सध्या थोडास पाऊस पडतोय... आणि अनुभवाला देखील मिळतोय.
आता...जेव्हा पावसात भिजत नसतो...तेव्हा इतरांना भिजताना पाहतो.
जितकी माणसं तितक्या छत्र्या आणि जितक्या छत्र्या तिततकीच छत्र्यां मधली विविधता...
मग ती विविधता टिपायचा विचार केला...तेव्हा छत्री आणि छत्र्या वापरणार्यांच्या विविध मुद्रा टिपायचे ठरवले...
छत्र्या... सगळ्यांसाठी छत्र्या ! वय/स्त्री/पुरुष्/वॄद्ध्, अगदी लहान मुलांच्या आवडी-निवडी नुसार छत्र्या मला पहायला मिळाल्या ! :)
पुर्वी स्त्रींयांच्यां छत्र्या रंगीबेरंगी आणि पुरुषांच्या मात्र काळ्या असा भेदभाव दिसुन येत असे,आता मात्र जमाना बदलला आहे...स्त्रीया काळ्या छत्र्या आणि पुरुष रंगीबेरंगी छत्र्या वापरताना सहज दिसतात.
तुम्हाला जर या छत्र्या आवडल्या तर नक्की सांगा... आणि मग याचा दुसरा भाग टाकावा ? की नाही ? या बद्धल तुम्हीच सांगा.
कॅमेरा:- निकॉन डी-५१००
* फोटो फक्त कंप्रेस केले आहेत.सॉफ्टवेअर वापरुन कुठलाही बदल केलेला नाही.
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
7 Jul 2012 - 11:40 pm | श्रीरंग_जोशी
एक चांगला विषय हाताळताय!!
सर्व छायाचित्रे आवडली. लहान मुलांसाठीही फार सुंदर छत्र्या मिळतात. ते द्रूश्य टिपायची संधी मिळाल्यास या धाग्यावर जरूर डकवा...
7 Jul 2012 - 11:43 pm | मदनबाण
लहान मुलांसाठीही फार सुंदर छत्र्या मिळतात. ते द्रूश्य टिपायची संधी मिळाल्यास या धाग्यावर जरूर डकवा...
हो तर... अशी देखील छत्री मी टिपली आहे. :)
8 Jul 2012 - 12:03 am | प्रचेतस
रंगबिरंगी छत्र्या छान टिपल्यास बाणा.
8 Jul 2012 - 2:30 am | शुचि
मस्त!! छत्री नेहमीच भुरळ पाडत आली आहे. छत्रीला, पर्सला, चपलेला एक स्वतःचे व्यक्तीमत्व असते असे नेहमीच वाटत आले आहे.
शेवटची तुकतुकीत लाल छत्री आवडली मला. :)
8 Jul 2012 - 7:35 am | मराठमोळा
मस्तच रे बाणा,
ज्या खिडकीतनं हे आणि याआधीचे फोटो घेतलेत त्या खिडकीचाही एकदा फोटो पहायचा आहे. :)
8 Jul 2012 - 11:00 am | मदनबाण
सर्वांना धन्यवाद... :)
@ममो:---
ज्या खिडकीतनं हे आणि याआधीचे फोटो घेतलेत त्या खिडकीचाही एकदा फोटो पहायचा आहे.
हा.हा.हा... ती खिडकी इथे दिसेल:--- खिडकीतुन पाहताना...
9 Jul 2012 - 5:44 pm | शुचि
आई-बाळाचा आणि बुलबुलच्या जोडीचा फोटो फार सुंदर.
8 Jul 2012 - 11:06 am | किसन शिंदे
हे फोटो मस्तच.
छत्र्या घेतलेली लहान मुलं आणि त्यांच्या भावमुद्रा असे काही फोटो काढले आहेत का?
काढले असतील तर ते हि इथे टाका कि.
8 Jul 2012 - 11:14 am | मदनबाण
थांकु... :)
छत्र्या घेतलेली लहान मुलं आणि त्यांच्या भावमुद्रा असे काही फोटो काढले आहेत का?
हो तर... पण ते या भागात टाकायचे मुद्दामुन टाळले आहेत ! ;)
8 Jul 2012 - 12:01 pm | नाना चेंगट
चला आता गॅसशेगडी सोडून छत्री पकडलीत तर !
8 Jul 2012 - 12:29 pm | सुहास झेले
लई भारी रे.... मी म्हटलं संसारात एकदम रमून, हे सगळं सोडलंस की काय ;-)
मस्त आले आहेत फोटो...पाऊस ह्या विषयावर अजून येऊ देत :) :)
8 Jul 2012 - 12:54 pm | चित्रगुप्त
छान. झाडाच्या बुंध्याखालून जाणार्या छत्रीवाल्याचा फोटो सर्वात आवडला. यात बुंध्याचे आणि पानांचे गडद आकार एक सुंदर डायगोनल फ्रेम देत आहेत, मूळ विषयाला.
छत्री म्हटली, की चेहरे झाकणे आलेच. जुन्या 'कुंकू' चित्रपटातील (शांता आपटे वाला) छत्रीने तोंड लपवण्याचा सीन आठवला.
तरी छत्रीतील काही मुखडे पण येउ द्यात.
