासोबत चार पावलं फिरुन आलो.
"जे न देखे रवी" मध्ये प्रथमच लिहीत आहे.

जगण्याचा पाया, चालण्याचे बळ
मझिया मना देइ भगवंता.
तुझिया कृपेने झालो मी अमर
मेलो मी तक्त्क्षणी उरलो हा नश्वर.

तुझ्या दर्शनाने होई चित्त शांती
माझे अंगा येइ चंदनाच्या ज्वाळा

ज्वाळा ह्या शांत, बुडविती अनंता
आता काय होणे सांगी पांडुरंगा

ठाकलो उभा दारी तुझ्या
वाजवी टाळ सजवी मृदुंगा

टाळ हा हाताचा मृदुंग देहाचा
नेउनी पालखी पोचवी असीम आनंदा

---मनोबा---

शांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 Jul 2012 - 10:32 am | प्रचेतस

मस्त रे मनोबा.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jul 2012 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

मनो...बा...मानलं...बा...मनोबा...! ढिंच्याक ढिच्यांग !

किसन शिंदे's picture

8 Jul 2012 - 3:26 pm | किसन शिंदे

व्वा! छानच लिहली आहेस.

अमितसांगली's picture

9 Jul 2012 - 8:22 am | अमितसांगली

रचना भावली...

अमोघ शिंगोर्णीकर's picture

9 Jul 2012 - 8:51 pm | अमोघ शिंगोर्णीकर

टाळ हा हाताचा मृदुंग देहाचा
नेउनी पालखी पोचवी असीम आनंदा>>>> सुंदर रचना

पैसा's picture

9 Jul 2012 - 11:09 pm | पैसा

मनोबा, रचना आवडली!

मन१'s picture

11 Jul 2012 - 1:59 pm | मन१

वल्ली, अतृप्त आत्म, किसन्,अमित्,अमोघ्,पैसा आणि इतर सर्व वाचनमात्र वाचकांचे आभार.