मात्र यासाठी तुम्हाला खिडकी सोडून समोरासमोर यावे लागेल. स्वतः पावसात छत्री घेऊन असे फोटो काढणे, यात बरीच आव्हाने अनुभवाल. करून बघा.
8 Jul 2012 - 2:25 pm | अत्रुप्त आत्मा
हिच्यावर येक शिनुमा हाय... इशाल भारद्वाजनी केलेला... त्यातल्या छत्र्या बी लै रंगीबेरंगी,आनी छान छान व्हत्या... मला लै लै अवडल्या त्या,,,अन ह्या बी
9 Jul 2012 - 11:54 am | ५० फक्त
लई भारी रे , मस्त मस्त आले आहेत सगळे फोटो.
9 Jul 2012 - 12:05 pm | सुहास..
लई भारी !!
तो शेवटून दुसरा, दोन मित्रांचा एका छत्री तला फोटो मस्त वाटला रे
9 Jul 2012 - 3:38 pm | RUPALI POYEKAR
छत्र्यांचे फोटो मस्तच
9 Jul 2012 - 3:41 pm | गवि
लई भारी रे.....
9 Jul 2012 - 3:49 pm | प्यारे१
मस्तच....
9 Jul 2012 - 4:35 pm | मदनबाण
सर्व मंडळींना थांकु बरं का ! :)
आता या विषयाचा दुसरा भाग टाकायला हरकत नाही... ;)
या छत्रीचा दुसरा भाग टाकण्या आधी, पॅनिंग चा मी केलेला एक प्रयत्न इथे देणार आहे...
अपे़क्षा करतो,की मी केलेला प्रयत्न मिपाकरांना आवडेल.
@चित्रगुप्त काका :---
तरी छत्रीतील काही मुखडे पण येउ द्यात.
मात्र यासाठी तुम्हाला खिडकी सोडून समोरासमोर यावे लागेल. स्वतः पावसात छत्री घेऊन असे फोटो काढणे, यात बरीच आव्हाने अनुभवाल. करून बघा.
ह्म्म्म... समोरा समोर न येता देखील मुखडे टिपता येतात... पण शक्यतो मी ते टाळतो. तरी सुद्धा तुमच्यासाठी एक मस्त फोटो टाकीनच ! अपेक्षा आहे की तो तुम्हाला आवडेल.
तुम्हाला जर फोटोत काही कमी/जास्त वाटत असेल... तरी सुद्धा ते मला सांगावे, जेणे करुन मला माझी फोटोग्राफी सुधारण्याची संधी मिळेल. :)
9 Jul 2012 - 5:18 pm | कवटी
बाण्या लेका खिडकीत बसुन ओलेत्या पोरीबाळींचे फोटो काढतोय्स....
मार खाशील लेका कधीतरी.
9 Jul 2012 - 5:43 pm | मदनबाण
बाण्या लेका खिडकीत बसुन ओलेत्या पोरीबाळींचे फोटो काढतोय्स....
मार खाशील लेका कधीतरी.
चूकताय तुम्ही कवटी मामा... ;)
विषय ओलेत्या पोरीबाळींचे फोटो नसुन "छत्री" आहे,तसेच स्त्रीयांचे चेहेरे मी टिपण्याचे कटाक्षाने टाळतो...
बाय द वे... आपल्या सगळ्यांच्या टकुर्यावर असलेल्या आकाशात लयी उपग्रह उंडारत असतात... ते बी फोटुशोटु काढतात म्हणे ! त्या बद्धल काय म्हणायचे ? ;)
बाकी वरच्या एका फोटोत बाळ त्याच्या समोरच्या कारकडे बोट दाखवतोय... तो जरा पहायचे कष्ट घ्या ना ! तुमचे लक्ष भलतीकडेच दिसते बाँ... ;)
9 Jul 2012 - 9:05 pm | रेवती
भारी आयड्या. फोटू आवडले.
9 Jul 2012 - 9:37 pm | मराठे
रंगीबेरंगी (लेडिज) छत्री घेऊन निघालेल्या ट्रॅफिक हवालदाराचं चित्र मजेदार वाटतंय!
अवांतरः फोटो बघून,खरंतर खिडकीतून फोटो घेणारे म.बा. कसे दिसत असतील याची कल्पना करून, उगाचच पुलंच्या पाळीव प्राणी/पक्षी मधला 'कूसुकू' आठवला! ;)
10 Jul 2012 - 10:10 pm | सुधीर
छत्रीचे इतके छान फोटो येऊ शकतात हे आजच कळलं.
11 Jul 2012 - 10:39 am | ऋषिकेश
मस्तच!
=============
जाहिरातः छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे १ २ ३
11 Jul 2012 - 3:56 pm | प्यारे१
छान लिहीलंय.
(बाकी संस्थळ पाहून आनंद झाला. विसरलोच होतो!)
11 Jul 2012 - 6:52 pm | मदनबाण
जाहिरातः छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे १ २ ३
वेळ मिळताच जाहिरात पाहिली जाईल ! हापिसातुन जाहिरातीचे ठिकाण उघडत नसल्याने (मिपा उघडते याचा फार आनंद आहे.)घरुन पाहणी केली जाईल.